Top Post Ad

सर्वसामान्य नागरिकांनी देशातील व्यवस्थेचे वास्तव समजून घेतले पाहिजे


 भारतावर हिंदूंची सत्ता अर्थात ब्राह्मणांची सत्ता पाहिजे, त्यानुसार भारतावर हिंदूंची म्हणजेच ब्राह्मणांची सत्ता स्थापन झाली. तरी पण आरएसएस यावर समाधानी नाही कारण त्याला त्याचे मनसुबे राबवताना राज्यघटनेची अडचण येत आहे राज्यघटना सर्वसामान्य हिंदूंच्या हिताची आहे पण उच्चवर्णीय हिंदू ब्राह्मणांच्या अडचणीची आहे  म्हणून इथला सर्वसामान्य नागरिकांनी हिंदू म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. 

भारतातला हिंदू मुख्यत्वे दोन भागात विभागल्या गेलेला आहे. एक सवर्णहिंदू आणि दुसरा अवर्णहिंदू. सवर्ण म्हणजे 15 टक्के उच्चवर्णीय हिंदू आणि अवर्ण म्हणजे 85 टक्के मागासवर्गीय हिंदू. यांच्या मतानुसार ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे सवर्ण हिंदू आहेत आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व हे अवर्ण हींदु आहेत या अवर्णांना आपण इथे मागासवर्गीय म्हणू.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बीजेपी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि त्यांची पिलावळ ही सर्व उच्चवर्णीय हिंदू हितासाठी काम करीत असते, या उच्चवर्णीय हिंदूचे भारतात आणि भारताबाहेर सर्व क्षेत्रात वर्चस्व असावे हे यांचे ध्येय आहे आणि हेच म्हणजे त्यांचे हिंदूराष्ट्र आहे.हे सगळ्या उच्चवर्णीय हिंदूंना मंजूर आहे हिच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची म्हणजे ब्राह्मणांची विचारधारा आहे उच्च वर्णियातही यांना ते उच्चवर्णीय हिंदू म्हणून मान्य नाहीत जे ब्राह्मणी तत्त्वज्ञानाला विरोध करतात. 

भारतीय राज्यघटना ही ब्राह्मणी तत्त्वज्ञानाला  म्हणजेच विषमता वादाला नकार देते म्हणून यांना भारतीय राज्यघटना मंजूर नाही, मान्य नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले रात्रंदिवस हिंदू आणि हिंदुत्वाचा जाप करीत असतात व त्यांचे श्रेष्ठत्व टिकवण्याची वेळ आली तर कट्टर हिंदू असलेले महात्मा गांधी यांचा खून करतात,तसेच साम्यवादी विचारधारेने प्रभावित असलेले हिंदू  कलबुर्गी,पानसरे ,दाभोळकर ,आणि गौरी लंकेश यांचाही खून करतात,खुनाचे जाहीर समर्थन करतात. त्यांचे हे कार्य आज नवीन नाही. यापूर्वीच्या इतिहासात त्यांनी हे श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी हत्याच केल्या आणि भविष्यातही हे हत्याच करणार आहेत. याचे कारण म्हणजे ब्राह्मणांना त्यांचा तथाकथित हिंदू धर्म महत्त्वाचा नाही तर त्यांचा ब्राह्मण जातीचे श्रेष्ठत्व आणि स्वार्थ हा महत्त्वाचा आहे. त्यांचे सर्व हिंदू समाजावर असलेले वर्चस्व महत्त्वाचे आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेस हिंदूचे सरकार होते ते त्यांनी पाडून बीजेपीचे हिंदुंचे सरकार आणले हिमाचल प्रदेशात कांग्रेस हिंदूचे सरकार होते ते सरकार पाडून त्यांनी बीजेपीचे म्हणजेच ब्राह्मण हिंदुंचे सरकार आणले महाराष्ट्रात शिवसेना, कांग्रेस हिंदूचे सरकार होते पण ते पाडून त्यांनी ब्राह्मण हिंदुचे म्हणजेच बीजेपी चे सरकार आणले आणि प्रत्येक ठिकाणी ते हेच करीत आहेत हे सगळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अगदी खुलेपणाने करीत आहे त्यांना कोणत्याही प्रकारची भीती नाही आडकाठी नाही हे करताना त्यांची जी व्यूहरचना आहे ती व्युहरचना आपण समजून घेतली पाहिजे, कारण एखाद्या संघटनेची व्युहरचना जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हाच तुम्ही त्या संघटनेला पराभूत करू शकाल अन्यथा नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्णव्यवस्थेवर घट्ट विश्वास आहे आणि ही वर्णव्यवस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही हिंदू ब्राह्मण स्वयंसेवकाला सर्वात वरती ठेवत असते, हिंदू मागासवर्गीय स्वयंसेवकाला खाली ठेवत असते.

आज या देशातली शासनकर्ती जमात ही ब्राह्मणवर्ग आहे आणि ती कां आहे तर त्याला कारणीभूत या देशातली वर्णव्यवस्था आहे ती जरी दिसत नसली तरी ती पूर्णपणे सक्रिय आहे, आंतरजातीय विवाहाने सुद्धा ती मोडत नाही तर आंतरजातीय विवाह करणाऱ्याला ती जातीनुसार आपल्यात सामावून घेते नाहीतर शूद्रत्वात ढकलून देते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी ही ब्राह्मणी समाजव्यवस्था ब्राह्मण वर्गाला सतत संरक्षण देत असते यांना संरक्षण देणारे मागासवर्गीय हिंदूच असतात ही यांची चक्रव्यूह रचना  आहे  या देशाच्या इतिहासात आणि वर्तमानात जेंव्हा जेंव्हा रक्तरंजीत धार्मिक संघर्ष झाले तेव्हा तेव्हा या देशात सर्वसामान्य हिंदू-मुस्लिम मारल्या गेले पण ब्राह्मण मात्र सदैव सुरक्षित राहिला या चातुर्वर्ण्यसमाज व्युहरचनेने ब्राह्मण वर्गाला नेहमीसाठी सुरक्षित ठेवलेले आहे. अफजलखान वधाच्या वेळेस अफजलखानाचा शिवाजीच्या हाताने सहज मुडदा  पडला पण शिवाजी वर वार करणारा ब्राह्मण कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा सुरक्षित राहिला, या चातुरवर्णव्यवस्थेमुळे ब्राह्मणावर कधीच आघात झालेले नाहीत. या देशात युद्ध झालेत पर ब्राह्मणवर्ग सदैव सुरक्षित राहिला कारण चातुर्वर्ण्यसमाजात ब्राह्मणवर्गाला असलेले सर्वोच्च स्थान होय.

भारतीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्य करीत असतांना प्रत्यक्ष निर्णय घेणारे, निर्णय राबवनारे  आणि प्रत्यक्ष कृती करणारे व्यक्ती हे वेगवेगळ्या जातीचे असतात  म्हणून  चुकीचा निर्णय राबवताना कितीही प्राणहानी झाली तरी निर्णय घेणा-यांना त्यांना पर्वा नसते कारण निर्णयाचे विपरीत परिणाम निर्णय घेणाऱ्याच्या जातीवर वर होत नाहीत तर निर्णय राबवणा-या व प्रत्यक्ष कृती करणा-याच्या जातीवर,समाजावर होत असतात. या देशाच्या फाळणीमध्ये  हेच घडले राज्यकर्त्या उच्चवर्णीय मुसलमानांना त्यांचे राज्य पाहिजे होते आणि हिंदू उच्चवर्णीय ब्राह्मणांना त्यांचे राज्य पाहिजे होते म्हणून द्विराष्ट्र संकल्पनेला जबरदस्त वैचारिक खतपाणी मिळाले,अखंड भारत ठेवण्यासाठी तडजोड झाली नाही व शेवटी या अखंड भारताचे दोन तुकडे झाले हे इथे विसरता कामा नये. आजही भारतात ज्या ठिकाणी धार्मिक दंगली होतात किंवा पेटवल्या जातात त्या त्या भागात जीवहानी, वित्तहानी ही मागासवर्गीय मुसलमान आणि मागासवर्गीय हिंदूची होते म्हणून धार्मिक दंगली पेटत असतात,पेटवल्या जात असतात. ज्या दिवशी या दंगलीत ब्राह्मण आणि उच्चवर्णीय मरतील त्या दिवशी या धार्मिक दंगली पेटणे आपोआप पूर्णतः बंद होतील हे नक्की.

भारताला स्वातंत्र्य मिळून आज जवळजवळ 75 वर्षे झाली पण भारताच्या सर्वसामान्य नागरीकांची सामाजिक समतेत व आर्थिक समतेचा अशीकाही विशेष प्रगती झाली नाही. पण उच्चवर्णीय वर्गाची मात्र चांगली प्रगती झाली आहे. भारतातल्या हिंदू समाजात जो उच्चवर्गीय घटक ब्राह्मण,क्षत्रिय, वैश्य आहे त्या घटकाचा विकास झालेला आहे पण आज हिंदू समाज व्यवस्थेनुसार जो शूद्रवर्ग आहे तो जिथल्या तिथेच आहे उलट मागे गेलेला आहे. 10 टक्के उच्चवर्णीय हिंदू कडे भारतातली 80 टक्के संपत्ती गेलेली आहे भारतातला खरा संघर्ष हा शूद्र हिंदू विरुद्ध उच्चवर्णीय हिंदू असाच आहे भारतातील बहुतेक राजकीय पक्ष उच्चवर्णीयांनी हिंदुनी स्थापन केलेले राजकीय पक्ष आहेत त्यात शूद्रवर्णीय लोक हे कामगार म्हणजेच कार्यकर्ते आहेत ज्याप्रमाणे एखाद्या कारखान्यात जोखमीचे काम करताना मृत्यू झाला तर तो कामगाराचा होतो कारखान्याच्या मालकाचा व अधिका-यांचा  होत नाही त्याचप्रमाणे राजकीय व धार्मिक  दंगली झाल्या तर कामगार कार्यकर्ते मरतात पक्ष संस्थापक व पदाधिकारी सुरक्षित राहतात तसेच हिंदू समाज व्यवस्थेचे आहे इथे हिंदू- मुस्लिम दंगली झाल्या तरी उच्चवर्णीय हिंदू मरत नाही म्हणून भारतात कोणत्या ना कोणत्या कारणाने दंगली होत असतात. 

हिंदू हा धर्म नाही तर ती एक समाज व्यवस्था आहे हिंदू हा धर्म असता तर आज या धर्माचा एक संस्थापक असता, एक ईश्वर असता व सर्व हिंदूंची पूजा पद्धत समान असती सर्व हिंदूना पुजारी बनायचा अधिकार असता, हिंदू धर्मात पुजारी किंवा पुरोहित हा सर्वश्रेष्ठ आहे आणि तो फक्त ब्राह्मणच होऊ शकतो म्हणून हा हिंदूधर्म नाही तर हा ब्राह्मण धर्म आहे.  एक ब्राह्मणी समाजव्यवस्था आहे कारण इथे पुरोहित बनायचा अधिकार हा फक्त ब्राह्मणांना आहे 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्राह्मण धर्माचे नामांतर होऊन तो हिंदू धर्म झालेला आहे ब्राह्मण धर्माचे नाव बदलून त्याला 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात हिंदूधर्म म्हणून मान्यता देण्यात आली, ही इथे लक्षात घेण्यासारखी बाब आहे 

ज्याप्रमाणे सरकारी यंत्रणेत आणि शासकीय कार्यालयात कार्यालयाचे कामकाज सुरळीतपणे व सक्षमतेने चालावे म्हणून क्लास वन, क्लास टू, क्लास थ्री दर्जाचे अधिकारी आणि क्लास फोर दर्जाचे  कर्मचारी असतात त्याचप्रमाणे हिंदू समाजातही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य दर्जाचे अधिकारी आणि शूद्र दर्जाचे कर्मचारी आहेत सरकारी कार्यालयात आपल्या योग्यतेने आपल्याला क्लास वन अधिकारी बनता येते पण हिंदू समाज व्यवस्थेत ती सोय नाही.   या प्रशाशन व्यवस्थेत कोणताही निर्णय राबवताना जसे क्लास वन अधिकारी सुरक्षित राहतात आणि क्लास फोर दर्जाचे पोलीस मरतात तसेच या विशम  समाजव्यवस्थेत धार्मिक दंगली उसळल्या तरी ब्राह्मण सुरक्षित राहतात त्यांना कोणत्याही प्रकारची जीवित हानी वित्तहानी होत नाही. जीवित हानी वित्तहानी झाली तरी ती शुद्र हिंदूची होते ब्राह्मण धार्मिक दंगलीची पर्वा करीत नाही ही वास्तविकता आहे. 

हिंदीत एक म्हण आहे जान है तो जहान है या म्हणीप्रमाणे जीव आहे म्हणून जग आहे हे वास्तव आहे. भारतातल्या आजपर्यंतच्या  राजकीय, सामाजिक आणि धार्मिक उलथापालतीमध्ये इथल्या शुद्राची वाट लागली परकीय आक्रमणामध्ये आणि युद्धात  क्षत्रियांची आणि बनियांची वाट लागली पण ब्राह्मण कालही सुरक्षित राहिले आणि आजही सुरक्षित आहेत याचे कारण वर्णव्यवस्थेवर आधारीत ब्राह्मणधर्म आहे ज्याला विसाव्या शतकापासून ब्राह्मण हिंदू धर्म म्हणून संबोधतात हा धर्म ब्राह्मणांना जागेवर प्रतिष्ठा, पद आणि पैसा मिळवून देतो म्हणून हे रात्रंदिवस या धर्माचे समर्थन करीत असतात त्यांचा उदो उदो करीत असतात मुळात ब्राह्मणधर्म पण नामांतरित हिंदूधर्म ब्राह्मणांना सदैव सुरक्षित ठेवतो म्हणून हे हिंदू- हिंदुत्व -हिंदुराष्ट्र याचे रात्रंदिवस समर्थन करतात हिंदू धर्म हा इथल्या ब्राह्मण, क्षत्रिय,वैशासाठी एक वरदान आहे तर इथल्या शुद्रांसाठी एक अभिशाप आहे  हे इथल्या शूद्र भारतीयांनी म्हणजेच ओबीसीनी समजून घेतले पाहिजे. 

ज्याप्रमाणे चिखलात राहून चिखलसाफ करता येत नाही त्याचप्रमाणे हिंदू धर्मात राहून हिंदू धर्मात सुधार करता येत नाही आणि येणारही नाही त्यावर धर्मांतर हा एकमेव उपाय आहे पण त्यातही जो धर्म पुरोहितगिरीला आणि ईश्वरवादाला मान्यता देतो तो धर्म ब्राह्मणवादावर उपाय होऊ शकत नाही कारण ब्राह्मण नवीन धर्मात प्रवेश करतात आणि तिथेही मौलाना आणि फादरचे  स्थान बळकवून आपले हित साध्य करतात म्हणून ज्या धर्माचा पाया विज्ञानवादावर आणि मानवतावादावर आहे तोच धर्म ब्राम्हणवाद्यांना पराभूत करू शकतो इतर धर्म पराभूत करुन शकत नाही शेवटी धर्माचे उत्तर धर्मानेच द्यावे लागेल एखादाधर्म जर आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरत असेल तर तो धर्म फेकून देणे बदलणे हाच यावर एकमेव योग्य उपाय राहील.

  • अरुणा नारायण, अहमदनगर
  • ९५०३७०८६६१


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com