बातमी पेट घेऊ शकते !


 राजकारणातील एका मोठ्या बातमीला राष्ट्रस्तरावर मारुन टाकलय. बातमीत सांसदीय लोकशाही हलवायचे बळ आहे !      कसली बातमी ? बातमी देशातील राजधानीची आहे. तिथे, नुकत्याच दिल्ली नगर निगमच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीतील 'ही' बित्तंबातमी ज्येष्ठ पत्रकार निरजा चौधरी यांनी उजेडात आणली. 'स्पाॅट रिपोर्ट' दि १७ डिसेंबरला 'इंडियन एक्सप्रेस' ने छापला. त्याचा हवाला देत, वेगवेगळ्या संदर्भाने प्रसिद्ध समाजसेवक डाॅ सुरेश खैरनार यांनी हिंदीत प्रसारण केलेय. बातमी पसरत चाललीय. 

  दिल्लीच्या या निवडणुकीत 'आप' ला बहुमत मिळाले. कांग्रेस केवळ नऊवर थांबली. या नऊमध्ये 'मुस्तफाबाद' व 'ब्रिजपूरी' हे दोन वार्ड आहेत. दोन्ही वार्डात महिला निवडून आल्या. या दोघींचीच ही बातमी आहे. 

   दोघींनीही वेगळाच विचार केला. अलिकडे सगळीकडे हा विचार होतोय. आपचे एव्हढे प्रचंड बहुमत ! आपल्या नऊ ने काय होणार ? विकासाची कामे होतील ? यापेक्षा आप मध्ये जावे ! दलबदलचा नियम, निगमला नसतोच !  

 मग काय ? गेल्या आप मध्ये. यजमानांचे पाठबळ होतेच ! पण शेवटी ती बातमीच ! पसरलीच ! पसरली कशाला ? भडका उडाला ! दोन्ही वार्डात स्वयंस्फूर्त संताप फुटला ! हे कसे काय ? आम्ही यासाठी मतदान केलेच नव्हते. हे तर फारच ... ! 

आधीच, आपचा अनुभव भयंकर आहे. आपच्या आमदाराने काय

       कमी तंग केलय ? कसे वागत होते ? मस्ती .. मुजोरीचा कळस झाला होता. म्हणून तर आम्ही कांग्रेस ला आणलय. त्यात पुन्हा आप ! राग पेटत गेला.

       रोज मोर्चे. धरणे.. पोस्टरबाजी.. मिरवणुका .. पुतळादहन .. सारे ! दोघीही घाबरल्या. पुन्हा आल्या कांग्रेस मध्ये. आप चा राजीनामा दिला. हीच ती बातमी.

       निरजा चौधरींनी प्रत्यक्ष वार्डात जाऊन मुलाखती घेतल्या. इंडियन एक्सप्रेस ने सहा काॅलम छापलाय.

       ७० वर्षात असे कधी घडलेय ? कुठेतरी ? दिल्लीत घडलय. पण कानोकान नाही. मतदार हा मतदार असतो. गंमतीत घेतात. गंमतीत नका घेऊ ! 

- रणजित मेश्राम

---------------------------------------------------


सिंगापुरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ILO च्या (International Labour Organisation) 'एशिया पॅसिफिक रिजनल मिटींग'मध्ये (APRM) विविध सभासद-राष्ट्रीय सरकारांना, सध्या जगभर (प्रामुख्याने भारतात) कामगारसंघटना-बांधणी आणि कामगार संघटना-परिचालन/संचालन याबाबत, 'कंपनी-दहशतवादा'तून (Corporate-Terrorism) जो हल्लाबोल सुरु आहे व त्यातून, कामगार-चळवळीचं साफ उध्वस्तीकरण करुन... कामगार-कर्मचारीवर्गाची जी भयानक गळचेपी व शोषण सुरु आहे, त्याबद्दल तीव्र शब्दात चिंता व्यक्त केलेली आहे. तसेच, सर्व संबंधित सरकारांना कामगार-कर्मचारीवर्गाचे "संघटना-बांधणी व संचालना"बाबतचे 'लोकशाही-अधिकार' अबाधित राखण्याकामी गंभीर निर्देश दिलेले आहेत. शिवाय, या 'घोषणापत्रा'त बेरोजगारीच्या मुद्द्यासोबतच, कामगारांना गुलामगिरीत ढकलू पहाणार्‍या 'अर्धरोजगारी'च्या मुद्द्यावर प्रामुख्याने कोरडे ओढून कठोर शब्दात प्रहार करण्यात आलेले आहे...
मात्र, यासंदर्भात 'THE HINDU' वगळता इतर कुठल्याही दैनिकात ठळक बातमी आल्याचं दिसत नाही, "यही तो है, 'गोदी-मिडीया' का करिश्मा"... जागो, कामगार-कर्मी जागो, या फिर सदा के लिये डूब जाओ !!!

WORKERS' LIVES MATTER TOO...
The "Singapore Declaration" of 17th APRM Of ILO stresses 'freedom of association' and effective recognition of the right to collective bargaining to enable rights of decent work & 'equal pay for work of equal value'... And, to address issue of 'dwindling wages of workers' and unemployment !!!

...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष आणि धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ)
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1