Top Post Ad

ठाण्यातील हुक्का पार्लरकडे प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

ठाण्यातील हुक्का पार्लरबाबत ठाण्याचे लोकप्रिय आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित करून याबाबत तात्काळ कारवाईची मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी याची दखल घेत यावर तात्काळ करवाई करण्यात येईल असे आश्वासनही दिले होते. मात्र सत्ताधारी पक्ष असून देखील याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ठाण्यातील हुक्का पार्लरच्या हैदोसाचा प्रश्न महाराष्ट्राने पाहिला. मात्र ठाण्यातील पोलिस आणि मनपा प्रशासने अद्यापही याकडे दुर्लक्ष केल्याने ठाण्यातील तरुणाई बिघडत आहे. यास जबाबदार कोण असा प्रश्न आता ठाणेकर विचारत आहेत. 


 मानपाडा येथील ऑस्कर हॉस्पिटल शेजारी असलेला hangout हुक्का पार्लर कशा तऱ्हेने सुरु आहे याचे प्रत्यक्ष चित्रणच आमच्या प्रतिनिधीने केले आहे. या पार्लरमध्ये रात्रभर कशा तऱ्हेने तरुणांई नशेमध्ये झिंगत आहे याचे प्रत्यक्ष दर्शन या चित्रणातून दिसत आहे. मात्र तरीही याकडे प्रशासन कानाडोळा करीत आहे. 

 

चिंताळसर मानपाडा पोलीस स्थानक हद्दीतील कोठारी कंपाउंड येथे MH04 हा क्लब हुक्का पार्लर आहे. सदर हुक्का पार्लर वर काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेची धडक कारवाई झाली होती.  त्यावेळी हा हुक्का पार्लर सील करणयात आला होता. परंतु कारवाईच्या काही दिवसानंतर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आणि अंतर्गत आर्थिक व्यवहारामुळे आता पुन्हा एकदा तंबाखू जन्य हुक्का पार्लर क्लब रात्रभर जोरात सुरू असताना दिसत आहे अल्पवयीन तरुण तरुणी इथे रात्रभर धिंगाणा घालताना दिसत असतानाही  प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.  यावर गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी परिसरातील जनता करीत आहे.

 वर्तकनगर प्रभाग समिती हद्दीतील अनधिकृत क्लब आणि हुक्का पार्लर ज्यांच्यावर सचिन बोरसे तसेच महेश आहेर यांनी कारवाई करण्यात आली होती. कोठारी कंपाउंड मानपाडा हे सर्व क्लब आता सर्रास सुरू आहेत रात्रभर तरुणाई धिंगाणा घालते. फायरची पावनगी नसताना ही सर्रास सुरू आहेत.  त्यात MH04, Hangout cafe, The Sacret यांचा तसेच सम्राट लॉज बोर्डिंग यावर सुद्धा तोडक कारवाई करण्यात आली होती. परंतु आता सर्रासपणे हे पार्लर सुरू आहेत.   रात्रभर नशेच्या बाजार सुरू.यावर प्रभाग समिती अधिकारी ना कळवण्यात असून सुद्धा कारवाई केली जात नाही यावर  योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील जनता वारंवार करीत आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ठाणेकरांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com