Top Post Ad

बिल्डर सुरज परमार प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी


 ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांनी सूसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. त्यानंतर परमार यांची डायरी सापडली. त्यात अनेक राजकिय व्यक्तींची सांकेतिक भाषेत लिहिलेली नावे आढळून येत त्या व्यक्तींना पैसे दिल्याची माहिती उघडकीस आली. तसेच त्यातील काही नावे खोडा-खोड केल्याचेही उघडकीस आले होते. परमार यांच्या याच सुसाईड नोटमध्ये ES नावाच्या एका राजकीय नेत्याचाही उल्लेख असल्याचा दावा आता अरविंद सावंत यांनी केला आहे. दिशा सालियन प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. त्यानंतर संजय राऊत यांनी परमार आत्महत्येप्रकरणी गंभीर आरोप करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. संजय राऊत हे  रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

यावेळी संजय राऊत म्हणाले की, ठाण्यातील एक बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत, आमचे खासदार अरविंद सावंत यांनी एक विषय मांडला. ठाण्यातील एक बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत. लावा त्यांच्याविरोधात एसआयटी चौकशी. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आणि भाजपा त्यांना पाठीशी घालत आहे. लावा चौकशी, करा एसआयटी असे आव्हानच भाजपाला दिले.

ठाण्यातील एम. सी. एच. आय या बिल्डर संघटनेचे अध्यक्ष आणि बिल्डर सूरज परमार यांनी 7 ऑक्टोबर 2015 रोजी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सविस्तर चिठ्ठी लिहून त्यामध्ये ठाण्यातील काही बड्या राजकीय नेत्यांनी तसेच ठाणे महापालिकेतील कथित गोल्डन गँगमधील काही नगरसेवकांनी बांधकाम व्यवसाय करताना, बांधकामाच्या विविध परवानग्या मिळवताना त्यांना कसा त्रास दिला होता. या परवान्यांच्या मोबदल्यात कशी खंडणी वसूल केली याचा सविस्तर उल्लेख या चिठ्ठीमध्ये परमार यांनी मांडला होता. चिठ्ठीमध्ये नमूद केलेल्या मंडळींच्या मानसिक आणि आर्थिक मागण्यांना कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे परमार यांनी या चिठ्ठीत म्हटले होते. पोलीस दलातील सुत्रानुसार या चिठ्ठीमध्ये परमार यांनी एकूण 34 व्यक्तींची नावे शॉर्टफॉर्ममध्ये लिहिली होती. ज्यामध्ये चार नगरसेवकांचीही नावं होती. 

 या प्रकरणाचा तपास करणार्‍या ठाणे पोलिसांनी या सर्व संशयित व्यक्तींची चौकशी केली आणि ज्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे आढळून आले अशा एकोणीस जणांविरोधात कारवाई केली होती. मग चिठ्ठीत नमूद असलेल्या अन्य 16 जणांना पोलिसांनी का वाचवले? कुणाच्या सांगण्यावरून अथवा दबावावरून अन्य सोळा जणांना वाचवण्यात आले? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत

परमार यांनी आत्महत्या करण्याच्या काही दिवसापूर्वी २६ सप्टेंबर २०१५ रोजी आपल्या परिवाराचे जुने स्नेही आणि ज्योतिषी वल्लभ रामजी माजेठीया यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान परमार यांनी आपल्या मनातील व्यथा माजेठीया यांच्या समोर व्यक्त केली होती. परमार यांनी माजेठीया यांना आपणास ठाण्यातील काही लोकप्रतिनिधी पैशासाठी छळत असल्याचा उल्लेख केला होता. " सब लोग मुझे बिल्डर लाइन मे मुझे खत्म करने मे लगे है" या शब्दात परमार यांनी आपल्या मनातील अस्वस्थता माजेठीया यांच्यासमोर मांडली होती. " वो राक्षस लोग है, वो खतरनाक लोग है, जो लोग ठाणा मे बैठके नरेंद्र मोदी को उडाने का प्लान कर सकते है, उनके सामने मैं कीस झाड की मुली हु" असे परमार यांनी सांगितले होते.

 "वो लोग बहुत खतरनाक है, जो लोग ठाणा मे बैठके नरेंद्र मोदी को उडाने का प्लान कर सकते है, उनके सामने मैं कीस झाड की मुली हु" या शब्दात आत्महत्या करण्याच्या काही दिवसा पूर्वी बिल्डर सुरज परमार यांनी आपल्या परिवाराचे जुने स्नेही आणि ज्योतिषी वल्लभ रामजी मजेठिया यांच्या समोर आपली व्यथा व्यक्त केली होती. पोलिसांनी घेतलेल्या जबाबात ही बाब संबंधीत मजेठिया यांनी उघड केली असून याच जबाबात परमार यांना ठाण्यातील राजकीय नेते त्रास देत होते असा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी मजेठिया यांचा जबाब कोर्टासमोर सादर केला आहे.

पोलिसांनी घेतलेल्या जबाबात वल्लभ माजेठीया यांनी वरील सर्व घटनाक्रम लेखी स्वरूपात नोंदविला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, परमार फॅमिली पूर्वी टेम्भी नाका येथे राहवयास होती. मी सूरज परमार यांचे आजोबा रूपचंद सेठ यांचे सोबत लहानपनी त्यांचे कामानिमित्त नेहमी फिरायला जायचो. तेव्हा पासून मी परमार फॅमिलीला चांगल्या प्रकारे ओलखतो. रूपचंद सेठ यांना मांगीलाल आणि रमेश अशी दोन मुले होती. ती माझी समन्वयक असल्यामुळे माझे चांगले मित्र होते. मांगीलाल यांना उदय, हेमन्त, रजनी तीन मुले आहेत. तसेच रमेश परमार यांना सूरज परमार आणि नयना असे दोन मुले आहेत. 

दरम्यान मी देवीची पूजा करत असल्याने सूरज तसेच इतर सर्व मुले मला खुप मानतात. सर्वांना मी अंगाखांद्यावर खेळवले असल्यामुळे ते सर्व मला प्रेमाने अंकल म्हणतात. सूरज हां दर शनिवारी टेम्भी नाका येथील हनुमान मन्दिरात दर्शनासाठी यायचा. त्यावेळी तो नेहमी माझे बैठकीच्या ठिकाणी भेटत असे. माझे भेटिनंतर तो टेम्भी नाक्यावरील जैन मंदिरात जात असे. सूरज हा कॉसमॉस ग्रुप या नावाने बांधकाम करीत होता. सूरज मला भेटिवेळी त्याच्या सर्व सुख दुखाच्या गोष्टी मला सांगत असे. तसेच काही अडचणी आल्यास त्याबाबत माझ्याशी सल्ला मसलत करीत असल्याचेही माजेठिया यांनी नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1