आता कोरोना परत बाळंत होणार. ज्या चोर आणि चालबाज देशातील लोकांना कसे जगावे, हे माहित नाही अशा लोकांनाच मृत्यु लवकर कवटाळतो, हे आपण मागील कोरोनाकाळात पाहिले.भारतातील कोरोना आणि इतर सर्व देशातील कोरोना यांच्या मृत्युच्या दरातील खूप मोठा फरक आपण मागे पाहिला आहे. फक्त भारतात मृतदेहाच्या टाळूवरील लोणी खाणारी अवलाद अस्तित्वात असल्याने, लोकांच्या अज्ञानाचा, असहाय्यतेचा, अगतिकतेचा, फायदा उठवला जातोय. हे कटुसत्य आहे. पचायला जड आहे. पण दुर्दैव असे आहे, जे ज्ञानी आहेत, विवेकी आहेत, ते स्वतः मौन पाळून, शहामृगासारखे मान खाली घालून परिस्थिती सुधारण्याची नुसती वाट बघत बसतात.
शेवट ?
- भीती निर्माण करून ती कॅश करणे. ही सोपी वाट ते पत्करतात आणि सरकारी नियमांचा बागुलबोवा उभा करून आलेल्या परिस्थितीला ते कॅश करून घेतात.
म्हणूनच कोरोनाच्या यापुढील येणार्या कोणत्याही अवतारांना कुणीही अजिबात घाबरून जाऊ नये.
कोरोनाला पुनः बालबच्चे होणार, एकदोन लक्षणे इकडची तिकडे करून कोरोना मधे ताप न येणे वा न येणे, घुसमट होणे, न होणे इ. हे हे असे घडवले जाणार, हे आधीपासूनच माहित होते. कारण या नवीन कोवीड xbb व्हेरीयंटमागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. हे पक्के लक्षात ठेवावे. कोविड 19 च्या वेळेस सुद्धा आपण हे प्रत्यक्ष बघितलेले आहे, जो डर गया सो मर गया.
जे स्वतःला तपासायला गेले ते गेलेच ! मागील कोरोनाच्या वेळेस जशी मृत्युची दोनच कारणे होती, तशीच दोन कारणे आतादेखील आहेत.
1. आत्यंतिक प्राणांतिक भीती. आणि 2. नसलेल्या कोरोनावर औषधांचा बेसुमार वापर.
या दोन्ही कारणापासून लांब रहावे.
भीतीमुळे शरीरात विशिष्ट स्ट्रेस हार्मोन्स तयार होतात. ज्याचा प्रतिकार शरीर करू शकणार नाही. परिणामी, शरीराची आणि मनाची प्रतिकारशक्ती संपून जाते आणि मृत्यु ओढवतो.
शत्रूला वेळेअगोदर ओळखले तर भीती वाटण्याची गरज नाहीये.
# प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी काय करावे ?
#लस घ्यायला जाऊच नये. किंवा # ज्यांनी कोरोनाची लस आणि बूस्टर डोस घेतलेले आहेत, त्यांनी खालील उपाय अवश्य करावे. यालाच डिटाॅक्झीफिकेशन म्हणतात.
- 1 लंघन. - चरचरीत भूक लागेपर्यंत काहीही खाऊ पिऊ नये. रिकाम्या पोटी पाणी तर अजिबात पिऊ नये. जेवलो नाहीतर अशक्तपणा येतो, ही अंधश्रद्धा आहे.
- 2. उलटी होणार असं वाटत असेल तर जरूर उलटी करा. उलटी करणे ही अत्यंत प्राकृतिक कृती असते. वाटल्यास कोमट पाणी थोडेसे मीठ टाकून प्यावे आणि बोट घालून उलटी करावी. कडू आंबट उलटी झाल्यावर बरे वाटेल.
- 3. जवळपास पंचकर्म करणारे आणि कोरोनाकाळात न घाबरता, वैद्यकीय सेवा सुरू ठेवलेल्या, आपल्या ओळखीच्या खात्रीच्या वैद्यांकडे जाऊन 50 ते 100 मिली. रक्तमोक्षण करून घ्यावे. या रक्तमोक्षणाने कोणताही अशक्तपणा येत नाही. उलट रक्तातील छुपा जंतुसंसर्ग शरीराबाहेर काढून टाकायला मदत होते. जे वैद्य अथवा डाॅक्टर कोरोनाला घाबरलेले होते, अशांच्या वार्तेला पण जाऊ नये. उगाचच नको त्या भीतीचा किडा आपल्या डोक्यात सोडण्याची शक्यताच जास्ती.
- 4. आपल्या कोठ्यानुसार जुलाबाचे औषध जरूर घ्यावे. यात एरंडेल तेलाला फार महत्व आहे. यामुळे होणार्या जुलाबाने शरीरातील अतिरिक्त पित्त निघून जाते.
- 5. कोणतेही लक्षण नसताना, कोणत्याही लॅबमधे, रोगाची कारणं शोधायला किंवा रोगाचे बारसे करायला जाऊ नका. किंवा डॉक्टरला नकोत त्या वैद्यकीय शंका विचारण्याच्या फंदात पडू नका. जेवढ्यास तेवढे औषध घेऊन गप्प रहावे. नाहीतर आगीतून फुफाट्यात जाल. वैद्यकीय क्षेत्रात अज्ञानात शहाणपणा असतो.
- 6. उगाच वाॅटसप आणि नको त्या माणसांचे कोणतेही वैद्यकीय सल्ले ऐकू नका. किंवा अशा पोस्ट फाॅरवर्ड करू नका. याने अफवा पसरतात.
- ज्या मेसेजखाली कोणाचेही नाव नाही, किंवा दूरध्वनी क्रमांक नाही, अशा मेसेजना सरळ डिलीटून टाकावे . यातच इतरांचे कल्याण होणार आहे. जर नंबर असेल तर सरळ त्या नंबरला फोन लावून खात्री करून ती व्यक्ती सरकारमान्य वैद्यकीय सनद मिळालेली अधिकारी आहे का याची खात्री करावी.
- 7. याचवेळेस अनेक घरगुती औषधांचे पिक येते हळद तुळस गुळवेल इ वनस्पतींचा वारेमाप आणि अनावश्यक वापर करू नका. कोणतेही औषध हे औषधच असते. त्यालाही साईड इफेक्ट्स असतात.
- 8. घरात सकाळ सायं. दोन वेळेस खालीलपैकी कोणत्याही वनस्पतींचा धूर तयार करून फिरवावा. यासाठी एकावेळेस फक्त एकच लहान गोवरी वापरावी. आंब्याची पाने, तुळस, कडूनिंब, कढीपत्ता, लता करंज, हळद, वेखंड, निर्गुडी, या पानाचा अथवा सालीचा वापर धूर करण्यासाठी करावा. एकावेळेस तीन चार उदबत्या पेटवल्यावर जेवढा धूर तयार होतो, तेवढ्याच प्रमाणात धूर तयार करावा. उगाचच घरात मोठा "धुकट" करून स्वतःला गुदमरवून घेऊ नये. दामले उवाच या युट्युब चॅनेल वरील कोवीड विषयावरील व्हिडिओ पुनः पुनः पहावेत.
- 9. वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वतःची बुद्धी चालवून उगाचच कोणतेतरी काढे करून पित राहू नये. त्याने अनावश्यक पित्त वाढते. त्यापेक्षा भूक लागल्यावर पोटभर जेवावे. यात शहाणपणा आहे आणि शाकाहारीच असावे. उगाच हाय प्रोटीन डाएटच्या नावाखाली, नॉनव्हेज खाऊन, पोट आणि पचन बिघडवून घेऊ नये.
- 10. सॅनिटायझरचा वापर नकोच.
- 11. दिवसातून दोन ते तीन वेळेस आंघोळ करायला काहीच हरकत नाही.
- 12. सर्व शक्तीमान परमेश्वर आपल्या सोबत आहेत, यावर विश्वास ठेवावा. परमेश्वरापेक्षा आपल्याला जास्ती कळते, अशा बुद्धीभेद करणार्या विज्ञानिकापासून सावध रहावे.
- 13.मुख्य म्हणजे आपण स्वतः अजिबात घाबरू नये. आणि इतरांना घाबरवू नये. अशा बिकट काळात सगळ्या समाजसेवकांना सेवेचा अगदी ऊत येतो आणि एखादी वैद्यकीय पोस्ट टाकली नाहीतर जग बुडेल असे वाटून वाट्टेल त्या पोस्ट व्हायरल केल्या जातात. असे न व्हावे.
- 14. काही झालेले नाही, काही होणार नाही, या वाक्यावर विश्वास ठेवावा.
- 15. घरातील मुलांना धीर द्यावा, त्यांच्याकडून हलका व्यायाम ( जसे प्रदक्षिणा आणि लोटांगण ) करवून घ्यावे.
- 16. देव करो आणि कोरोनाला परत हाताला धरून भारतात आणले जाऊ नये. ही प्रार्थना परमेश्वराकडे करूया.
II शुभंभवतु ll
वैद्य सुविनय वि. दामले, ..........कुडाळ, सिंधुदुर्ग
दि. 21.12.2022.
------------------------------------
सध्या कोविडच्या नावावर जे काही चालू आहे त्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोविडची नवीन स्ट्रेन कुठून येण्याची गरज नाही. मुळात आपण व्हायरस सोबत आणि व्हायरस आपल्यासोबत मागच्या काही वर्षापासून राहतच आहोत. नवीन व्हेरिएंट XBB आणि XBB1 या व्हेरियंट चे काही रुग्ण आपल्या देशात आहेत परंतु हा सौम्य ते मध्यम स्वरूपाचा आजार असून यांनी कोणत्याही प्रकारची मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होण्याची सुतराम शक्यता नाही त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही.
इतर कोविडच्या व्हेरियट सारखाच हा एक प्रकार आहे त्यामुळे काळजी घ्या परंतु काळजी उरावर बसून घेण्याची अजिबात गरज नाही. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा, व्हॅक्सिनचे बूस्टर घेतलं नसेल तर घेऊन टाका. याशिवाय अजून काही काळजी करण्याचे कारण नाही. जे आज सरकारने अतिशय युद्ध पातळीवर कोविड चा बाऊ चालवला आहे तो कदाचित राहुल गांधी यांची " भारत जोडो यात्रा" रोखण्यासाठी तर नाही ना? अशी शंका यायला बराच वाव आहे..!
- अरुणा नारायण (मुंबई)
0 टिप्पण्या