Top Post Ad

जगविख्यात भदन्त अजाय जयासारो महाथेरो यांची मुंबईत धम्मदेसना


'ग्लोबल मेता फाऊंडेशन'च्या वतीने मुंबईत शिवाजी मंदिर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन

 


आपल्या धम्मदेसनेच्या माध्यमातून जगाला शांतीच्या सूत्रात प्रस्थापित करण्याकरिता जगविख्यात भदन्त अजाय जयासारी महाथेरो सध्या जगभर चारिका करीत आहेत. या आपल्या उपक्रमांतर्गत ते  थायलंड येथून भारत भेटीसाठी येणार आहेत. या भेटीदरम्यान ते विशेषकरून महाराष्ट्र मुंबईमध्ये बौद्ध धर्माच्या अनुयायांना भेट देणार आहेत. विदेशातून येणारा भिक्खू संघ अथवा भन्ते केवळ बुद्धगया, सारनाथ अथवा कुशीनारा अशा ठिकाणीच भेटी देत असतात. मात्र यावेळी भदन्त अजाय जयासारी यांचे विशेष धम्म प्रवचन मुंबईकरांसाठी ऐकायला मिळणार आहे. याबाबत अधिकृतरित्या माहिती देण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे मेत्ता ग्लोबल फाऊंडेशनच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक विजय कदम यांनी या परिषदेत ही माहिती दिली.  यावेळी संस्थेच्या विश्वस्त सदस्या सोनाली रामटेके उपस्थित होत्या.

 रविवार दिनांक १५ जानेवारी रोजी दादर येथील शिवाजी मंदिर येथे  ग्लोबल मेत्ता फाउंडेशन' या संस्थेच्या वतीने भदन्त अजाय जयासारी यांच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच याप्रसंगी भन्ते अजाय जयासारो यांचे धम्मावर आधारित  मराठी अनुवाद केलेल्या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाला महाउपासक हर्षदीप कांबळे तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही कदम यांनी सांगितले. यावेळी   भिक्खू संघासाठी चिवरदानाचे आयोजन करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर  भन्ते अजाय जयासारो यांची धम्मदेसना होईल.


यावेळी होणाऱ्या चीवरदान सोहळ्यामध्ये उपासकांना स्वहस्ते चिवरदान करून सहभागी होता येणार आहे. ज्या उपासकांना चिवरदान कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी कृपया खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आपले नाव नोंदवावे. आपण स्वतः चिवर घेऊन येणार असल्यास त्याची माहिती संस्थेस नोंदणी करतानाच देण्यात यावी. ज्यांची चिवरदान करण्याची इच्छा आहे परंतु आर्थिक अडचण आहे अश्या उपासकांना 'ग्लोबल मेता फाऊंडेशनतर्फे मोफत चिवर उपलब्ध करून दिले जाईल. या कार्यक्रमाची वेळ दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत राहील असेही कदम यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमासाठी पांढरे शुभ वस परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती ग्लोबल सेता फाऊंडेशनतर्फे डॉ. विजय कदम यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com