Top Post Ad

... तरच खऱ्या अर्थाने महिला सक्षम होईल


 आज आपण जागतिक महिला दिन साजरा करीत आहोत. खरंच जागतिक महिला दिन साजरा करण्याइतपत आपण सक्षम आहोत का? जगात विज्ञानाने एवढी अफाट प्रगती केली. तरी भारतात त्यांची नोंद घेतली जात नाही. या देशात अज्ञान अंधश्रद्धा यालाच खुप महत्व आहे. त्यात महिला वर्गाचे प्रमाण जास्त आहे. म्हणुन त्यांना महिलांना कायम त्यात गुंतवून ठेवण्या करीता घराघरात दूरदर्शन म्हणजे टीव्ही चोवीस तास मेंदूला योग्य खाद्य देण्यास तयार आहेत. प्रत्येक घरात टीव्हीच्या रिमोटवर ताबा सांगुन वर्चस्व गाजवणाऱ्या महिलाच (त्यांच्या भीतीनं पुरूषही) काय पाहतात? आई कुठे काय करते?.रंग माझा वेगळा, मुलगी झाली हो, सुख म्हणजे काय?. सहकुटुंब सहपरिवार ,माझी तुझी रेशीम गाठ, भाग्य दिले तु मला, आता सुरु आहेत, तर मागे ज्यांनी महिलांना गुंतवून ठेवले होते त्या "तुझ्यात जीव रंगला", "खुलता कळी खुलेना","माझ्या नवऱ्यांची बायको", "नागिन" किंवा बालाजी चा टुकार कौटुंबिक कलह ! "बायकांनी बायकांसारखंच रहायचं" हे यात ठासून शिकवलं जात. 

म्हणजे इथली सामाजिक, धार्मिक व्यवस्थाच नाही तर प्रचार,प्रसार माध्यमे देखिल स्त्रियांना एकाच साच्यात बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. आई कुठे काय करते?. रंग माझा वेगळा, सुख म्हणजे काय असते?.फुलला सुगंध मातीचा ह्या मालिका करमणूक म्हणून तरी आपण काय पाहतो आणि त्याचा काय परीणाम होतोय हे सुध्दा लक्षात येत नाहीये.ज्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे आहेत किंवा मोठ्या पदावर आहेत त्यांचाही कल स्त्रियांनी स्त्रियांचे प्रश्न सोडवावेत असाच असतो असा विचार खरं तर खुप संकुचित आहे.स्रियांनी रामायण महाभारत घडविले.आताच्या महिला एकत्र कुटुंबात राहून कधी कोणाचा काटा काढवा,कोणाला कुठे संकटात टाकावे आणि समस्या कशा निर्माण कराव्यात हे शिकविल्या जात आहे.त्याचा परिणाम आजच्या मुलीवर मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे.ते लग्न झाल्यावर एकत्र कुटुंबात राहण्यासाठी तयार नाहीत.परिणाम आई वडिलांनी कष्ट,त्याग करून मुलांना शिक्षण दिले त्यामुळे चांगली नोकरी मिळाली.त्याची शिक्षा वयोवृद्धांना देण्याचे संस्कार ह्या मालिकेतून कळत नकळत मिळतात.हे कसे विसरता येईल. 

          आम्ही तर म्हणतो, स्त्रियांनी आता फक्त स्त्रियांचेच नाही तर सर्वच स्तरावरील प्रश्न सोडवायला सिध्द व्हायला हवंय आणि तितक्या त्या नक्कीच सक्षम आहेत. हे राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई, ताराबाई,लक्ष्मीबाई झिलकरी,अहिल्याबाई यांनी जो इतिहास घडविला त्यांच्या पराक्रमाची इतिहासात नोंद आहे.पण भारतातील चॅनलवाले ते दाखविण्याचे, प्रिंट मीडिया वाले लिहण्याचे धाडस करीत नाही.कोण ती शिक्षणाची देवता शारदा, सरस्वती कोणत्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात जन्मली. त्यांच्या आई,वडिलाची नांवे काय होती?. त्यांचे प्राथमिक,माध्यमिक शिक्षण कुठे झाले?.हे आजच्या सुशिक्षित महिलांना सांगितले पाहिजे. त्याच पद्धतीने धन,संपती पैसा याची देवता लक्ष्मी देवी.कोणत्या गावात, तालुक्यात,जिल्ह्यात जन्मली?. त्यांच्या आई,वडिलाची नांवे काय होती?.त्यांचे प्राथमिक,माध्यमिक शिक्षण कुठे झाले?. तिने धन,संपती पैसा कसा निर्माण केला.तिच्या करिता आज महिला वर्ग दरवाजे खुले ठेवतात.झाडू मारणे आणि दिवाबत्ती याची वेळ ठरलेली आहे.त्याबाबत ही मिडिया सत्य काही दाखवीत नाही. जागतिक स्तरावर असले काही प्रकार होतांना दिसतात का? मग आम्ही जागतिक महिला दिन साजरी करताना या सर्व गोष्टी जगापुढे आजपर्यंत का मांडल्या नाहीत.

         भारतात ज्या महिलेने पहिले स्वत शिक्षण घेऊन मुलीना शिक्षण देण्यासाठी पाहिली शाळा काढली. ती १ मे १८४७ रोजी.सावित्रीबाई फुले (जन्म ३ जानेवारी १८३१,जन्म स्थळ-नायगाव,सातारा- मृत्यू- १० मार्च १८९७ पुणे येथे झाला.) त्या पहिल्या महिला शिक्षिका, शिक्षण प्रसारक, समाज सुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची सुरुवात महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन केली. महिलांना शिक्षण कोणामुळे मिळाले, हे मान्य न करता शिक्षणामुळे सर्व क्षेत्रातील महिला ते आपले पारंपारिक रीतीरिवाज अंधश्रद्धा,अज्ञान दूर करून घेण्यास तयार नाही.कोणत्याही धर्माच्या नियमानुसार एक महिला कधी मस्जिदची मौलाना बनू शकत नाही,एक महिला कधी मंदिराची पुजारी बनू शकत नाही,एक महिला कधी चर्चची फादर बनू शकत नाही, पण शिक्षण घेऊन एक महिला राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, मंत्री, आमदार, कलेक्टर, सचिव, सरपंच सगळ बनू शकते.कारण जे धर्म देऊ शकत नाही ते भारतीय संविधानाने त्यांना फुकट दिल आहे. तरी काही महिला धर्म ग्रंथांना श्रेष्ठ मानून त्यांच्या अलिखित नियमांचे पालन करतात.त्यांना प्रोत्साहन देणारी आणि आपली राजकीय पोळी भाजून घेणारी एक प्रचंड व्यवस्था या देशात कार्यरत आहे. या सर्व पारंपारिक कल्पनांमध्ये गुंतवून आजही ही व्यवस्था आमच्यावर राज्य करीत आहे. आम्हाला गुलाम करीत आहे. आमची मुले बेरोजगार होऊन त्यांची गुलामी करीत आहेत. तरीही आम्ही याच परंपरेमध्ये जगण्यात धन्यता मानत आहोत. 

         संविधानातील मुल्यांना हरताळ फासला जात असताना विज्ञानवादी मानसिकतेच्या स्त्रियांनी ठाम निर्णय ठाम भुमिका घेऊन नेतृत्व हातात घ्यायला हवं, तेव्हा आपण म्हणू की सावित्रीचा वारसा खऱ्या अर्थाने पुढं नेला जात आहे.फक्त चळवळीत,संस्था,संघटना, राजकारणात असणाऱ्या स्त्रियांनीच नाही तर गृहीणींनी सुध्दा येणाऱ्या काळात हातात स्मार्टफोन फोरजी नेटवर्क ठेवून आपण कुठं असणार आहोत हे आजच ठरवून मार्गक्रमण करायला हवं. निर्णय प्रक्रीयेत सामावून घेण्यात किंवा समान संधीच्या संघर्षात स्त्रिया अजुन कीती मागे आहेत याचा सडेतोड अभ्यास आतातरी ठळकपणे झाला पाहीजे. शिक्षण घेऊन आघाडीवर असणाऱ्या बहुसंख्य महिला आज मानसिक वैचारिक गुलाम आहेत.आणि महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या कष्ट,त्याग आणि जिद्दीला बेईमान झाल्या आहेत. म्हणूनच अशा सर्व महिलांना मनुवादी मनुस्मृती नुसार वागणूक दिली पाहिजे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी यांच्या वर खूप दया दाखवली. त्यांना भारतीय संविधानात मान,सन्मान समान अधिकार दिला.आज त्या मोकळ्या वातावरणात जीन पॅन्ट टीशर्ट घालून,बॉब कट करून वावरत असतात.तरी त्या गुरुवार उपास धरल्या शिवाय राहत नाही.अशा महिलांना काय म्हणावे?. 

 अंगावर शेणाचे फेकलेले गोळे, दगड धोंड्याचा मारा सहन करून सावित्रीमांईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले.आजच्या सुशिक्षित महिला ज्या कोण्या देवीच्या उपासक असतील तर त्यांनी त्यांचा जन्म कोण्या आई वडिलांच्या पोटी कुठे,कधी झाला प्राथमिक शिक्षण,माध्यमिक शिक्षण कुठे झाले.तालुखा जिल्हा,राज्य कोणते होते.त्यांच्या पराक्रमात कोण कोण सहभागी होते. आई, वडील, भाऊ, बहिण, नवरा, मुलगा, मुलगी शेवटी त्यांचे निधन कुठे,कधी,कसे झाले.याची सविस्तरपणे माहिती सांगितली,लिहली पाहिजे.

 सुशिक्षित महिलांची अशिक्षित कहानी. सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचे संपूर्ण जन्मा पासून मृत्यू पर्यंत माहिती उपलब्ध आहे. इतरांची अशी माहिती नसतांनाही त्यांचे डोळे बंद करून समर्थन करणे म्हणजेच अज्ञान आहे. सुशिक्षित प्रशिक्षण घेतलेल्या महिलांची कहाणी कशी असावी प्रेरणादायी, तरच तिच्या कार्याची इतिहासात नोंद झाली असेल.सुशिक्षित महिलांची अशिक्षित कहाणी झाली नाही पाहिजे.यासाठी अशिक्षित असो की सुशिक्षित महिलांनी जागतिक महिला दिन साजरी करताना या सर्व गोष्टींचा नीट अभ्यास केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने महिला सक्षम होईल आणि महिला दिन साजरी करण्याला अर्थ राहिल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com