Top Post Ad

मूठभर अतिश्रीमंतांच्या ऐय्याशीसाठी जंगलतोड


अंदमान-निकोबारमधील ग्रेट-निकोबारवरील मूठभर अतिश्रीमंतांच्या ऐय्याशीसाठी जंगलतोड करुन उभारल्या जात असलेल्या तथाकथित भाजपाई विकास- प्रकल्पाविरोधात मा. खासदार कुमार केतकरजींनी राज्यसभेत आवाज उठविल्याबद्दल त्यांचे 'धर्मराज्य पक्षा'तर्फे आभार! मात्र, मा. कुमारजींनी अंदमान-निकोबारमधील ग्रेट-निकोबारच्या २५० चौ. कि.मी. क्षेत्रावरील लाखो-करोडो वर्षांपासूनच्या मूळ जंगलावर अतिश्रीमंतांच्या ऐय्याशीसाठी भाजपाई सरकार निर्घृणपणे चालवणार असलेल्या कुऱ्हाडीबाबत... केवळ, 'पर्यावरण-कायद्याच्या अंमलबजावणी'बाबतची घेतलेली 'बोटचेपी' व अतिशय मर्यादित भूमिका 'धर्मराज्य पक्षा'ला मुळीच पटलेली नाही.

जंगलं उध्वस्त करणाऱ्या व फार मोठ्याप्रमाणावर 'कार्बन-ऊत्सर्जन' करणाऱ्या, या अशा कुठल्याही काँक्रिटीकरण-शहरीकरण-औद्योगिकीकरणाच्या प्रकल्पाला 'हवामान-बदला'च्या अतिगंभीर जागतिक पेचप्रसंगात जगभरात कुठेही ठाम विरोध, हा निदान यापुढे तरी व्हायलाच हवा. अतिश्रीमंत-वसाहतसुविधा उभारणीच्या रुपाने होणाऱ्या ग्रेट-निकोबारमधील 'हरितद्रव्या'च्या विध्वंसनाला व त्या अतिश्रीमंत-वसाहतीतून होणाऱ्या संभाव्य व कायमस्वरुपी वाढीव 'कार्बन-ऊत्सर्जना'ला (काँग्रेसच्या काळात हेच थोड्याफार फरकाने होत आलं होतं व त्या त्या वेळेस अशा विविधप्रकल्प उभारणीला आम्ही धाडसाने व चिकाटीने संघर्ष करुन विरोध केला होताच... फक्त, भाजपाच्या रासवट राजवटीत, याचा फारच अतिरेक व्हायला लागलाय, इतकंच)

 मा. खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेतील भाषणातून कडवा विरोध केवळ, 'Climate Change' या मुद्द्यावरच भर देऊन करायला हवा होता. हे शहरीकरण-औद्योगिकीकरण आणि चंगळवादी जीवनशैली, हीच तर या विनाशकारक Climate Change ची मूलभूत कारणे आहेत. जगभराच्या कुठल्याही कोपर्‍यात होणारे, होऊ घातलेले... अशासारखे प्रकल्प वगैरे म्हणजे, जागतिक-तापमानवाढीच्या अथवा हवामान-बदलाच्या महासंकटाला (Climate Change) स्वतःहून अगत्याचं आमंत्रण देणं आहे आणि जंगलावर नव्हे; मानवजातीने स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारुन घेणं आहे... मानवजातीनं, आजच्या व भविष्यातील पिढ्यांच्या संदर्भात, हात दाखवून अवलक्षण करणं आहे! ...आणि, म्हणूनच, व्यासंगी पत्रकार-संपादक व विचारवंत असलेल्या मा. कुमारजी केतकरसाहेबांकडून निसर्ग-पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत, एक राज्यसभेतील ज्येष्ठ खासदार म्हणून, ग्रेट-निकोबार जंगल-उध्वस्तीकरणासंदर्भात अधिक तर्ककठोर ठाम भूमिका घेतली जाण्याची, 'धर्मराज्य पक्षा'ची अपेक्षा होती!


...राजन राजे
अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष... भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही 'हरित-पक्ष'...
The First Green-Political Party Of India
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1