मुलगा शाळेतून फार चिडून घरी येतो
आई : काय झालं, बाळा फार रागात दिसतोस?
मुलगा : मी उद्या पासून शाळेत जाणार नाही.
आई : बाळ काय कारण आहे, मला सांग.
मूलगा : आज गुरुजींनी SC, ST, OBC कोण आहेत, ते विचारले आणि सांगितले, त्यांना शिष्यवृत्ति दिली जाईल आणि भविष्यात यांना आरक्षण मिळेल. त्यात त्यांना माझ्यापेक्षा कमी मार्क असेल तरी त्यांना नोकरी मिळणार आणि मला नाही.
आपण गरीब असून आपल्याला काही नाही आणि माझे मित्र गरीब नसून त्यांना आरक्षणाचा फायदा, जर असंच आहे तर, मी शाळेत जाऊन काय फायदा?
आई : अरे! बाळा तू नुसतं हा अन्याय ऐकला तरी, तुला एवढा राग आला. विचार कर, त्यांनी तर हजारो वर्षे या पेक्षाही भयंकर अन्याय सहन केलाय, त्यांना काय वाटले असेल.
मुलगा : पण आई ते गरीब नसतांना सुद्धा त्यांना फायदा?
आई : बाळा याचंं गरीबी आणि श्रीमंततीशी काही देणे घेणे नाही.
हा सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा कार्यक्रम आहे.
मुलगा : म्हणजे?
आई : शिवाजी राजे माहित आहेत, त्यांचा राज्याभिषेक करायला एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातला एकही पंडित तयार नव्हता, ते राजे होते त्यांच्याकडे विपुल धन होते तरी सुद्धा.
मुलगा : आई असे का?
आई : कारण शिवाजी राजांना आपला धर्म शुद्र मानित होता आणि धर्मानुसार शुद्र राजा बनु शकत नाही...
मुलगा : आई हे फार जुने झाले.
आई : बाळा, त्या नंतर दोनशे वर्षानी महात्मा फुले झाले. त्यांच्याकडेही भरपूर शेती होती, वाडा होता. त्या काळचे श्रीमंत ठेकेदार होते, ज्यांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाचे काम, तसेच अनेक मोठी धरणे बांधली. तरीही त्यांच्या मित्राच्या लग्नातून त्यांना ब्राम्हणांनी अपमानित करुन हाकलुन दिले. त्याचप्रमाणे शाहु महाराजांचाच नोकर, त्यांना शुद्र असल्यामुळे वेदोक्त मंत्र ऐकविण्यास नकार देतो. सांग बघू, हे गरीब होते? या दंतकथा नाहीत बाळा, आजपासून दोनशे-तीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.
मुलगा : इतिहासाचे मला काही देणे घेणे नाही, आत्ताचे सांग आणि जे इतिहासात झाले, त्या करीता दहा वर्षांचे आरक्षण दिले होते...
आई : बाळा,जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत, त्यामुळे इतिहासाची चेष्टा करू नकोस आणि कुठे आरक्षण किती वर्षे द्यायचे हे लिहीले नाही. ज्या वेळेस लोग जातिभेद विसरून एकत्र गुण्यागोविंदाने नांदतील, तेव्हा हे आरक्षण समाप्त करता येईल. जर भविष्यात तुला किंवा कुणाला आरक्षण संपवायचे असेल तर, जाती संपवा आरक्षण आपोआप संपेल.
"#जाती_आहेत_म्हणून_आरक्षण_आहे"
मुलगा : आई, परत तेच जुने उदहारण देत आहेस. मी रोज इकडे तिकडे वावरतो मला कुठे ही जातीयवाद दिसत नाही...
आई : बाळा हा आजचा जातीयवाद आहे, हा डोळ्याने दिसत नाही फक्त जाणवतो.
मुलगा : कसं काय?
आई : आपल्या राज्याचा मुख्यमंत्री कोण? फडणवीस! जेव्हा मतं देणारे सर्वात जास्त लोक, कार्यकर्ते सर्व SC, ST, OBC जे देशात 85% आहेत. पण मुख्यमंत्री आणि इतर खास मंत्री कोण? जे देशात सामाजिक दृष्ट्या फक्त 3% आहेत ते. हे चित्र फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर, इतरही राज्यांत आहे.
जनता SC, ST, OBC, जास्तीत जास्त निवडून येणारे आमदार SC, ST, OBC व 50% महिला आणि मुख्यमंत्री कोण ब्राह्मण, वित्तमंत्री कोण वैश्य, हे कधीच SC, ST, OBC तसेच महिलांना पुढे येऊ देणार नाहीत. म्हणून हक्काची जागा असावी म्हणून आरक्षण आहे बाळा.
मुलगा : मला राजकारणातील उदहारण नको देऊ.
आई : नोकरीत तेच आहे बाळा, नोकरीची मुलाखत घ्यायला पण सवर्ण जातीचेच लोक असतात. SC, ST, OBC च्या विद्यार्थाने परीक्षेत मेरिट आणले, तरी मुलाखतीत कमी मार्क देऊन फेल करतात. त्यासाठी हक्काची जागा म्हणून SC 13%, ST 7% आणि 52% OBC असतांना सुद्धा 27% आरक्षण आहे, कारण की हक्काची जागा असावी म्हणून...
मुलगा : छे असं कधी होईल का?
आई : बाळा मंत्रालयात, न्यायालयात किंवा खाजगी क्षेत्रांतही, एवढा मोठा समाज असून बोटावर मोजण्याइतके SC, ST, OBC लोक नोकरीवर आहेत, आणि देशाच्या सर्वच मोठ्या पदांवर हेच बामण आहेत. जणू काय देशात हेच शिकतात.... तेच फेसबूक- व्हाट्स अँपवर आरक्षणाविषयी खोटा प्रचार करून, लोकांची माथी भडकावण्याची कामे करतात..
मुलगा : तू माझी आई असून माझ्याच विरोधात बोलत आहेस...
आई : बाळ, मला एवढे माहित आहे खाल्या मिठाला जागावे...
मुलगा : मी समजलो नाही आई!
आई : *बाळा, या देशात शूद्रासारखे हाल होते आणि आहे स्त्रीचे. मग ती कोणत्याही जाती धर्माची का असो, गरीब असो या श्रीमंत,* जसे SC, ST, OBC लोकांचे आहे...
हिंदू धर्मानुसार स्त्रीचा तसेच SC, ST, OBC यांचा जन्म मनुच्या पायातून झाला, म्हणून स्त्री मग ती कोणत्याही जातीची असो, तसेच SC, ST, OBC हे शुद्र.
SC, ST, OBC यांना जसे आजही गुलाम या नजरेने पाहिले जाते, तसेच स्त्री कडेही उपभोगाची वस्तू व मुलं जन्माला घालणारी (गुलाम) मशीन या नजरेने बघून, तिने आजही दहा दहा मुलांना जन्म द्यावा, या मानसिकतेच्या युगात आहे.
बाळ, नवरा मेला की त्या विधवेला जिवंत जाळले जात असे, नवऱ्याच्या चीतेवर. त्याला सती म्हणतात किंवा टकली विद्रूप करुन ठेवत असत, अंधाऱ्या खोलीत. शिक्षण घ्यायला मनाई. मंदिरात प्रवेश नाही. चुल आणि मूल हेच काम. जणू काही आम्ही निर्जीव उपभोगाच्या वस्तुच...
मुलगा : काय सांगतेस आई? आज हे असतं तर उभ्याने पेटवून दिल असतं, त्या धर्मग्रंथाला आणि त्या धर्माला...
आई : एका महामानवाने तेच केले, तो तथाकथित धर्मग्रंथ रायगडाच्या पायथ्याशी उभ्याने पेटविला...
मुलगा : आई कोण होते ते?
आई : तेच ज्यांनी संविधान लिहीले, मागासलेल्यांना आरक्षण दिले आणि स्त्रियांना सुद्धा पुरुषांबरोबर हक्क दिले, ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर!
मुलगा : आई मी खरच चुकलो. माथेफिरू आणि असामाजिक तत्वांच्या नादी लागून, व्हाट्स अँप- फेसबुक वरील अर्धवट चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या मेसेजेस मुळे माझी वाट चुकली होती, मी भरकटलो होतो...
आई : बाळा, मी त्या संविधानाने दिलेल्या हक्कांमुळे शिकले आणि तुला आज रितसर समजावू शकले.
मुलगा : ज्या संविधानाने आज माझ्या आई-बहिणीला व माझ्या SC, ST, OBC मित्रांना कायदेशीर हक्क दिले, ते संविधान चुकीचे असूच शकत नाही.... कारण हे आरक्षण नसून प्रतिनिधीत्वाचा (Right To Representation) अधिकार आहे. कारण या सर्व SC, ST, OBC, तसेच स्त्री मग ती कोणत्याही जातीची असो, या समाज घटकांना प्रतिनिधीत्व नाकारले होते हजारो वर्षे, आता ते मिळू लागलंय, म्हणून पोटशूळ...
कारण आरक्षणाला 60 वर्षे झाली, 2500 वर्षे तर आरक्षण नव्हते...
परंतु देशाचा विकास गेल्या 60 वर्षातच झालाय.
आरक्षण नव्हते तेव्हाच देशाचा व्हावयास हवा होता...
जे कुणी म्हणतात की, आरक्षणाने देश बर्बाद होत आहे, तर अरबो-खरबो चे घोटाळे झाले, ज्याने पूर्ण देश पोखरुण निघाला आहे, त्यात घोटाळा करणाऱ्या लोकांत किती आरक्षण घेणारे लोक आहेत?
आधी जाती मिटवा, मग खुशाल आरक्षण हटवा!
0 टिप्पण्या