Top Post Ad

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डिसेंबर महिना

 
   क्रांतिकारी विचारांच्या संत महापुरुष,महामानव यांचा संघर्ष वाचला तर इतिहास घडविता येईल.असे विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे.त्यांच्या जीवनातील "डिसेंबर" महीन्यातील काही महत्वाच्या बाबी माहिती असणे आवश्यक आहेत.फक्त अखेरचा सहा डिसेंबर महापरीनिर्वाण दिना यालाच महत्व देणारे इतर संघर्षाकडे दुर्लक्ष करतात.म्हणूनच डिसेंबर महिन्यातील घटनेवर लक्ष वेधतो.

01) डिसेंबर 1896 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई "भीमाबाईचे" मस्तकशुळाने निधन झाले.

02) डिसेंबर 1904 मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सुभेदारांनी आपले बि-हाड मुंबईस हलविले. मुंबईत ते एल्फिन्स्टन रोडच्या डबक चाळीत राहवयास गेले. सुभेदारांनी प्रथम "भीमरावांना" मराठा हायस्कूलमध्ये दाखल केले. परंतु तेथील अभ्यासक्रम उच्च दर्जाचे नसल्याने भीमरावांना एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल केले.

03) 12 डिसेंबर 1916:- भीमराव व रमाबाई या दांपत्याला पुञरत्न झाले. (बी.आय.टी. चाळ नं.1,रुम नं.50,परळ,मुंबई) त्याचे नाव यशवंतराव भैयासाहेब म्हणून ओळखले गेले.

04) 18 डिसेंबर 1916 लंडन विद्यापीठाच्या सिनेटने भीमरावांच्या अर्जावर चर्चा करुन भीमरावांना सरळ "M. Sc."च्या पदवी परिक्षेला बसण्याची परवानगी देणारा ठराव संमत केला.

05) 5 डिसेंबर 1917 भीमरावांनी सिडनहॅम काॅलेजातील प्राध्यापकाच्याजागेसाठी अर्ज केला.

06) 15 डिसेंबर 1925 भालताच्या चलन पद्धतीत योग्यत्या सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने " राॅयल कमिशन आॅन इंडियन करन्सी अॅण्ड फायनान्स" हे कमिशन सर एडमंड हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमले होते. त्या कमिशनसमोर डाॅ. आंबेडकरांची साक्ष झाली. या कमिशनने आंबेडकरांसह एकूण अर्थतज्ज्ञांच्या साक्षी घेतल्या. त्या वेळी कमिशनच्या प्रत्येक सदस्यांच्याहाती डाॅ. आंबेडचरांच्या 'इव्हल्युशन ऑफ प्राॅव्हिन्शियलफायनान्स इन ब्रिटिश इंडीया' या ग्रंथांची प्रत होती.

07) डिसेंबर 1926 डाॅ. भिमराव आंबेडकर व डाॅ.पी.जी.सोळंकी यांची मुंबई सरकारने सरकार नियुक्त सदस्य म्हणून मुंबई विधिमंडळावर नेमणूक केली.

08) 25 डिसेंबर 1926 मुंबई विधिमंडळावर निवड झाल्याबद्दल नायगावच्या "वाय.एम.सी. ए." च्या हाॅलमध्ये उभयतांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले.

09) 25 डिसेंबर 1927 डाॅ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विषमतेची शिकवण देणा-या "मनुस्मृती" या हिंदूंच्या पविञ ग्रंथाची बापुसाहेब सहस्ञबुद्धे यांच्या हस्ते परिषदेच्या मंडपा समोर खास तयार केलेल्या वेदीत दहन करण्यात आले.

10) 25-26 डिसेंबर 1927 महाड सत्याग्रह परिषद डाॅ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.

11) 27 डिसेंबर 1927:- महाड परिषदेच्या अखेरच्या दिवशी स्ञियांना उद्देशून "ज्ञान आणि विद्या या गोष्टी स्ञियांनाही आवश्यक" या मुद्यावर भाषण दिले.

12) 28 डिसेंबर 1929 "बहिष्कृत भारत" चा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

13) 28 डिसेंबर 1929 "धारवाड जिल्हा बहिष्कृत परिषद" बैठक पहिली, धारवाड येथे डाॅ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरली. "माझा इंग्रज सरकारवर विश्वास नाही. आमचा उद्धार आम्हीच करुन घेतला पाहिजे." असे त्यांनी आपल्या भाषणात सांगीतले.  

  14) 31 डिसेंबर 1937 पंढरपूर येथे भरलेल्या सोलापूर जिल्हा अस्पृश्य परिषदेत डाॅ. आंबेडकराचे भाषण, पंढरपूर नगरपरिषदेतर्फे डाॅ.आंबेडकर यांचा सत्कार.

15) डिसेंबर 1938 तत्कालीन निझाम राजवटीतील औरंगाबाद येथे "बहिष्कृत" वर्गाच्या प्रथमच भरलेल्या परिषदेत, अस्पृश्यांनी स्वावलंबी बनावे असा उपदेश केला. 

  16) 11 डिसेंबर 1938 श्रीरामपूर, जि.नगर येथे महारपरिषदेत अध्यक्षीय भाषण केले.

  17) 16 डिसेंबर 1941 सिन्नर, जि. नाशिक येथे डाॅ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या परिषदेत 'जुडी कर' अन्यायकारक असल्याचे सांगून भाषणात निषेध व्यक्त केला  

18) डिसेंबर 1942 कॅनडातील क्युबा या शहरात "इन्स्टिट्यूट ऑफ पॅसिफिक रिलेशन्स" या संस्थेच्या आठव्या परिषदेत डाॅ. आंबेडकरांनी 'अनटचेबल्स अॅण्ड द इंडियन काॅन्स्टिट्युशन' हा शोधनिबंध सादर केला. हाच शोधनिबंध त्यांनी "मिस्टर गांधी अॅण्ड इमॅन्सिपेशन ऑफ अनटचेबल्स" या नावाने ग्रंथरुपाने (1942) ला प्रसिद्ध केला.

19) 1 डिसेंबर 1943 डाॅ. आंबेडकर यांचे मुंबईत आगमन. त्यांची ही भेट टेक्निकल ट्रेनिंग सेंटरच्या पुनर्बांधणी संदर्भात होती.  

20) 5 डिसेंबर 1943 डाॅ.आंबेडकरांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी परळ, मुंबई ( गोकुळदास पास्ता रोडजवळील मैदान) येथे मडकेबुवा यांचे अध्यक्षतेखाली डाॅ. आंबेडकरांचा भव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डाॅ. आंबेडकर म्हणाले की,अस्पृश्य समाज लुळा पांगळा आहे. परंतु त्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकावे, गुणावर व लायकीवरच वर चढण्याची उमेद बाळगावी.

  21) 8 डिसेंबर 1943 डाॅ. एम.एन.राॅय स्थापित हिंदीकामगार फेडरेशनच्या (इंडियन फेडरेशन आॅफ लेबर) वार्षिक अधिवेशनाचे डाॅ. आंबेडकरांच्या हस्ते मुंबईतील वरळी जेलजवळील मैदानात उदघाटन झाले. 

 22) 9 डिसेंबर 1943 भारत सरकारचे मजूरमंञी डाॅ. आंबेडकर यांनी बिहारमधील धनबाद येथील भुलन बरारी कोळसा खाणींची 400 फूट खाणीत उतरुन प्रत्यक्ष पाहाणी केली. मजुरांना भेटून त्यांचे प्रश्न समजून घेतले. कामगारांच्या वसाहतीला भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.

23) 10 डिसेंबर 1943 बिहारमधील राणीगंज कोळसा खाणींना भेट देऊन मजूरमंञी डाॅ. आंबेडकरांनी खाणीतील मजुरांची सुरक्षितता, प्रसाधन व्यवस्था, आरोग्य सुविधा आदींची तसेच मजुराच्या वसाहतींची पाहणी केली.

24) 4 डिसेंबर 1944 मुंबई सेंट्रलहून सायंकाळी फ्राॅन्टीयर मेलने दिल्लीस रवाना झाले.

25) 30 डिसेंबर 1944 कानपूर येथे एन. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या समता सैनिक दलाच्या दुस-या अधिवेशनात बोलताना "अस्पृश्य तरुणांनी शे.का.फे.च्या पाठीमागे आपली ताकद उभी केली पाहीजे. असे झाल्यास कोणालाही अस्पृश्यांच्या न्याय्य हक्कांकडे दुर्लक्ष करण्याची हिंमत होणार नाही. असे सांगीतले.

26) 6-7 डिसेंबर 1945 मुंबईच्या सचिवालयात भारताचे मजुरमंञी डाॅ. आंबेडकर यांनी विभागीय कामगार आयुक्तांच्या परिषदेचे उदघाटन केले.

27) 8 डिसेंबर 1945 मनमाड येथे भरलेल्या शे. का. फे.च्या परिषदेतील भाषणात डाॅ. आंबेडकरांनी येऊ घातलेल्या निवडणुकांसंदर्भात सांगीतले की, "आता सर्व राखीव जागा जिंकल्याशिवाय तरणोपाय नाही.

28) 9 डिसेंबर 1945 मनमाड येथील अस्पृश्य विद्यार्थी बोर्डींगच्या इमारतीच्या कोनशिला समारंभ प्रसंगी "शिक्षणाशिवाय मा-याच्या जागा काबीज करता येणार नाही" या मुद्यावर भाषण दिले. 

29) 9-10 डिसेंबर 1945 व-हाड प्रांतिक शे.का.फे.च्या अकोला येथे भरलेल्या पहिल्या अधिवेशनात निवडणूक प्रचाराच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.  

 30) 13 डिसेंबर 1945 नागपूर येथे भरलेल्या प्रचंडसभेत त्यांनी भाषण केले. या प्रसंगी गुरु घंटाळची गोष्ट सांगून काँग्रेस गुरु घंटाळची भूमिका बजावत असल्याचे सांगीतले.

31) 23-27 डिसेंबर 1945 डाॅ. आंबेडकरांनी मद्रास प्रांताचा दौरा करुन निवडणूक प्रचार केला.

32) 9 डिसेंबर 1946 भारतीय घटना समितीची पहिली बैठक संपन्न होऊन तीत डाॅ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समीतीच्या अध्यक्षपदी निवड झाली.

33) 25 डिसेंबर 1946 घटना समितीत डाॅ. आंबेडकरांनीप्रभावी भाषण करुन भारताच्या ऐक्यावर भर दिला. प्रसैद्ध तत्त्ववेत्ते एडमंड बर्क यांचे वचन (It is very easy to give power, but it is difficult to give wisdom ) उदधृत केले.

34) 25-27 डिसेंबर 1946 अखिल भारतीय शे.का.फे.विद्यार्थी फेडरेशनचे दुसरे अधिवेशन जोगेंद्रनाथ मंडल यांच्या अध्यक्षतेखाली भरले. वस्तुतः या अधिवेशनाचे नियोजित अध्यक्ष डाॅ.आंबेडकर होते. पण घटना समितीच्या कार्यबाहुल्यामुळे ते हजर राहू न शकल्याने त्यांनी मंडल यांना अध्यक्ष नेमले व आयोजक गेडाम यांना आपला संदेश पाठविला.

35) 22 डिसेंबर 1948 शे.का.फे.च्या वतीने मुंबईतील आर.एम.भट हायस्कूल पटांगणात डाॅ. आंबेडकर व सौ.माईसाहेब यांना चहापान देण्याचा कार्यक्रम झाला.

36) 19 डिसेंबर1949 पंतप्रधान पं. नेहरु यांनी हिंदू कोड बिल संमत करण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

37) 20 डिसेंबर 1949 डाॅ. आंबेडकरांनी औरंगाबाद येथे आमखास (आताचे शिवाजी मैदान) येथे जाहीर सभेत भाषण केले. 

38) 22 डिसेंबर 1951 डाॅ. आंबेडकरांचे वरळी येथील बुद्ध विहारात बौद्ध धर्मावर भाषण झाले.

39) 24 डिसेंबर 1951 शे. का. फे. व समाजवादी पक्षातर्फे मुंबईतील चौपाटीवर निवडणूक प्रचार सभा झाली. डाॅ. आंबेडकरांनी प्रभावी विरोधी पक्षाची आवश्यकता असल्याचे सांगून केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी समाजवादी पक्षाशी युती केली असल्याचे सांगीतले.

40) 22 डिसेंबर 1952 पुणे जिल्हा विधी वाचनालयाच्या नव्या विभागाचे डाॅ. आंबेडकरांनी उदघाटन केले. त्या वेळी लोकशाही यशस्वी रीतीने चालवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे यावर भाषण केले.

41) 25 डिसेंबर 1953 निपाणी येथे भरलेल्या सभेत बोलताना निवडणुकीच्या पराभवाने निराश न होता चळवळ जिवंत ठेवण्याचा अनुयायांना संदेश दिला.

42) 1 डिसेंबर 1954 रंगून येथे भरणा-या जागतीक बौध्द परिषदेत भाग घेण्यासाठी "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर" रंगूनला पोहोचले. 

 43) 4 डिसेंबर 1954 बौद्ध परिषदेच्या प्रतिनिधींसमोर डाॅ. आंबेडकरांनी म्हटले की, "मी पार्लमेंटमध्ये असताना बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानासाठी काही गोष्टी करुन ठेवल्या आहेत.

44) 25 डिसेंबर 1954 डाॅ. आंबेडकरांनी देहू रोड (जि.पुणे) येथे बुद्ध विहाराचे उदघाटन केले. भाषणातचपंढरपुरच्या विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धाचीच मूर्ती असल्याचे सांगीतले. 

 45) 12 डिसेंबर 1955 औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातीलबोधि मंडळाच्या विद्यमाने एका सभेचे आयोजन होते. त्याप्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी "प्रत्येक विद्यार्थांने आपले चारिञ्य बनविले पाहीजे" या मुद्यावर भाषण दिले.

46) 21 डिसेंबर 1955 मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथे "मराठवाड्यासाठीस्वतंञ विद्यापीठाची आवश्यकता आहे." या मुद्यावर भाषण दिले.

47) 1 डिसेंबर 1956 दिल्लीत मथुरा रोड येथे भरलेल्या प्रदर्शनातील "बुद्ध मूर्तीचे डाॅ. आंबेडकरांनी निरीक्षण" केले.

48) 2 डिसेंबर 1956 बुद्धगया येथे होणा-या "2500व्या बुद्ध महापरिनिर्वाण" समारंभात भाग घेण्यासाठी आलेल्या "दलाई लामांच्या" सन्मानार्थ आयोजित मेहरोली, दिल्ली येथील समारंभात "डाॅ. आंबेडकर" उपस्थित राहीले. दलाई लामा यांनी डाॅ. आंबेडकरांचा "बोधिसत्व" असा गौरव केला.

49) 5 डिसेंबर 1956 जैन प्रतिनिधींच्या समवेत डाॅ.आंबेडकरांनी बौद्ध धर्म व जैन धर्म यांवर चर्चा केली. "दि बुद्धा अॅण्ड हिज धम्मा" या आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेवर शेवटचा हात फिरवून काही दुरुस्त्या केल्या.

50) 6 डिसेंबर 1956 डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे 26 अलीपूर रोड, दिल्ली या निवासस्थानी राञी झोपेतच परिनिर्वांण झाले.

51) 7 डिसेंबर 1956 डॉ. आबेडकर यांचा पार्थिव देह खास विमानाने मुंबईत आणून "राजगृह" या मुंबईतील निवासस्थानी दर्शनार्थ ठेवला. सायंकाळी दादर चौपाटी (आता चैत्यभूमी) येथे त्यांच्यावर बौद्ध धम्म पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी शासनातर्फे त्यांच्या सन्मानार्थ पोलिस मानवंदना (सलामी) देण्यात आली.तेव्हा पासून आज पर्यत सहा डिसेंबर हा महापरीनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो.आणि विशेष २५ ते ३० लाख लोक दरवर्षी मानवंदना देण्यासाठी येतात.त्याची जागतिक पातळीवर नोंद घेतली जाते.

संकलन : बालाजी भाऊ दवणे,(एम ए)
9673520356.पौर्णिमा नगर, नांदेड.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com