Top Post Ad

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक, मानसिक दुष्ट्या शोषण

 विद्युत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संघटीतपणे प्रवेश.

 

      असंघटीत कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण वाढले असतांनाच त्याचा सुरक्षा साधना अभावी अपघात होऊन बळी सुद्धा जात आहे. राज्यभरात अनेक जिल्ह्यात
 कंत्राटी विज कर्मचाऱ्याचा बळी जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणमध्ये जुन्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त होत असतांना त्यांच्या जागी दुसरे कामगार कर्मचारी कायमस्वरूपी घेतल्या जात नाही. त्याजागी कंत्राटी कर्मचारी घेतल्या जातत आणि त्यांचे आर्थिक,मानसिक दुष्ट्या शोषण केल्या जाते. हे कंत्राटी कर्मचारी प्रत्यक्ष महावितरण कंपनी प्रशासन स्वतः त्याची माहिती घेऊन कामावर घेतात व कायद्याच्या कचाट्यात अडकायचे नाहीम्हणून नंतर कोणत्या तरी कंत्राटदारास त्याची नेमणूक दाखवायला सांगतात. हे वर्षानुवर्षे असेच सुरू आहे. याविरोधात मान्यताप्राप्त संघटना काही बोलत नाहीत. त्यामुळेच नियमित कर्मचारी नसल्याने तातडीच्या विजवाहिनी दुरुस्तीच्या धोकादायक काम ह्या कंत्राटी विज कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जाते. कामावरून कमी करण्यात येईल या भिती पोटी हे कामगार नाईलाजाने स्वतःचे जीव धोक्यात घालून काम करताना दिसतात. याला कंटाळून हे असंघटीत वीज कंत्राटी कामगार कर्मचारी आता महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली संघटीत होत आहेत.

        पनवेल ग्रामीण विभागातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी मान.डॉ.संजय घोडके केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना,मान.सागर तायडे अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थिती महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेत जाहीर प्रवेश घेतला.पूज्य सिंधी पंचायत हॉल,झुलेलाल मंदिर,बिशारली नाका,एम जी,रोड,पनवेल या ठिकाणी वीज कंत्राटी कामगारांचा प्रवेश मेळावा संपन्न झाला.त्यावेळी मा.संजय मोरे केंद्रीय उप सरचिटणीस,रमेश कांबळे,राज्य उपाध्यक्ष,किशोर अहिवळे राज्य उपाध्यक्ष,शैलेश आडे राज्य उपाध्यक्ष,रमेश अहिरे सल्लागार भांडूप झोन,लक्ष्मीकांत गलांडे सहाय्यक अभियंता खापोली शहर, गंगा रेड्डी लोल्पोड यांची विशेष उपस्थिती होते.

     वीज कंत्राटी कामगारांनी स्वताला एकटे समजू नये.त्यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे कर्मचारी अधिकारी अभियंता संपूर्ण ताकदीने उभे आहेत.सनदशीर मार्गाने आपणांस न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही संघर्ष करण्यासाठी तयार आहेत असे डॉ संजय घोडे यांनी वीज कंत्राटी कामगारांना आश्वासन दिले.मागितल्याने मिळत नाही आणि संघर्षा शिवाय पर्याय नाही.म्हणून संघटीत व्हा स्वतंत्र मजदूर युनियन आपल्या सोबत वैचारिक ताकदीने उभी आहे असे सागर तायडे अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले.याप्रसंगी सर्व मान्यवरांनी एकजुठीचे महत्व सांगितले. 

    यावेळी पनवेल ग्रामीण विभाग कमिटीची सर्वानुमते निवड करण्यात आली त्यात विकास गणपत कांबळे -अध्यक्ष,पनवेल ग्रामीण विभाग.सम्राट जनार्दन मोरे.सरचिटणीस,पनवेल ग्रामीण विभाग. अशोक वाघमारे - कोषाध्यक्ष, कृष्णा पाटील - सहसचिव, चंद्रकांत पदिर - उपाध्यक्ष,विजय भोसले - उपाध्यक्ष,सुनील गवांडा - संघटक,दत्ता थोरात - सदस्य,चंदर शिद - सदस्य,अमर माळी - सदस्य.या सन्माननीय सभासदाची निवड करण्यात आली. यावेळी - खोपोली शहर- १,खोपोली शहर- २,शिळफाटा, वावोशी,खालापूर,चौक,मोहपाडा,कर्जत शहर- १,कर्जत शहर- २, नेरळ- १,नेरळ- २,कडाव,कशेळे,कलम इत्यादी.सर्व शाखेचे कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन शैलेश आडे यांनी केले तर सम्राट मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.

रमेश अहिरे ७०४५३२८७६७,सल्लागार भांडूप झोन,



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com