Top Post Ad

क्रेडाई एमसीएचआय रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशनचे ठाण्यात भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन...


  ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान रेमंड ग्राउंड, ठाणे (पश्चिम) येथे क्रेडाई एमसीएचआय रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशनचे ठाण्यात भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.  या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.  ठाणे, २७ जानेवारी २०२३ : आपल्या स्वप्नातील घर असते व ते किफायतशीर किमतीत मिळू शकते असा विश्वास अनेक ग्राहकांचा क्रेडाई एमसीएचआय, ठाणे (CREDAI MCHI Thane) या रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशनवर आहे. या उद्देशाने 'प्रॉपर्टी २०२३ ठाणे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रेडाई एमसीएचआय, ठाणे या संस्थेतर्फेचा हा २०वा प्रॉपर्टी मेळावा असून ग्राहकांनी संस्थेवर दाखवलेला परिपूर्ण विश्वास याचे हे द्योतक आहे. या एक्स्पोमध्ये ठाण्यातल्या रिअल इस्टेटचा वाढता विकास व यश याचे सद्यस्वरुप दाखवण्यात येईल, अशी माहिती क्रेडाई एमसीएचआय, ठाणे, अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली.

ठाण्यातील रिअल इस्टेट मार्केट हे खरेदी व विक्रीच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित असून ठाण्यात आपले घर असावे, वेळेत घराचा ताबा मिळावा, अशी ग्राहकाची असलेली इच्छा येथे पूर्णत्वास येते. ही इच्छाच ठाण्यातील रिअल इस्टेटचे खरे स्वरुप दाखवते. प्रॉपर्टी २०२३, ठाणे हे प्रदर्शन आपल्या स्वप्नातले घर असावे याची परिपूर्ती करणारे असेल, असा विश्वास क्रेडाई एमसीएचआय, ठाणेचे माननीय सचिव मनिष खंडेलवाल यांनी व्यक्त केला.

तर क्रेडाई एमसीएचआय, ठाणे शाखेचे खजानीस गौरव शर्मा यांनी ठाणे शहर व परिसरात क्रेडाई एमसीएचआय, ठाणे शाखेवर ग्राहकांचा विश्वास असल्याचे मत व्यक्त केले. या प्रदर्शनात घरांच्या माहितीसोबत गृहकर्जाच्या विविध योजनाही ग्राहकांपर्यंत पोहचवल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रेडाई एमसीएचआय ठाणे शाखेचे एक्झिबिशन कमिटीचे संचालक संदीप महेश्वरी यांनी सांगितले की, आजपर्यंत झालेल्या १९ प्रदर्शनात (एक्स्पो ) ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. तसाच प्रतिसाद अपेक्षित धरून यंदाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ग्राहकाला आपल्या पसंतीच्या घराची निवड करता येणार आहेत. त्यासाठी एकाच प्रदर्शनात विविध रिअल इस्टेट ब्रँडचे प्रकल्प पाहता येतील. त्यामुळे ग्राहक विविध किमतींची विविध स्तरातील घरे पाहू शकतील..

या प्रदर्शनाच्या निमित्ताने क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे माजी अध्यक्ष अजय अशर म्हणाले की, गेल्या एक्स्पोनंतर प्रॉपर्टी मार्केटमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे आणि त्यामुळे एक सकारात्मक वातावरण व चैतन्य निर्माण झाले आहे. अशा एक्स्पोनंतर सहा महिन्यात त्याचे परिणाम दिसू लागतात. यंदा तशीच परिस्थिती राहावी व हे वातावरण केवळ प्रदर्शनाच्या चार दिवसांपूरते मर्यादित राहू नये अशी आमची इच्छा असल्याचे अशर म्हणाले. हे २० वे प्रदर्शन ठाण्यात होत असल्याने आपण आयोजक व ग्राहकांना शुभेच्छा देत असून ग्राहकांच्या मनातले घर या निमित्ताने साकार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे प्रदर्शन संपूर्ण वातानुकूलित हॉलमध्ये असून यामध्ये  सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे तसेच मोफत पार्किंगची सोय देखील करण्यात आली आहे तरी  नोंदणीसाठी 9833454053 या क्रमांकावर  मिस कॉल द्यावा असे प्रसार माध्यम समन्वयकः सुमित गुडका, जनरल मॅनेजर, क्रेडाई एमसीएचआय, ठाणे यांनी कळवले आहे. 


 ठाण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात सर्वात विश्वसनीय अशी 'क्रेडाई एमसीएचआय ठाणे या संस्थेची ओळख आहे. ग्राहकांना घर खरेदी व गृहकर्ज योजनांची माहिती देणे व त्यांना घरखरेदीसाठी साह्य करणे या उद्देशाने यंदाचे 'प्रॉपर्टी २०२३ ठाणे', हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. 'प्रॉपर्टी २०२३ ठाणे' हे प्रदर्शन क्रेडाई एमसीएचआय, ठाणे यांच्या सहकार्याने होत असून या प्रदर्शनात ठाण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील विविध डेव्हलपर्स, गृहकर्ज देणाऱ्या विविध प्रथितयश कंपन्या, संस्था, बँका यांचे प्रतिनिधी उपस्थित असतील.

ठाणे शहर हे सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेले असून हे शहर राहण्यासाठी अत्यंत सुरक्षित समजले जाते. ज्या ग्राहकांना ठाण्यात आपले घर असावे असे वाटत असेल त्यांच्या साठी 'प्रॉपर्टी २०२३ ठाणे' ही एक परिपूर्ण संधी आहे. हे प्रदर्शन 'क्रेडाई एमसीएचआय, ठाणे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आले असून ते ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी २०२३ अखेर असेल. या प्रदर्शनाचे स्थळ रेमंड ग्राऊंड, पोखरण रोड क्रमांक १, ठाणे पश्चिम येथे असे आहे. यंदा हे प्रदर्शन सुरक्षित व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या ठाण्यात आपले घर असावे अशी इच्छा बाळगणाऱ्या ग्राहकांना अनेक पर्याय पुढे ठेवणारे आहे.

सर्व सुखसोयीसुविधांनी आपले घर असावे व तसे ते उपलब्ध करून द्यावे. घराच्या किमती किफायतशीर असाव्यात, अशी ग्राहकांची इच्छा असते. अशा प्रकारच्या सर्व ग्राहकांच्या इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कोविड महासाथीनंतर संपूर्ण जग बदलले आहे. जीवनशैलीही बदलली आहे. अशा नव्या जीवनशैलीला अंगिकारत वेगवेगळ्या प्रकारची घरे 'प्रॉपर्टी २०२३ ठाणे' या प्रदर्शनात पाहायला मिळतील. सद्य परिस्थिती पाहता या प्रदर्शनाला सर्वांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. 'प्रॉपर्टी २०२३ ठाणे' या प्रदर्शनाला भेट देणारा ग्राहक हा पुढे जाऊन आपल्या स्वप्नातील घर खरेदी करेल असा विश्वास या निमित्ताने या प्रदर्शनात उभे करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.


 गेल्या काही प्रदर्शनानंतर आमच्या लक्षात आलंय की अशा प्रदर्शनानंतर रिअल इस्टेट मार्केटमध्ये एक ऊर्जा निर्माण होते. त्याने केवळ सकारात्मकता निर्माण होत नाही तर पुढील ६ महिन्यात अनेक व्यवहारही पूर्णत्वास येत असतात. यंदाही असाच परिणाम मिळावा व प्रदर्शनाचे ४ दिवस नव्हे तर गृहखरेदीचे वातावरण प्रदीर्घ काळ लांबत जावे असा आमचा प्रयत्न आहे. विश्वास, हा महत्त्वाचा मुद्दाः अशा प्रकारच्या प्रदर्शन आयोजनामागे केंद्रबिंदू असतो तो विश्वास. घर किंवा गृहकर्ज याच्या पलिकडे जाऊन प्रॉपर्टी मार्केटचा विश्वास महत्त्वाचा असतो. रिअल इस्टेटच्या निमित्ताने आयटी/आयटीइएस/रिटेल/लॉजिस्टिक्स/डेटा सेंटर्स व अन्य क्षेत्रांमध्ये मागणी वाढते. ही बाजारपेठ पाहता ठाणे प्रॉपर्टी व होम फायनान्स एक्स्पो हे ठाणे व परिसरातील रिअल इस्टेट डेव्हलपर्स व हाउसिंग फायनान्स कंपन्यांना त्यांच्या व्यवसायासाठी एक संधी उपलब्ध करून देते. अशी माहिती क्रेडाई एमसीएचआय, ठाणेचे अध्यक्ष  जितेंद्र मेहता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

अशा प्रकारचे एक्स्पो भरवण्यामागचे एक कारण आहे की, आमच्यावर दाखवलेला विश्वास. या विश्वासापोटी ठाणे शहराचे वैभव अधोरेखित करणे, हे शहर राहण्यायोग्य अत्यंत सुरक्षित आहे, असा संदेश लोकांपर्यंत पोहचवणे हा आमचा उद्देश आहे. क्रेडाई एमसीएचआय ठाणे शाखेने पहिल्यापासून हा उद्देश ठेवला होता. हा उद्देश अत्यंत पारदर्शी व प्रामाणिकपणे असल्याने त्यावरचा विश्वासही वृद्धिंगत होत गेला. ३६०° रिअल इस्टेट सोल्युशन्स: क्रेडाई एमसीएचआय, ठाणे शाखेच्या पहिल्या एक्स्पोमध्ये ३६०° रिअल इस्टेट सोल्युशन्स अवलंबल्याने विविध स्तरावरचे रिअल इस्टेट डेव्हलपर्स व सर्व प्रकारचे ग्राहक यात सामावून घेता आले. प्रगतीः यंदाचे हे एक्स्पो संपूर्णतः डिजिटल असून ते २४/७ कार्यरत राहील. या एक्स्पोने काळानुरुप कसे बदल अंगिकारले याचा हा वस्तूपाठ असून भविष्यातील बदलही स्वीकारत जाऊ असा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक वर्षांगणिक क्रेडाई एमसीएचआय, ठाणे शाखेच्या यशात वाढ होत आहे. यंदा हे प्रदर्शन ३ ते ६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान, रेमंड ग्राउंड, ठाणे (पश्चिम) येथे होत असून ते अजिबात चुकवू नका. या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या असे आवाहन जितेंद्र मेहता यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com