Top Post Ad

किर्तनकार (?) सुनिता आंधळे यांच्याविरोधात तक्रार दाखल

 ह.भ. प. सुनिता आंधळे यांनी महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविल्याबाबत वर्तकनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून घेण्यास सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली.

सामाजिक कार्यकर्त्या आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या सन २००९ च्या केलेल्या भाषणाचा आधार घेऊन ह.भ.प. सुनिता आंधळे यांनी महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविताना म्हणाल्यात की, अंधारेबाईच्या समोर ऐकायला बसणारे सर्व लोक बिनबापाचे लोक आहेत. त्यांना बापच नाही. अशी गलिच्छ भाषा वापरून गरळ ओकली आहे. प्रत्येकाला भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ प्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्यांना जे चुकीचे वाटत असेल त्यांनी  विरोध सनदशीर मार्गाने शंभर टक्के त्याचवेळी केला पाहिजे यास आमचा कोणताही आक्षेप नाही, 

परंतु असे न होता स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या, तीन-चार जिल्हे सोडून कुठेही कीर्तन न करणाऱ्या, राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून फुशारक्या मारणाऱ्या श्रीमती सुनीता आंधळे यांच्या  विषारी वक्तव्यामुळे नारी शक्तीचा अपमान, त्यांनी शीवराल भाषा वापरून त्यांची अब्रू वेशीला टांगण्याचा खोडसाळ प्रयत्न त्या स्वतः महिला असूनही त्यांनी केला आहे, ही बाब निषेधार्ह आहे. श्रीमती सुनिता आंधळे यांच्यावर कलम ३५४, ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून वर्तक नगर पोलीस स्टेशन, ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांच्याकडे तक्रार देण्यात आली. यावेळी ओबीसी धनाजी सुरोसे, ओबीसी राजाराम ढोलम सोबत सामाजिक कार्यकर्ते आफाक अन्सारी, शांताराम मोरे, विनोद देशमुख,जितेंद्र जगताप, बाळकृष्ण भागवत, ललेंद्र आंबेकर,सुरेश सरपटे, विजय निवंगुणे, संतोष घुडे आदी मान्यवर उपस्थितीत होते.

---------------------------

 काही वर्षांपूर्वी केलेल्या विधानांवरून सुषमा अंधारे यांना टार्गेट केले जात असल्याचे आता समोर आले आहे.  वास्तविक हा व्हिडिओ २००९ मधील असून त्याचा शिवसेना पक्षाशी काहीही संबंध नव्हता, तसेच २००९ पासून या व्हिडिओकडे ढुंकूनही न पाहणाऱ्यांनी आज अचानक त्यावर व्यक्त व्हायला सुरुवात केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त असतानाच अनेकजणांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. यावर आता तथाकथित राजकीय स्वयंघोषित कीर्तनकार आणि वारकरी अधिक प्रमाणात व्यक्त होताना दिसत आहेत.  काही वारकरी संघटना आक्रमक झाल्या असून त्यात मोजकेच लोकं दिसत असले तरी त्यांना अधिकाधिक प्रसिद्धी देण्याचे काम तथाकथित आयटीसेल कडून मोठ्या प्रमाणात सुरु आहे. एकूण हा विषय पुरस्कृत असल्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. कीर्तनकार (?) सुनीता आंधळे यांचे मानस भाऊ हे शिंदे गटाचे जिल्हापरिषद सदस्य असून ते कोपर्डी आणि शिर्डी विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख देखील आहेत. युवासेनेच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे या  कीर्तनकार (?)  सुनीता आंधळे यांना कोणी राजकीय सुपारी देऊन, ते व्हिडिओ स्थानिक प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींमार्फत बातम्यांमध्ये आणले जातं आहेत का अशी चर्चा सुरु झाली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com