Top Post Ad

'रामभक्त'... त्रेतायुगातला आणि कलियुगातला


 त्रेतायुगातल्या रामायणात आपली 'रामभक्ति' सिद्ध करण्यासाठी 'हनुमाना'ने, आपली छाती फाडून दाखवली; तर, तिथे 'रामसीते'ची मूर्ति दिसली होती, म्हणे! 

सध्याच्या कलियुगात अयोध्येतल्या राममंदिर-बांधणीमुळे उत्तर भारतातली राजकीय परिस्थिती, २०२४च्या लोकसभा-निवडणुकीसाठी 'भाजपा'ने... एवढी जाणिवपूर्वक उन्मादपूर्ण बनवून ठेवलीय की, प्रत्येक अंधश्रद्धाळू उत्तर भारतीयाने हनुमानासारखी छाती फाडून दाखवली; तर, तिथे अयोध्येतलं 'राममंदिर' दिसेल, इतपत! 

पण, काॅम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्टच्या एकामागोमाग एक, अनेक विंडोज् उघडलेल्या असतात; पण, आपल्याला सगळ्यात पुढची उघडलेली 'विंडो' फक्त दिसते, मागच्या दिसत नाहीत... तसंच, त्या 'राममंदिरा'च्या मागे दडलेला भाजपाई 'बुलडोझर' मात्र, आपल्याला दिसणार नाही... जो, कालपरवापर्यंत उत्तर भारतीय 'मुस्लिम' जनसमुदायाच्या घरादारांवर फिरत होता आणि आता, तो हिंदुंना परमपवित्र असलेल्या 'चारधाम'च्या बद्रीकेदार परिसरातील 'जोशीमठ' शहरातल्या असहाय्य हिंदुंच्या घरादारांवर पण, फिरायला लागलाय!

"भाजप धुरिणांसारख्या (विशेषतः, 'गुजराथी-लाॅबी') 'भांडवलदारांना, ना कुठला 'धर्म' असतो... ना कुठला 'देश'! त्यांना असतो फक्त, आपल्या उद्योगधंद्यांचा उघडानागडा, घृणास्पद स्वार्थ आणि त्यातील, राक्षसी नफ्याचा सैतानी हव्यास!"

राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com