Top Post Ad

कळवा रुग्णालयातील सफाई घोटाळा ...


प्रत्यक्ष कर्मचारी १०८, हजेरीपटावर १८० आणि ठामपाच्या पटलावर २२८... 

 काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच  सफाईचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश देखील संबंधित विभागाला दिले होते.   रुग्णालयाच्या सफाईसाठी १८० कर्मचारी असताना हजेरीपटावर १०८ कर्मचारीच आढळून आले असल्याची बाब त्यावेळेस उघडकीस आली होती. मात्र याहीपेक्षा भयंकर प्रकार म्हणजे मागील सहा महिन्यापासून ठाणे  महानगर पालिकेने या रुग्णालयातील सफाई कामगाराचा ठेका कोणालाही दिला नसल्याचे समजते. तसेच या ठिकाणी १८० कर्मचारी नसून २२८ कर्मचाऱ्यांची नोद आहे.  मग रुणालयातील सफाई कर्मचाऱ्यांबाबत आयुक्तांनी कोणावर कारवाई करण्याचे आदेश दिले असा प्रश्न आता ठाणेकर विचारत आहेत.

याबाबत अधिक माहिती घेतली असता असे आढळून आले आहे की,  १ एप्रिल ते ३१ सप्टेंबर २०२२ या कालावधीत या ठिकाणी साफसफाई करणारे कर्मचारी यांचे वेतन, मानधन ठाणे महानगर पालिकेच्या वतीने अदा करण्यात आलेले नाही. या कालावधीत कोणत्याही प्रकारचा ठेका कोणालाही देण्यात आलेला नाही तसेच सदर ठेक्याची नस्ती प्रस्तावित असल्याची माहिती ठाणे महानगर पालिकेने माहिती अधिकारात दिली आहे. तसेच या ठिकाणी कार्यरत असलेल्या एकूण कर्मचाऱ्यांची माहिती मागवली असता यामध्ये २२८ कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती देखील ठाणे महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे

  अशा तऱ्हेने या रुग्णालयात सफाई भ्रष्टाचार मागील अनेक वर्षापासून सुरु असल्याचेही येथील काही कामगारांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. या ठिकाणी केवळ काही कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेतले जाते. आणि हजेरीपटावर मात्र २२८ कर्मचारी दाखवून ठाणे महानगर पालिकेकडून त्यांचे मानधन लाटले जाते. मागील अनेक वर्षापासून सुरु असलेला या भ्रष्टाचारामागे कुणाचा वरदहस्त आहे. कोणता नेता या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे याचा शोध घेऊन त्यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

१५ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठामपा, ठाणे येथे ,मा.आयुक्त, प्रशासक यांचा पहाणी दौरा झाला, त्यावेळी रुग्णालय हजेरी मस्टरवर १८० सेवक कार्यरत असल्याची नोंद,  प्रत्यक्षात १०८ सेवक कार्यरत, आणि ठाणे महानगर पालिका माहिती अधिकारात २२८ कर्मचारी असल्याचे सांगते या सर्वांमध्ये काय गौडबंगाल आहे हे आता आयुक्तांनी स्पष्ट करावे. प्रत्यक्ष आयुक्तांच्या पाहणीत आढळून आलेल्या संख्येप्रमाणे १८० -१०८ =७२ कर्मचाऱ्यांचे पगार कोणाच्या खिशात जातात. त्याही पलिकडे २२८ कर्मचारी असताना मग केवल १०८ कर्मचारी कामावर हजर तर १२० कर्मचाऱ्यांचे मानधन कोण कोण वाटून घेतो याबाबत आयुक्तांनी तात्काळ खुलासा करावा  तसेच विशेष लेखापरीक्षण अहवाल आदेशीत होऊन दोषींवर  प्रशासकीय सेवेत आपले कर्तव्य बजविण्यात दप्तर दिरंगाई, बेजबाबदारपणाचा कसुर केला असल्याचे गुन्हे दाखल करावे. आणि या सर्वांवर विनाविलंब फौजदारी गुन्हा दाखल होणे क्रमप्रात्र असल्याचे मत ठाणेकरांनी व्यक्त केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com