Top Post Ad

कुर्ला बुद्ध कॉलनीची जनता घरापासून वंचित

 मुंबई मुंबईतील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्ला येथील बुद्ध कॉलनीतील शेकडो नागरीक मालकी हक्काच्या घरापासून वंचित आहेत .बिल्डर एम .के .अँड डेव्हलप कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी बैठका झाल्या असतानाही  मालकी हक्काची घरे अद्यापही मिळाली नाहीत. या पीडित कुटुंबाला न्यायाकरिता लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दाद मागणार असल्याचे रिपब्लिकन नेते तानसेन ननावरे म्हणाले.

                आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारी कुर्ला बुद्ध  कॉलनी येथील झोपडपट्टी पुनर्वसन विकास योजना मागील 15 वर्षापासून  रखडलेली आहे .माझे स्वतःचे बुद्ध कॉलनीमध्ये मालकी हक्काचे घर आहे. मी स्वतः बुद्ध कॉलनीत कित्येक वर्षापासून राहत आहे. माझे स्वतःचे वडापावचे दुकान आहे. लोखंडे कुटुंबाचं 32 रूम होते. रामकृष्ण तातोब्या लोखंडे यांच्या नावाने ही चाळ  होती. परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारे विचारात न घेता  विश्वासात न घेता बिल्डर्स एन के डेव्हलपर्स यांनी आमची घरे पाडले. माझ्या पत्नीला  कर्करोग झाला, त्यामध्ये आमच्यावर  संकट आले. आता आम्हाला घर रिकामी करण्याची नोटीस आली आहे.आता आम्ही बेघर झालो तर आम्हाला कोण विचारणार? असा सवाल पीडित विश्वास दामोदर लोखंडे यांनी केला आहे.

 अरुण केशव पवार म्हणाले की ,मी  72 वर्षापासून कुर्ला बुद्ध कॉलनी वसाहतीत जन्मापासून राहत आहे .आमची पिढी ही आता बेघर होत आहे , आम्हाला दुःख आहे, आम्ही सर्व सरकारी टॅक्स भरले आहेत. आमची चाळ गेल्या कित्येक वर्षापासून सक्रिय आहे. सोसायटीकडून आमच्या वीस खोल्या रिकाम्या करण्यात आल्या. आम्हाला विश्वासात न घेता या सोसायटीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. आमचं  सनद प्रॉपर्टी कार्ड असतानाही विकासकांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही, असा गंभीर आरोप अरुण केशव पवार यांनी केला आहे.

 बुद्ध कॉलनीतील संगीता शंकर उनवणे यांनी तर एसआरएची शोकांतिका मांडली आहे. माझी आई आणि माझ्या भावाच्या नावे मालकी हक्काचा रूम असतानाही मला अद्यापही मालकी हक्काचे घर मिळू शकलो नाही, अशी उनवणे यांनी स्वतः खंत व्यक्त केली आहे .बाबुराव किसन विधाते म्हणाले की, गेले 75 वर्षापासून मी बुद्ध कॉलनीमध्ये वास्तव्यात आहे. माझ्या वडिलांपासून माझ्याकडे फोटो पास आहे, मी झोपड्यांचे भाडे भरतो दुकानाचे लायसन्स आहे.. परंतु माझा मुलगा अपंग असतानाही त्याला मालकी हक्काचं दुकान मिळालं नाही .जिल्हाधिकारी एस आर ए कार्यालयाच्या चकरा मारल्या परंतु मला न्याय मिळू शकला नाही. बिल्डरचे सरकारी यंत्रणेची लागेबांधे आहेत का असा संत सवाल बाबुराव विधाते यांनी केला आहे .शकुंतला गोवर्धन जाधव आणि मोहन भागवत शिंदे यांनीही हीच खंत व्यक्त केले आहे.

 पत्रकार महादू पवार  Mob. 9867906135


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com