Top Post Ad

शिवसेनाप्रमुखाच्या जयंतीदिनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीचे बिगुल वाजले


 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्याचे बिगूल वाजले आहे. वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी  आज एकत्र येत नव्या युतीची घोषणा केली. या युतीमुळे राज्याच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तसेच घटनेचे महत्व आणि पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. 

शिवसेना आणि वंचित बहुजन आगाडी यांच्या युतीची गेल्या काही दिवसांपासन चर्चा होती. आज अखेर या युतीची घोषणा झाली. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तसेच घटनेचे महत्त्व आणि पावित्र अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आंबेडकर यांनी स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमच्या युतीची चर्चा सुरू होती. काही बैठका झाल्या. युतीची घोषणा करायचा निर्णय फक्त बाकी होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ती घोषणा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे या युतीमध्ये आल्यास त्यांचे स्वागत असेल असेही ते म्हणाले.. 

 उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले की, आमचे आजोबा एकमेकांचे सहकारी होते. त्यांनी वाईट प्रथांवर प्रहार केले. सद्या राजकारणातही वाईट प्रघात सुरू आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहॉत, असे त्यांनी स्पष्ट केले. देशात जे वातावरण सुरू आहेत  देश हुकूमशाहीकडे चालला आहे. जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. संभाव्य संकट रोखण्यासाठी ही युती असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. काल परवा पंतप्रधान मोदी मुंबईत येवून गेले. निवडणुका आल्यावर गरीबांचा ते उदोउदो करतात. गरीबानी मते दिल्यानंतर त्यांची उड्डाणं सुरू. हे थांबायला हवे यासाठी ही युती महत्वाची असल्याचे ठाकरे म्हणाले. 

दादर पुर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेत युती झाल्याचे जाहीर केले. मात्र आता वंचित बहुजन आघाडीला (VBA) महाविकास आघाडीमध्ये (MVA) सामील करुन घेणार याची देखील जोरदार चर्चा रंगली आहे. आजच्या पत्रकापरिषदेत उद्धव ठाकरे यांनी वंचितने मविआचा घटक म्हणून वाटचाल करायला हरकत नाही असे म्हटले. त्यामुळे वंचितला देखील मविआत आणण्याबाबत ते उत्सुक असल्याचे दिसून आले.

सन २०१९ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षात कोसळले आणि शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. या सरकारला आता सहा महिने झाले.

शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी पडझड झाली आणि शिवसेना दोन गटांमध्ये विभागली त्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रीत येत युतीची घोषणा केली. मात्र शिवसेना महाविकास आघाडीचा घटकपक्ष असल्याने आता वंचित देखील महाविकास आघाडीत सहभागी होणार का याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आजच्या पत्रकारपरिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आणि आमचे शेतावरुन भांडण नसल्याचे म्हणत राजकारणात काहीही होऊ शकते याकडे लक्ष वेधले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मविआचा घटक म्हणून वाटचाल करायला हरकत नाही असे म्हणत एक प्रकारे त्यांना मविआत येण्याचे निमंत्रणच दिले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून मात्र तशी अधिकृतपणे कोणतीही चर्चा झालेली नाही. शरद पवार यांची काय भूमिका असेल याबाबत अद्याप काही चित्र स्पष्ट झालेले नाही. दरम्यान शरद पवार आणि आमचं शेताच भांडण नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमच्या युतीचा स्विकार करेल असे देखील म्हटले. तर उद्धव ठाकरे यांच्या मविआच्या दिशेने वाटचाल करा या विधानामुळे उद्धव ठाकरे आता वंचितला महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार का ? अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान शरद पवार यांनी शिवसेना वंचितच्या युतीबाबत प्रतिक्रीया देताना मला यातील काही माहिती नाही असे विधान केले आहे. त्यामुळे पुढे महाविकास आघाडीत वंचितला सामावून घेण्यासाठी शरद पवार अनुकूल होतील का हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे


एकाबाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत शिवसेनेवर उभा दावा टाकला आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात सध्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात संघर्ष सुरु आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा समावेश महाविकास आघाडीत की फक्त ठाकरे गटाशी युती याबाबतचा निर्णय उध्दव ठाकरे यांनी घ्यायचा आहे असे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणार नसल्याचे स्पष्ट होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला नाकारलं आहे. वंचित आघाडीने फक्त दलितांपुरतं मर्यादित राहावं. ओबीसी आणि गरीब मराठा यांच्यासंदर्भात आम्ही बोलू नये, ही काँग्रेस-राष्ट्रवादीची अट आहे. ती आम्ही मान्य करण्यास तयार नाही. तसेच, आम्हाला तिसरं इंजिन जोडणार आहे, असं एकनाथ शिंदे मुंबईतील भाषणात बोलले होते. हे तिसरं इंजिन राष्ट्रवादी आहे, की मनसे याचा खुलासा एकनाथ शिंदे करतील, असेही ते म्हणाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com