महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचे, संत महापुरुषांचे जन्मस्थान आहे. अनेक संत,महापुरुष या मातीत जन्माला आले आणि विषमतावादी, द्वेषवादी, अन्याय कारी व्यवस्था नाकारुन अंधश्रद्धा, अज्ञान दुर जागृत समजासोबत समता, बंधुता न्याय आणि स्वातंत्र्यावर आधारित समाज रचना उभी करून माणसामध्ये माणुसकी ची जाणीव करून दिली. परंतु या चळवळीला या क्रांतीला तेव्हाही विरोध होत होता, आजही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोध होत आहे. विषमता, द्वेष, भेदभाव करणाऱ्यांना येथे आजही प्राधान्य आहे तर सर्व समावेशक, समाज, आणि देशाचा विचार करणाऱ्यांना येथे आजही डावलले जाते. सत्य लपवून चुकिच्या मुद्यांवर चर्चा करण्यात येथे धन्यता मानली जाते. ज्या विषयाला कोणताही आधार नाही त्या विषयाला धर्म व भावनेशी जोडून माणसा माणसामध्ये, धर्माधर्मामध्ये दुरावा, विषमता निर्माण करून जनहिताच्या प्रश्नावरून लक्ष दुर करून राजकीय पोळी भाजली जाते.
आज आपण विचार केला तर महागाई, शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेतमाल भाव हे विषय सोडून कधी कोणता विषय चर्चेचा वा वादाचा होईल सांगता येत नाही. ज्यांनी कधी इतिहासाची पुस्तके पाहली नाही ती लोक इतिहासाची मोडतोड करून चुकिचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. धर्म, रंग, इतिहास हेच आज महत्त्वाचे व जिव्हाळ्याचे प्रश्न झालेले दिसतात. बर इतिहासावर बोलताना सुद्धां विषमता आणि भेद दिसून येतात. राजकारण ही देशाच्या विकासाची मुख्य चाबी असते. परंतु आजचे जर राजकारण बघितले तर एवढे खालच्या पातळीवर गेले आहे की देशाचा विकास सोडा निवडून आलेले प्रतिनिधी स्वतः च्या मतदार संघात फिरत नाही, मतदार संघाचा विकास करत नाहीत. आधार नसलेल्या मुद्यांना मात्र सभागृहात समर्थन देणारे लोकप्रतिनिधी मतदार संघातील समस्या सभागृहात मांडताना दिसत नाहीत.
फक्त प्रत्येक गोष्टीचे राजकारण करून सभागृहाचा वेळ व पैसा खर्च करण्याचा कार्यक्रम सुरू आहे म्हणूनच महागाई, बेरोजगारी, नियंत्रणात येत नाही आणि शिक्षण, आरोग्य सुविधा मिळत नाहीत. राजकीय लोकांनी वरिल महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करायची तर ते रंगावर,धर्मावर, चर्चा करून जनहिताचा थोडाही विचार करत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही आधार नसलेल्या विषय हे एवढे जोर लाऊन धरतात कि अक्षरशः ग्रामीण भागातील लोक सुद्धां आता राजकीय नेत्यांची टिंगल टवाळी करून यांना दुसरे कामच नाहीत म्हणून दुर्लक्ष करीत आहेत. परंतु धर्माच्या नावावर, काही तरुणांचे डोक्यात फक्त भावना भरल्या आहेत ते तरुण काहिही झाले तरी दोन गटात दुरावा निर्माण कसा होईल यावर च चर्चा करत असतात. राजकीय नेते आणि राजकारण यांच्या मधून हल्ली देशाचा विकास आणि जनकल्याण हे शब्द लुप्त होताना दिसत आहेत. राजकीय नेते व राजकारण यामधून धार्मिक तेढ निर्माण करून लोकांचे लक्ष समस्येवरुन दुसरीकडे वळवून भेदभाव कसा केला जातो हे सर्वांना माहिती आहेच पण विचार केला तर अर्थहीन चर्चेला किती महत्त्व दिले याचे याची जाणीव होईल.
रंगाला धर्म नसतो परंतु धर्मला रंग देऊन विकास कामे करण्याऐवजी निरर्थक गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्या जाते. मागे एका सिनेमाचे गाणे रिलीज झाले आहे अनेकांनी तर्क, विचार, अभ्यास व मेंदुचा वापर न करता आवाज उठवला आणि मिडिया सह प्रत्येक ठिकाणी रंगावर चर्चा करून शाहरुख खान याच्या बद्दल चुकिचे वक्तव्य करण्यात आले. पहिली गोष्ट कोणत्याच रंगावर कोणत्याही धर्माचा सर्वस्वी अधिकार नाही एवढेही भारतीय राजकीय नेत्यांना कळत नाही त्यावर त्यांचे वादग्रस्त विधाने. बर यांनी शाहरुख खान ला फक्त मुस्लिम असल्याने आणि कोणीतरी चुकिची माहिती दिल्याने समाजात गदारोळ निर्माण केला.
सत्य परिस्थिती कोणालाच माहिती नाही. शाहरुख खानच्या चित्रपटाला विरोध का करायचा याचे तर्कशुद्ध उत्तर देखील कोणाकडे नाही तरीही त्यावर चर्चा होते. बर गम्मत अशी की शाहरुख खान याने फक्त भुमिका बजावली. चित्रपट लिहणारा, चित्रपटाचा दिग्दर्शक हा मुस्लिम नाही. ज्या गाण्याला बोर्डाने मान्यता दिली त्या बोर्डाचा अध्यक्ष मुस्लिम नाही. बर यांनी गोंधळ घातला भगव्या रंगाचा अवमान झाला. परंतु भगवा रंगही घातलेली व्यक्ती मुस्लिम नाही. मग शाहरुख खान ला विरोध का? याचे उत्तर मिळणे म्हणजे काजव्याच्या प्रकाशाने सुर्य शोधण्या सारखे होय. लिहणारा मुस्लिम नाही, दिग्दर्शक मुस्लिम नाही, परवानगी देणारा मुस्लिम नाही, रंगाचा कपडा वापरणारा मुस्लिम नाही मग मुस्लिम शाहरुख खानला विरोध कशासाठी? याचे एकच उत्तर मिळेल फक्त धर्म. बर काही काही लोक एवढे बुद्धीमान आहेत की आपण काय करतो याचेही भान राहत नाही. त्या मुस्लिम नसलेल्या नटीने भगव्या रंगाचे कापड वापरले म्हणून काही लोक गोंधळ घालत होते. हिरवा रंग का नाही वापरला. आता येथे दोन गोष्टी आहेत पहीली गोष्ट चित्रपटात जे कपडे वापरले जातात ते प्रोडक्शन हाऊस चे असतात हिरो हिरोईन चे नसतात.
दुसरी गोष्ट म्हणजे भगवाच का हिरवा का नाही. हिरवा कशासाठी पाहिजे होता तर भगवा वापरला म्हणून त्याचा अवमान झाला म्हणून भक्तांच्या मते हिरवा रंग मुस्लिमांचा आहे. पण हिरव्या रंगाचा अवमान व्हायला पाहिजे अशा आशयाचे वक्तव्य मिडिया वर येत होते. असे वक्तव्य करताना हिरव्या रंगाचे लुगडे देवीला आदरपूर्वक दिले जाते, हिरवा चुडा, साखरपुड्यामध्ये हिरवा रंग हे हिंदु धर्मात पवित्र मानले जाते याचा विसर पडतो. म्हणजे स्वतः च्याच हाताने स्वतः च चुकिचे करायचे आणि केवळ धर्म वाद म्हणून शाहरूख खान ला विरोध करायचा हे कोणत्याही तर्क, पुरावा यावर बसत नाही. बर या अगोदर कितीतरी वेळेत भगव्या कपड्यात व्यसन आणि अश्लिलता दाखवली तेव्हा कोणीलाच वाटले नाही रंगाचा अवमान झाला.
दुसरा सध्या चर्चीला जाणारा विषय म्हणजे छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज रक्षक? बर ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाचे पुस्तकही घडवून बघितले नाही ते सांगत आहेत छत्रपती महाराज धर्मवीर होते. त्यांनी हिंदु धर्माचे रक्षण केले. ज्यांनी इतिहासच वाचला नाही ते चुकिचे वक्तव्य करतात. आणि अभ्यासक मंडळींनी अभ्यास पुर्ण काही माहिती मांडली तर त्याला शिव्या द्यायच्या धमक्या द्यायच्या आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा हे योग्य आहे का? बर प्रश्न हेच विचारतात, चुकिचे कृत्य करतात आणि जो पुराव्यानिशी उत्तर देतो त्याला अपशब्द बोलुन त्याच्या वरच दबाव आणतात.
आता छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे रक्षक होते असे आर एस एस प्रणित बिजेपी च्या लोकांना वाटतं. मग धर्माचा विचार केला तर पेशवे व राजे यांचा धर्म एक नव्हता आणि नाही. मग पेशवे राजदरबारात काय करायचे? छत्रपती संभाजी राजे धर्मरक्षक होते आणि वारसा त्यांना घरातून मिळाला असे असेल तर कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वार केला तर कृष्णा भास्कर कुलकर्णी यांचा धर्म कोणता? पेशवे हिंदु धर्मासाठी का लढले असतील आणि कृष्णा कुलकर्णी औरंगजेब यांचा वकील का असेल? म्हणजे पेशवे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूने आणि लढा हा हिंदु विरुद्ध मुस्लिम अस कस शक्य आहे? आज इतिहासाचे उदाहरण घेऊन सत्य बोलले तर विद्रोहच होतो आणि त्यांच्या कडून चुकिचा इतिहास ऐकण्यात काही लोक शहाणपण समजतात.
संभाजी महाराज धर्मामुळे मोठे आहेत की कर्मामुळे? जर कर्मामुळे मोठे आहेत तर स्वराज्य उभ करण्यामध्ये अठरा पगड जातीचे लोक होते मग धर्मवीर म्हणण्यासाठी नेमका काय आधार आहे कोणता पुरावा आहे. बर स्वराज्य रक्षक म्हणले तर नेमकं बिघडले कुठे? धर्मवीर म्हणलं तर नक्कीच छत्रपती संभाजी महाराज यांना संकुचित केल्या सारखे होते. परंतु स्वराज्य म्हटलं तर सर्व व्यापक संभाजी महाराज होतात. आणि हेच नेमकं कोणाला नको आहे? छत्रपती संभाजी महाराज यांना जाहीर पणे संकुचित करणारे सभागृहात गोंधळ घालतात. आम्ही धर्मनिरपेक्ष लोकशाही मध्ये राहतो म्हणायचे आणि धर्मनिरपेक्ष काम करण्याची शपथ घेऊन सभागृहात धर्मावर बोलायच हे संविधान, पद, प्रतिष्ठा, बुद्धी यांना तरी मान्य आहे का याचा साधा विचारही करायचा नाही. म्हणजे किती हा दुटप्पी पणा. यातून नवीन पिढीने नेमका कोणता आदर्श घ्यायचा?
बर यांचे विचार एवढे भेदभावाचे आहेत कि यांच्या गोटातील लोकांनी कोणताही शब्द वापरला तर यांना चालतो परंतु दुसऱ्याने सत्य बोलले तरी यांचा जळफळाट होतो. धर्मवीर साठी अडून बसलेले आणि अजितदादा पवार यांच्या वर टिका टिप्पणी करणारे लोक भगतसिंग कोशारी छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळचे आदर्श हे चालते व स्वराज्य रक्षक चालत नाही? अरे थोडा तरी विचार करा आपण करतोय काय बोलतोय काय? आणि उघड भेदभाव करून जवळच्या व्यक्तीला पाठीशी घालायचे यालाच संस्कार म्हणायचे का? असे अनेक उदाहरणे महाराष्ट्रात घडले आहेत. ज्यावर चर्चा नाही त्यावर केली जाते.
अजून एक उदाहरण फक्त परिस्थिती लक्षात येण्यासाठी म्हणजे यांची कुटनिती, भेदभाव व्देष आणि धार्मिक तेढ निर्माण कशी निर्माण करतात हे कळण्यासाठी. तेरा वर्षाचा सुषमाताई अंधारे यांचा व्हिडीओ शोधून काढला जातो. समतेवर आधारित उदाहरण देतात त्या दोन संदर्भ घेतात. परंतु तेरा वर्षाचा व्हिडीओ काढून तो व्हायरल केला जातो. संताचा अवमान केला म्हणून सुषमाताई यांना शिवीगाळ, मारण्याच्या धमक्या, पातळी सोडून त्यांच्या विरोधात निदर्शने केली जातात. आणि आता केतकी चितळे म्हणते धर्मात दारु पिणे काही वाईट नाही. देव सुद्धां दारु प्यायचे हे वक्तव्य चालते. कारण चितळे तुमची आहे म्हणून? सुषमाताई अंधारे साठी महाराष्ट्र दणाणून टाकणारे लोक चितळे देवाला दारू पिणारे म्हणते तरी कोणी काहीच बोलत नाही, तिकडे कालीचरण नामक व्यक्ती अंगावर भगवे कपडे घालून देण हिंस्त्र होते असे म्हणतो तरी तेव्हा धर्माचा, रंगाचा अवमान होत नाही? सत्तेच्या नावाखाली फक्त निरर्थक गोष्टींना प्राधान्य देऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सरकार कडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुरू आहे. लोकांना आता हे कळाले आहे. म्हणून जनतेच्याच तोंडून प्रश्न येतोय, महाराष्ट्रात नेमकं चाललयं काय?
- विनोद पंजाबराव सदावर्ते
- या. आरेगांव ता मेहकर
- मोबा : 9130979300
0 टिप्पण्या