भारताचा व्हेनेझुएला होऊ नये हीच सदिच्छा

 सरकारी आकड्यानुसार देशातील 6 लाख मोठ्या कंपन्या आतापर्यंत बंद पडल्या आहेत आणि त्यांना कच्चा माल पुरवठा करणाऱ्या प्रत्येकी 8-10 कंपन्या बंद पडल्या आहेत. ह्या सर्व कंपन्यांनी बँकांकडून मोठी लोन्स घेतली होती. ह्या सर्व कंपन्या बंद पडल्याने बँक हफ्ते देऊ शकत नसल्याने NPA झालेल्या आहेत.NPA झालेल्या कंपन्यांना सीबील रेकॉर्ड खराब झाल्याने कुठल्याही  बँकांकडून लोन मिळत नाही. ह्याचा अर्थ देशातील 60 लाख उद्योजकांना ह्यापुढे स्वतःचा उद्योगधंदाु सुरू करायचा असेल तर बँकेकडून कुठलीही आर्थिक मदत मिळणार नाही. 

देशातील बँकांचा NPA सध्या 45% पर्यंत पोहोचला आहे जो साधारणपणे 10% पर्यंत  असायला हवा. देशाचे बजेट 2018-19 साठी 17.5 लाख करोड रुपये होते आणि सरकारची आर्थिक वसुली 10 लाख करोड रुपये झाली. 
सरळ सांगायचे तर सध्या देश 7.5 लाख करोड रुपये तोटा सहन करत आहे. देशावरचे कर्ज सध्या 85 लाख करोड रुपये झालेलं आहे जे 2014 मध्ये 55 लाख करोड रुपये होतं. देशातील असे एकही उद्योग सेक्टर असे नाहीत की ते फायद्यात आहेत.
 
नोटबंदी मुळे पहिल्यांदा जनतेची खरेदी शक्ती संपली, चुकीच्या GST मुळे व्यापाऱ्यांची उद्योग शक्ती संपली, विविध कर प्रणाली मुळे बाजारातील विक्री शक्ती संपली. सगळे म्हणतात देश बदलत आहे पण कसा आणि कुठून? हे दिसत नाही.हळूहळू हा देश डबघाईला चाललाय हे नक्की...
मेलेल्या उद्योग जगाताला जिवंत करण्यासाठी बँकांना स्वतःचे नियम अचानकपणे बदलता येणार नाहीत.
त्यासाठी विशेष आर्थिक धोरण आखावे लागेल आणि राबवावे लागेल.पण ती इच्छाशक्ती सरकारकडे दिसत नाही आणि तसे अर्थतज्ज्ञही सरकारमध्ये  नाहीत.

मोदी खूप काम करत आहेत असे वारंवार सांगितले जाते मग देशाचे उत्पन्न का वाढत नाही?
असं कुठलं काम करत आहेत प्रधान सेवक?
गेल्या पाच वर्षे आणि तीन महिन्यात मोदींनी सरकारी पैशावर (जनतेच्या पैशावर) फिरून  संपूर्ण जग पालथं घातलं.
अनेक राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांना मिठ्या मारल्या.पण कुठल्याही देशातील मोठे गुंतवणूकदार भारतीय उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करण्यास का तयार होत नाहीत?
 मोदी जितक्या देशांना भेटले आणि गुंतवणूक करा सांगितले त्यातील 99% देशांच्या फायनान्स कमिटीने 
"सध्या भारतात गुंतवणूक करण्यासारखे वातावरण नाही". 
"भारतीय जनतेची खरेदी शक्ती 70% कमी झाली आहे" असे देशाला कळवलं आहे. 
भारत ज्या गोष्टींची निर्यात करत आहे त्यावर चीन थोड्याच दिवसात कब्जा करण्याच्या पावित्र्यात आहे. मग तुम्हीच सांगा मोदींना कुठल्याही राष्ट्र प्रामुख्याने गळे भेट दिली काय आणि  कुठल्याही देशाने सलामी दिली काय, कुठल्याही देशाच्या सभागृहाने उठून अभिनंदन केले काय  त्याचा भारतीय जनतेला काय व कसा फायदा झाला?

 फक्त आम्हाला कोणीतरी विचारतो ह्या विचाराने खुष होऊन समाधानी व्हायचे का? देशात 2014 साला पर्यंत 5-6 करोड युवक बेरोजगार होते  आता त्यामध्ये मोठीच भर पडत आहे . 
हीच परिस्थिती पुढील 2 वर्षात आणखी बिकट होणार आहे. मोदींकडे आणि BJP सरकार कडे असे कुठलेही आर्थिक धोरण नाही त्यामुळे बेरोजगारी पुढील काळात कमी होईल किंवा रोजगार उत्पन्न होतील.
 ज्यांना अजूनही मंदीची झळ लागलेली नाही असे लोकं मोदी सरकारचा जप करत आहेत आणि इतरांना तत्वज्ञान शिकवत आहेत. ज्यांना सगळं चांगलं चालले आहे असे वाटते त्यांना विचारा कधी बाजारात पायी फेरफटका मारला का? कधी सामान्य दुकानातून रोख रक्कम देऊन सामान खरेदी केले का? कधी नाक्यावरच्या चहा टपरी वर उभा राहून चहा पित पित आजूबाजूच्या लोकांच्या गप्पा ऐकल्या का? ज्यांची नाळ सामान्य जनतेशी कधी जुळली नाही, ज्यांनी नेहमी मॉल मधून कार्ड वापरून सामान खरेदी केले,जे कधी रस्त्याने चालले नाही ते अजूनही एका भ्रमात वावरत आहेत.

पण पुढील काळ देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडवणारा आहे हे स्पष्टपणे दिसत  आहे.
आता एवढीच एक सदिच्छा आहे की आपल्या देशाचा पुढील काळात व्हेनेझुएला होऊ नये.

जय हिंद 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA