महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा होत असतो. आणि याच दिवशी प्रजासत्ताक जनताचा नोंदणीकृत पहिला अंक बाजारात आला. तशी ही चळवळ १९९८ पासून सुरु होती. मात्र विशेष अंकाच्या माध्यमातून... त्यानंतर याला नियमित करण्यासाठी भारत सरकारच्या अधिकृत वर्तमानपत्र नोंदणी कार्यालयाचा क्रमांक असणे आवश्यक होते. त्यासाठीचे सोपस्कार पुर्ण केल्यानंतर १ मे रोजी अधिकृतपणे नोंदणी झालेला पहिला अंक प्रकाशित झाला. आणि याच दिवशी वर्धापनदिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. तेव्हा आपण येणाऱ्या १ मे रोजी च्या वर्धापन दिन अंकास जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य कराल अशी अपेक्षा...
0 टिप्पण्या