Top Post Ad

ठाण्यात १४ जानेवारीला महारोजगार मेळावा


 ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्र आणि आसपासच्या परिसरातील बेरोजगार युवक-युवतींसाठी माजी उपमहापौर व ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख नरेश मणेरा आणि महायुवा फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने येत्या १४ जानेवारी, २०२३ रोजी भव्य महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. घोडबंदर रोड विभागातील आनंदनगर-कावेसर येथील न्यू होरायझन स्कॉलर स्कूल येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. 

या महारोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील सुमारे ५० कंपन्या, बँका, आस्थापना संस्था आदि सामील होणार असून त्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, जितेंद्र व्हील्स, हयात, केएलटी, टेलीपरफॉरमन्स, ग्रेटर बँक, युरेका, एआयटीएम, ताज सेट्स, टेक महिंद्रा, पेटीएम, जस्ट डायल, अमेझॉन, एअरटेल, आयसीआयसीआय, अँप्पल, व्ही फाईव्ह, आजी केअर, युरेका फोरबेस लि., सेक्युर क्रेडीशनल, अटॉस, कोटक बँक, क्वेस, मनीटॉक, अँड्रोमेडा, महिंद्रा फायनान्स, ओएलएक्स, सोलफ्लॉवर, इनऑक्स, फूडअड्डा, सीसीडी, क्यू कनेक्ट, इनफिनिटी स्मार्ट, टेलीएक्सेस, क्राफ्ट वर्ड, अथेना, सीटूसी, टॉक टॉक, पिपल चॉईस, इबीक्स कॅश, फ्लायनान्स, रिलायन्स, बिग बास्केट आदींचा समावेश आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्येकर्ते माजी उपमहापौर नरेश मणेरा यांच्या मार्गदर्शनखाली हा महारोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी करीत आहेत. या महारोजगार मेळाव्यात दहावी ते पदवीधर, उच्चशिक्षित तसेच कुशल-अकुशल, फ्रेशर्स व अनुभवी बेरोजगारांसाठी सुमारे ५००० विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध असून जास्तीत-जास्त बेरोजगार युवक युवतींनी या महारोजगार मेळाव्यात नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन या मेळाव्याचे आयोजक माजी उपमहापौर व ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख नरेश मणेरा यांनी केले आहे.

          या महारोजगार मेळाव्यामध्ये दहावी ते पदवीपर्यंत आणि त्यापुढील इंजिनीअरिंग, एमबीए, टेकनिकल आदि उच्च शिक्षण घेतलेल्या तसेच या महारोजगार मेळाव्यामध्ये दहावी ते  पदवीपर्यंत आणि त्यापुढील इंजिनिअरिंग, एमबीए, टेकनिकल आदी उच्च शिक्षण घेतलेल्या तसेच कुशल-अकुशल, फ्रेशर्स व अनुभवी बेरोजगारांसाठी पात्रतेनुसार विविध नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच मेळाव्याच्या ठिकाणी सहभागी कंपन्या आस्थापनांतर्फे बेरोजगारांच्या थेट मुलाखती घेऊन त्यांना ऑन द स्पॉट नोकरीची नियुक्तीपत्रे  देण्यात येणार आहेत. या महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.nareshmanera.com या वेबसाईटवर किंवा  http://bit.ly/SHIVSENATHANE   या लिंकवर जाऊन नोकरीसाठी ईच्छूक बेरोजगारांनी आगाऊ नोंदणी करावयाची आहे. ज्या उमेदवारांना अशाप्रकारे नोंदणी करता आली नसेल अशांसाठी प्रत्यक्ष महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी फॉर्म भरून नोंदणी करण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. 

 या महारोजगार मेळाव्यामध्ये असणाऱ्या नोकरीच्या संधीची माहिती देण्यासाठी आणि मुलाखत कशी द्यावी आणि मुलाखतीला येतांना काय-काय सोबत आणावे याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी १३ जानेवारी, २०२३ रोजी न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, आनंदनगर-कावेसर, घोडबंदर रोड याठिकाणी दुपारी ०३.०० वा. एका मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून त्यामध्ये नामांकीत कौन्सिलर मार्गदर्शन करणार आहेत. या भव्य महारोजगार मेळाव्याचे उद्धाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे शुभहस्ते होणार असून शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, खासदार राजन विचारे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार  असल्याची माहिती नरेश मणेरा यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com