Top Post Ad

भारत ज़ोडो' पदयात्रेत पडणारं भारतीय 'पाऊल'...


  'राहुल' आणि त्याच्या प्रेमळ-आश्वासक साथीनं 'नफ़रत छ़ोडो, भारत ज़ोडो' पदयात्रेत पडणारं प्रत्येक भारतीय 'पाऊल'... या दोन्हींचा, अन्योन्य संबंध आहे !!!

"राहुल गांधींकडे कुठलाही मोठा 'करिष्मा' नाही, नसू द्या, तेच खरंतरं उत्तम... पण, मूळचं सघन-सशक्त, दणकट तरीही, अतिशय संवेदनशील व तरल असलेलं एक लोभस-पारदर्शी 'व्यक्तित्व' आहे, त्यांच्याकडे!"

अतिशय अवघड अशा सद्यस्थितीत... भारताला, असाच एक पंतप्रधान हवाय, "जो, प.जवाहरलाल नेहरु व महात्मा मोहनदास गांधींसारखा जनसामान्यांपर्यंत थेट पोहोचलेला असेल व ज्याचा रथ, कुणा अंबानी-अदानीसारख्या औद्योगिक-घराण्यांनी पुरवलेल्या इंधनातून भयंकर प्रदूषण करत व निसर्ग-पर्यावरण उध्वस्त करत 'जमिनीपासून चार बोटं वर चालणारा' नव्हे; तर, शेतात आणि कारखान्यात राबणार्‍या 'श्रमिकां'च्या घामाच्या इंधनावर 'जमीन धरुन चालणारा' आणि कार्बन तसेच, रासायनिक-आण्विक 'प्रदूषण' कमीतकमी करणारा असेल" !!!

'राहुल' आणि त्याच्या प्रेमळ-आश्वासक साथीनं पदयात्रेत पडणारं प्रत्येक भारतीय 'पाऊल'... याचा, अन्योन्य संबंध आहे. त्या संबंधांतून फुलणारं, एक असं अनोखं नातं आहे, जे राहुलचे पणजोबा व भारताचे लाडके चाचा नेहरु यांच्या 'लाल गुलाबा'नं नटलेल्या पांढऱ्याशुभ्र सदर्‍यापासून ते देशासाठी बलिदान देणाऱ्या त्याच्या प्राणप्रिय आजी आणि पित्याच्या लाल रक्तानं माखलेल्या लालभडक वस्त्रांपर्यंत थेट जाऊन भिडतं... एवढं भयंकर आक्रित आपल्या खाजगी जीवनात घडूनही, राहुलच्या रक्तानं प्रतिशोधाचा लालभडक रंग धारण करायचं साफ नाकारलं आणि पदयात्रेच्या हजारो किलोमीटर लांबीच्या वाटेतच कधितरी त्या 'लाल रंगा'ला मागे सोडलं व तो पुढे पुढे अथक चालतच राहीला... 'भारतीय अध्यात्मा'चा, चराचराला आपल्या कवेत घेणारा तेजोमय-ओजस्वी 'भगवा' रंग धारण करत; तर कधि मनुष्यप्राण्यांना, पशुपक्ष्यांना प्रकाश-संश्लेषणाने जगण्यासाठी 'प्राणवायू' पुरवणाऱ्या हरितद्रव्याचा 'हिरवाकंच रंग' धारण करत! 

त्याच्या पणजोबांभोवती पिंगा घालणाऱ्या बाळगोपाळांपासून ते नवथर तरुणतरुणींपर्यंत... आयुष्याच्या मध्यान्हसमयी जबाबदाऱ्यांच्या असह्य ओझ्यानं खांदे झुकलेल्या बायाबापड्या-पुरुषांपासून ते 'संध्याछाया भिववीत हृदया' वयातल्या वृद्धांपर्यंत... सगळेच त्याला आवेगून मिठाळत होते, त्याच्याच मिसळत होते. तो कुठला अनावर आवेग होता? नव्हतं त्यात थकल्या वयातलं मदतीसाठीचं कुठलं आर्जवही... होतं फक्त एक, दोन जीवांमधलं त्यांचं त्यांनाच आकळणारं, त्यांचं त्यांनाच हृदयातून नजरेनं बांधणारं आश्वासक असं 'मैत्र जीवांचं'... अनादिकालापासून या भरतखंडात नांदत आलेलं! 

म्हणूनच, तर जेव्हा जातधर्म-वर्णविद्वेषी, शोषक, निसर्ग-पर्यावरण विध्वंसक लपलपत्या 'भांडवली' जिव्हांनी देशाला खंड खंड करत जीवांची काहिली देशभर माजवली... तेव्हा, तो आपल्या 'शांतिदूत'स्वरुप पणजोबाने पुरवलेल्या एका अनामिक प्रेरणेनं तडक उठला आणि चालायला लागला, चालतच राहीला... या भरत देशाला प्रेमाच्या सुईदोर्‍याने सांधायला, प्रेमाच्या धाग्यात बांधायला. मग, सोबतीनं हजारो कि मी. लांब रस्त्यावरुन हळूहळू लाखो पावलांचा थवा, आपसूकच एक 'कारवाँ' बनत दक्षिणोत्तर, प्रेमाच्या संदेशाचा गुलाल उधळत सरकत जाऊ लागला.

पदयात्रेत पावलं कधि थबकली... पण, थांबली नाहीत. कारण, पावलानं पाऊल जोडत जाणारं, विद्वेषाच्या भिंती लंघून होणारं हे, ऐतिहासिक भारतभ्रमणच केवळ नव्हतं; तर, प्रेमाचं स्वयंस्फूर्त भरतं आणणारं भारतभ्रमण ठरायचं होतं म्हणून... आणि, आपल्या पणजोबाच्या छातीवर विराजणार्‍या लाल गुलाबासारखं भारतीय जनमानसावर सदैव फुलत रहायचं होतं, म्हणून !!!


...राजन राजे अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com