१ जानेवारी १८१८ ला स्वांतंत्र्याचे बंड का झाले?


छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र ब्राह्मण रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंगजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले 

परंतू नंतर ब्राह्मण मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्यात यावा आणि मुघलांच्या दरबारात 35% ब्राह्मणांची भागिदारी असल्यामुळे औरंगजेबाने संभाजी महाजांना ब्राह्मणांच्या ताब्यात दिले मग ब्राह्मण जातीने आपल्या जातभाईंच्या हत्तेचा बदला घेवून स्वराज्य बळकायचे होते आणि ब्राह्मणांसाठी शेवटची संधी होती आणि ब्राह्मण ती गमवू ईच्छित नव्हते, आणि जर का संभाजी महाराज सुटले असते तर ब्राह्मण जातीचा ते काळच ठरले असते म्हणून ब्राह्मणांनी संभाजी महाराजांची हत्त्या मनूस्मृती प्रमाणे शिक्षा देऊन केली. 
 महाराजांचे डोळे काढले, त्यांची कातडी सोलली, हाताची बोटे छाटली, कानात शिश ओतल, जिभ छाटली आणि शरीराचे तुकडे तुकडे करून भिमा नदीच्या पात्रात टाकले व ब्राह्मणांनी फर्मान काढल की जर संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे कोणी गोळा केले तर त्याचेही हेच हाल केले जातील , कोणीही पुढे यायला तयार होईना गावचे मातब्बर गडी शांत झाले परंतु ही गोष्ट नदीवर धुणे धुत असलेल्या जरी परटीनीला कळली ती गावभर फिरली पाटील, देशमुख यांच्या कडे गेली आणि सांगितले की संभाजी महाराजांच्या प्रेताचे तुकडे नदीत फेकले आहेत, त्यांचा अंत्यसंस्कार करायचा आहे.परंतू गावातला एक ही माणूस पुढे येईना अशा वेळी त्याच गावातील एक "गोविंद महार" पुढे आला त्याने आपल्या भावकीतल्या पन्नास लोकांना जमा केल आणि शिंप्यिकडून ते सर्व तुकडे शिवून घेतले व विधानमंडलात स्वतःच्या शेतात संभाजी महाजांचा अंत्यसंस्कार केला.

पुढे पेशव्यांनी या लोकांना देहदंडाची शिक्षा दिली आणि पेशव्यांनी महार जातीला दिवसात गावातून फिरल्यावर बंदी घातली व गळ्यात गाडगे व कमरेला बोराटी लावण्याचा नियम बनवला. अशा प्रकारे महार जातीवर अन्याय वाढला तो ईतका वाढला की या व्यवस्थेत जगणे मुश्किल वाटू लागले. अशा वेळी इंग्रज भारतात साम्राज्य विस्तार करून ईच्छित होते परंतु इंग्रजांना ते शक्य होत नव्हते, पेशवाई विरोधात इंग्रजानी युद्ध करायचा निर्णय घेतला. अशा वेळी शिदनाक महार पेशव्यां कडे गेला आणि म्हणाला आम्ही तुमच्या बाजूने लढू परंतु आपण आम्हाला त्या बदल्यात काय द्याल? पेशव्यांनी शिदनाकला सांगितले की तुम्हाला आणि तुमच्या समाजाला ईथली टीचभर जागाही मिळणार नाही. शिदनाकची एकच मागणी होती, परंतु पेशव्यांनी ती नामंजूर केलि आणि शिदनाक इंग्रजांकडे जाऊन तिच मागणी केली आणि इंग्रजानी ती मागणी मंजूर केली.

विशेष शिदनाकने महार समाजातील 500 शूरवीर योद्ध्याना जमा केले आणि इंग्रजांच्या सैन्यात भरती केले व पेशव्यांच्या विरोधात युद्धाची घोषणा केली. 1 जानेवारी 1818 ला युद्ध होईल ही घोषणा केली गेली. इकडे शिदनाक महार आणि त्यांचे शूरवीर योद्धे वढू बुद्रूक येथे संभाजी महाराजांच्या समाधीवर गेले तिथे सर्वांनी शपथ घेतली की महाराज आम्ही आपल्या हत्त्या चा बदला घ्यायला निघालो आहोत,आम्हाला आशिर्वाद द्या. आणि तेथून ते 500 विर भिमा नदीच्या पैलतीर इंग्रजी छावणीत जमले, नदीच्या एका काठावर पेशव्यांचे सैन्य, दुसर्‍या काठावर महार बटालियन, इंग्रज अधिकारी, समोर पेशव्यांची 28000 हजाराची फौज पाहून इंग्रजनी घाबरून माघार घेण्याचे ठरवले परंतु शिदनाक महार आणि सैन्य काही माघार घ्यायला तयार नव्हते कारण बहुजन समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता त्यांनी इंग्रज अधिकार्यांना ग्वाही , ( वचन )दिली की तुम्ही माघार घेवून नका आम्ही हे युद्ध आपणास जिंकून देवू .

इकडे पेशव्यांचे सैन्य 31 डिसेंबर 1799 ला गाफिल होते मौजमस्तीत होते, कारण युद्ध 1 तारखेला होणार होते, अशा परिस्थितीत 31डिसेंबरच्या मध्यरात्री महार बटालियनच्या सैनिकांनी हल्ला चढवला आणि रात्रीचा फायदा घेवून पेशव्यांच्या सैन्याला नामोहरम केले. हे युद्ध 31डिसेंबरच्या रात्री सुरू झाले आणि 1 जाने 1818 दुपारी संपले, पेशवे हारले आणि महार योद्धे जिंकले यात पेशवे सैनिक 30000 होते यापैकी 2000 सैन्य भिऊन पळून गेले आणि 28000 सैन्याबरोबर 500 महार सैनिक लढले एका सैनिकांच्या बरोबर महार बटालियनचे 56 - 56 सैनिक लढले. तेंव्हापासून महाराष्ट्र मध्ये म्हण प्रचलित झाली की, तुझ्यासारखे 56 बघितलेत. म्हणजे जर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्त्याचा बदला म्हणून आणि बहुजनावरील गुलामीचा विरोध म्हणून जर पेशव्यांची सत्ता नष्ट केली गेली असेल तर बहुजनावरती गुलामी कोणी लादली होती? तर ती पेशवे ब्राह्मणांनी लादली होती .

मग आजच्या सद्यस्थितीत 31 डिसेंबर या दिवशी दारू पार्ट्या , मौजमस्ती रात्री उशीरा पर्यंत नाचगाणे करायचे आणि दुसर्या दिवशी उशिरापर्यंत, म्हणजे दुपार पर्यंत झोपून राहायचे ही रित कोणी आणि काय घालून दिली , तर ती रित ब्राह्मणी षडयंत्र द्वारे बहुजन समाजात प्रचलित केल्या गेली, कारण 1 जानेवारीचा सत्य इतिहास दाबला जावा. कोणी जाणून घेऊन नये की 1 जानेवारीला काय घडल होतं. हा इतिहास दडपण्याचा प्रयत्न का होतो तर विश्वरत्न परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज आपला इतिहास जाणतो आणि त्यापासून बोध घेतो तो समाज इतिहास घडवल्याशिवाय राहत नाही.

तर मला फक्त 31 डिसेंबरचा खरा इतिहास आपणापर्यंत पोचवायचा होता. म्हणून हा लेखन प्रपंच.......

संकलन ........... प्रबुद्ध कवी - स्वप्निल साबळे ( पुणे ) मो.नं. ९५२७६०९८१३ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1