बृहन्मुंबई / ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातिल कार्यरत सुरक्षा रक्षकांची पगारवाढ त्वरीत करण्यात यावी. जिल्ह्यांकरिता सुरक्षा रक्षक मंडळाच्या कामकाजाबाबत संनियंत्रण व सुव्यवस्थापन करिता संचालनालय स्थापण करण्या संदर्भात तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. सुरक्षा रक्षकांना खाकी रंगाला मिळती जुळती वर्दी रेमंड कपड्यामध्ये देण्यात यावी. सुरक्षारक्षकांचा पी. एफ हा पी. एफ ऑफीसलाच जमा करण्यात यावा. रायगड, पुणे तसेच अन्य जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने नव्याने भरती केलेल्या सुरक्षा रक्षकांना त्वरीत ड्युटी देण्यात यावी.आदी मागण्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातिल कार्यरत सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित सर्व मंडळांची (पगारवाढ ) संदर्भात आज दिनांक २९ नोव्हेंबर रोजी आझाद मैदान येथे न्याय संघटनेच्या वतीने न्याय संघटना अध्यक्षा आश्विनीताई अनिल सोनावणे यांनी आमरण उपोषण केले.
सदर उपोषण आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी संघटनेचे शिष्ट मंडळासोबत चर्चा केली. मुख्य मागणी पगारवाढी संदर्भात सकारात्मक निर्णय देत येत्या दहा दिवसांत मंत्रालयात मिटींग घेऊन पगारवाढीची मान्यता (घोषणा) करण्यात येईल असे आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिले. त्यांच्या आश्वासनानंतर संघटनेच्या आध्यक्षा आश्विनीताई सोनावणे यांनी महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्याच हस्ते तसेच महाराष्ट्र सहा कामगार आयुक्त बुवा साहेब यांच्या हस्ते आमरण उपोषण आंदोलन स्थगित केले. या उपोषणाला पक्ष संघटना तसेच सुरक्षा रक्षक उपस्थित होते तसेच तसेच विशेष सहकार्य संजय गायकवाड, संजय पाटील सर्वांचे आभार मानण्यात आले. संघटना महा.उपाध्यक्ष शंकर इंगोले. तसेच महा उपाध्यक्ष संजय चामाटे. दिपक कदम, ठाणे जिल्हा अध्यक्ष अभिमन्यु वाव्हळ, अनिल पवार, विलास कच्छवे महेंद्र म्हशे, जाधव आदी अनेक सुरक्षा रक्षक उपस्थित होते अशी माहिती महा सरचिटणीस प्रथमेश आल्हाट यांनी दिली.
0 टिप्पण्या