हकालपट्टी वेळीच झाली नाही, तर हा महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही


 महात्मा ज्योतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील ही आमचं आदर्श स्थान आहे. पण त्यांच्याबद्दल बोलणारा बेजबाबदार माणूस पाहिला नाही. मी स्वत: विधानसभेच्या विधानमंडळात 55 वर्ष पाहिली. अनेक राज्यपाल पाहिले. पण यावेळी असा माणूस राज्यपाल म्हणून आला आहे, तो सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यावर वादग्रस्त विधान करत आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे, महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, शाळा असो यासंबंधी कार्य केले आहे. महात्मा फुले यांचं नाव देशभरात आदराने घेतलं जात. पण, अशा व्यक्तींने ज्ञानदानाचे कार्य केले त्यांनी त्यांची टिंगलटवाळी केली. अशा माणसाला राज्यपालपदी राहण्याची आवश्यकता नाही,  'या मोर्च्याच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करतो की, या राज्यपालांची लवकरात लवकर हकालपट्टी करा. आज लोक शांततेनं आहे. ही हकालपट्टी वेळीच झाली नाहीतर हा महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

महाविकास आघाडीने रिचर्डसन अँड कृडास कंपनी, नागपाडापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत हल्लाबोल मोर्चा काढला. या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, समाजवादी पक्षाचे अबु आझमी, शेकापचे जयंत पाटील, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह मविआचे सर्व घटक पक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनीही मोर्चाला संबोधित केले. शिवसेनेचे खा. संजय राऊत, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, आमदार कपील पाटील, माकपचे नेते यांचीही भाषणे झाली. खासदार राजन विचारे यांनी कार्यकर्त्यांसह ठाणे ते मुंबई रेल्वे प्रवास साधला. शिंदे गटाने जाणून बुजून परीवहन बंद केल्याचा राजन विचारे यांनी आरोप केला आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, आज गमंत वाटते, या राज्यकर्त्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे, कर्तुत्वाची नाही, महाराष्ट्राच्या विकासासाठी नाही. एका मंत्र्याने शालेय शिक्षण संस्थेबद्दल भीक मागत असा उल्लेख केला. अशा लोकांना धडा शिकवण्याची गरज आहे, आज राज्यातून महाराष्ट्राच्या सन्मानासाठी लाखो लोक एकत्र आले. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, ती लोक वेगळ्या प्रकारची भाषा वापरत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणण्याचे काम शिवरायांनी केलं आहे. आज 350 वर्ष झाली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवरायांचं नाव घेतलं जात आहे. पण, राज्याच्या सरकारमधील मंत्री शिवरायांबद्दल वाटेल ते विधान करतो, अन्य कुणी काही तरी बोलतो. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. आज लोकशाही मार्गाने त्यांना कायमचा धडा शिकवायचा असून स्वस्थ बसणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांचा जोरदार समाचार घेतला आहे. 'बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला असेल. ज्यावेळी या मोर्चाची घोषणा केली तेव्हा काही जणांनी तुम्ही या मोर्चात चालणार का, असं मला विचारलं. मी तेव्हाच सांगितलं होतं की, केवळ मोर्चात चालणार नाही तर मी आणि लाखो महाराष्ट्रपेमी हे महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहोत. हे चालणं प्रतिकात्मक आहे. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्याला डिवचलं, त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच ती वेळ आहे,' 'आज सर्व पक्ष एकवटले आहेत, फक्त महाराष्ट्रद्रोही वेगळे आहेत. राज्यपाल हटवा, ही आमची मागणी आहे. खरंतर भगतसिंह कोश्यारी यांना मी आता राज्यपाल मानतच नाही. त्या खुर्चीचा मी सन्मान करतो. मात्र तिथे कोणीही बसावं आणि कोणालाही टपल्या माराव्यात, हे सहन केलं जाणार नाही. केंद्रामध्ये बसणाऱ्यांच्या घरी काम करणाऱ्या माणसाला कुठेतरी पाठवून द्यायचं, हे चालणार नाही. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात. मात्र ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, महात्मा फुलेंबद्दल, सावित्री फुलेंबद्दल अवमानकारक बोलत आहेत,' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, संयुक्त महाराष्ट्रानंतरचा हा सर्वात मोठा लढा आहे. आता बेळगाव महाराष्ट्रात आणल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असा निश्चयही यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करण्याचे काम राज भवनातून भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून सुरु झाले आणि नंतर भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने तेच काम सुरु ठेवले. भाजपा नेते सातत्याने महापुरुषांचा अपमान करत आहेत यावर जनतेत प्रचंड चीड आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांनी शिक्षण संस्थांसाठी भीक मागितली असे उद्गार काढून महापुरुषांच्या अपमानाचा कळसच गाठला. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सीमावादाच्या प्रश्नाने डोके वर काढले असून सीमेवरची गावं शेजारच्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. महापुरुषांचा अपमान, सीमावाद या प्रश्नावर महाराष्ट्रद्र्योह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला तेव्हापासून महाराष्ट्र एकसंध रहावा यासाठी प्रयत्न करण्यात आले पण ईडी सरकार मात्र महाराष्ट्राचे तुकडे करू पहात असून आम्ही ते कदापी होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.


  बहुचर्चेत महाआघाडीचा हल्लाबोल मोर्चा शांततेत पार पडला. शिवसेना ,काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्ष, शेकाप ,सीपीआय इत्यादी मित्र पक्षांच्या आघाडीचा महापुरुषांच्या  अवमानाच्या विरोधात मोठा मोर्चा यशस्वी झाला .सभेचे सूत्रसंचालन विनायक राऊत यांच्याकडे होते. अनिल देसाई ,मिलिंद नार्वेकर  ,चंद्रकांत खैरे अंबादास दानवे यांच्यासह फायरब्रॅॅन्ड नेत्या सुषमा अंधारेही विचारपीठावर विराजमान होत्या, 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1