Top Post Ad

अंधारातील सावरकर...


 सावरकर आणि त्यांच्या पत्नी यमुनाबाई यांच्या बद्दल तर आपण सर्वांनाच माहित असेलच. सावरकरांनी यमुनाबाई अर्थात माई यांच्याशी विवाह केला तो केवळ पैशा खातर आणि हि बाब स्वतः यमुना बाईंनाही माहित होती. कारण यमुना बाईंचे वडील भाऊराव चिपळूणकर हे त्यांच्या मानाने श्रीमंत होते, आणि भाऊराव हे सावरकरांच्या घरचा सर्व भार उचलत असत. मात्र यमुनाबाई सावरकरांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. पहिल्या लग्नाची हि गोष्ट इतिहासाच्या अंधारात जाणीवपूर्वक झाकून ठेवण्यात आली.

गेल्या वर्षी लंडन च्या Permanent Court of Arbitration (जेथे सावरकर कैदेत होते) आणि राष्ट्रीय संग्रहालयाने मिळून एक पुस्तक प्रसिद्ध केले, त्यात त्या संग्रहालयातील वस्तू व त्याच्याशी निगडीत ईतिहास लिहिण्यात आला आहे. न्यायमूर्ती M. Beernaert यांच्या कडे असलेल्या पत्रांचा यात समावेश आहे. सावरकरांनी केलेल्या पत्रव्यवहारावर आधारित एका Chapter मधील हा थोडासा भाग.

यमुना बाईंच्या आधी त्यांची पत्नी होती कासाबाई (सावरकरांच्या मनाविरुद्ध त्यांच्या आत्याने लावून दिलेले हे लग्न)

तर सावरकर लंडनला गेल्या नंतरची हि कहाणी -

सावरकरांची लंडन मध्ये एक मैत्रीण होती. तिचे नाव ज्युडी केट (सर क्रिस्टल रोब यांच्या पुस्तकात सेरेना हुक असा उल्लेख आहे), ती तिथल्या लायब्ररी मध्ये सफाई कामगार होती. सावरकरांपासून तिला दिवस राहिले होते. मात्र सावरकरांनी ते नाकारले, पण बलात्काराचे आरोप सिद्ध झाले आणि त्यामुळेच त्यांना लंडन इथल्या जेलची हवा खावी लागली होती.  हि बातमी त्यांच्या सोबत राहणाऱ्या भाऊसाहेब रानडे यांनी पत्राद्वारे शिवरामपंत परांजपे यांना कळवली. (लोकमान्य टिळक व "काळ" वृत्तपत्राचे संपादक शिवराम पंत यांनी त्यांना सरदार सिंघ राणा यांची रु २००० ची शिष्यवृत्ती मिळवून दिली होती.) त्यानंतर सरदार सिंघ राणा यांनी सावरकरांना कुठलीही मदद केली नाही.

  भारतीय वृत्तपत्रांनी मात्र सावरकरांनी लंडन मध्ये स्वदेशी चळवळ चालवली म्हणून अटक झाल्याचे चित्र निर्माण केले. (अर्थात स्वदेशी चळवळ स्वदेशात म्हणजे भारतात करायची सोडून लंडन मध्ये करायची गरज त्यांना का वाटली याच आजही समाधानकारक उत्तर मिळत नाही  )

इकडे   कासाबाई   अक्षरशः लंकेच्या पार्वती झाल्या होत्या. सावरकरांचा मित्र   शंकरलाल कनोजिया   (याचा मुंबई मध्ये कपड्याचा छोटेखानी व्यवसाय होता.) तर शंकरलाल सुद्धा सावरकरांच्या घराचा भर आपल्या परीने सांभाळत असत.    ज्युडी केटची   हि बातमी जेव्हा   कासाबाई   यांना कळली तेव्हा त्यांना अतिशय दुख झाले. त्यांनी   सावरकरांना सोडण्याचा निर्णय घेतला व त्यांनी तसे शंकरलाल कनोजिया यांना हि सांगितले  आणि अखेर सावरकर लंडनच्या जेल मध्ये असतांना जे नको व्हावयास हवे तेच झाले.   कासाबाई व शंकरलाल यांचे मैत्रीचे संबंध प्रेमात रुपांतरीत झाले.   सावरकरांनी त्यांना   पत्नी समान वागणूक कधी दिलीच नसावी बहुतेक  . मानसिक सुखाच्या शोधात असणाऱ्या कासाबाईना शंकरलालने सावरले व तीस मुंबई इथल्या आपल्या घरी घेऊन आले. (कैरेल स्तोडोला यांच्या पुस्तका नुसार तिथल्या   ब्राम्हण   समाजाने त्यांना लाथाडल्यानंतर १ वर्षांनी ते सुरतला निघून गेले .)

ही गोष्ट जेव्हा सावरकरांना समजली तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले.   आपली पत्नी परपुरुषा सोबत पळून गेली हि गोष्ट लोकांपर्यंत पोहचू देऊ नये अशी विनंती त्यांनी आपल्या  नातेवाईकांना केली  . त्यांचे भारतातले सहकारी मित्र   माधव गोडबोले   व त्यांच्या पत्नी   कस्तुरीबाई   यांचे पत्र आजही लंडन येथील संग्रहालयात आहे. (१९९३ साली भारतात सावरकरांच्या पत्रांचे एक पुस्तक इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होणार होते मात्र ते प्रसिद्ध होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेआणि जे प्रसिद्ध झाले ते 'त्या' सर्व पत्रांच्या व्यतिरिक्त होते.) लंडनहून परतल्यावर त्यांनी   दुसरा विवाह   केला तो   यमुनाबाई   अर्थात   माई   यांच्याशी.

आपल्या मृत्यू पश्चात त्यांनी एकाही मुलाला आपल्या संपत्तीतला एक पैसाही दिला नाही (सावरकरांनी आपली संपत्ती गोर-गरिबांना वाटली असा प्रचार (खरे तर अप-प्रचार) केला गेला.) त्यांचे वंशज स्वतःला सावरकरांचे वंशज जरी म्हणत असले तरी खुद्द त्यांनाही याची खात्री नाही कि ते   १००%   सावरकरांचे वंशज आहेत, कनोजियाचे आहेत कि आणखी कुणाचे.. 

(ज्या दिवशी खेळपटू ध्यानचंदला नाकारून जाहीरात अभिनेेता सचिन तेंडुलकरला  सरकारने ' भारतरत्न ' पुरस्कार दिला त्याच वेळी त्याची किंमत सरकारने कमी केली आहे .आता सरकारने खुशाल हा पुरस्कार कोणालाही दिला तरी त्याचे विशेष असे काही भारतीय लोकांना वाटणार नाही ...

संजीव चिंबुलकर

------------------------------------------------------------


पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ या गावचा बाबू गेनू सैद हा कोवळा युवक..महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित झाला.गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाला पाठिंबा म्हणून मुंबईत आंदोलन करताना अटक झाला आणि येरवड्यात पोहचला.तिथून सुटका होताच काही दिवसात ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणाऱ्या ट्रकला रोखण्यासाठी तो रस्त्यावर आडवा पडला.१२ डिसेंबर १९३० चा तो दिवस होता.बाबू गेनूला चिरडून तो ट्रक पुढे गेला.बाबू हुतात्मा झाला.पण त्याने क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली.अवघं बावीस वर्षांचं वय होतं बांबूचं..
शिवराम हरी राजगुरू..भगतसिंग यांचा विश्वसनीय सहकारी..पुणे जिल्ह्यातीलच राजगुरूनगरचा.. स्वातंत्र्य चळवळीने भारलेला..नॅशनल बँकेची लूट, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका आणि सॉंडर्सची हत्या ( जेम्स स्कॉटला मारताना चुकून ) या सगळ्यात त्याचा सहभाग होता.माफी मागितली असती तर कदाचित सुटला असता किंवा फाशीच्या ऐवजी जन्मठेप होऊन जिवंत राहिला असता.पण तसं न करता आपल्या प्राणप्रिय मित्रांसोबत तो निधड्या छातीने फासावर गेला.तेव्हा त्याचं वय होतं अवघं तेवीस..
ही दोन प्रातिनिधिक आणि सर्वाना माहित असलेली उदाहरणं ..पण अशी आणखीही या महाराष्ट्राच्या मातीतली असंख्य उदाहरणे आहेत.. ब्रिटिशांची माफी न मागता हे सगळे युवक फासावर गेले,चिरडले गेले,बंदुकीच्या गोळ्या छातीवर झेलल्या आणि मातृभूमीसाठी शहीद झाले.
हे खरे स्वातंत्र्यवीर..
खरंतर या सगळ्या शुरांना महाराष्ट्राने डोक्यावर घ्यायला हवं.त्यांना लक्षात ठेवायला हवं.परंतु तसं न होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतोनात परिश्रमातून, अतुलनीय पराक्रमातून आणि असंख्य मावळ्यांच्या बलिदानातून आकाराला आलेल्या स्वराज्याला अगदीच योगायोगाने स्थापन झालेले स्वराज्य असं हिणवणाऱ्या,लुटीत हाती लागलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणानारळाने ओटी भरून सन्मानाने पाठवणी करण्याच्या महाराजांच्या कृतीला नेभळट म्हणणाऱ्या,मोगलांच्या लेकीबाळींवर महाराजांच्या मावळ्यांनी बलात्कार करणे न्यायाचे ठरले असते असे विकृत विचार मांडणाऱ्या, भारत-पाकिस्तान असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हिरीरीने मांडणाऱ्या, अनेकदा ब्रिटिशांची माफी मागणाऱ्या,पुढील काळात त्यांच्याकडून पेन्शन घेऊन त्यांच्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या,गांधी हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या सावरकरांना हा महाराष्ट्र काय म्हणून डोक्यावर घेतो ते कळायला काही मार्ग नाही.
माझ्या कालच्या व्हिडिओत तर हे मुद्दे नव्हतेच.तरी तो अंध सावरकरभक्तांना झोंबला..त्यात हे मुद्देही असते तर..
(पहिला फोटो राजगुरूंचा, दुसरा बाबू गेनूचा..खाली गांधी हत्येतील सर्व आरोपी कोर्टात हजर असतानाचा..एका निःशस्त्र,वृद्ध महात्म्याची हत्या करून कसे निर्लज्जपणे सगळे हसताहेत पहा.. सूत्रधार सगळ्यात मागे.. करून सवरून नामानिराळा..

Ravindra Pokharkar
------------------------------------------------------------

राहुल गांधींनी सावरकरांचा विषय काढल्यापासून भक्त कंपू घायकुतीला आला आहे. जमेल तिथे जमेल तसा आकांडतांडव सुरू आहे. एक गोष्ट कळत नाही ती ही की केंद्रात सरकार यांचं... राज्यात सरकार यांचं... राहुल खोटं बोलत असेल तर करून टाका की कारवाई, करा अटक! सगळीकडे स्वतःच सरकार असूनसुद्धा हे असं अगतिक होणं अजब आहे. याचा अर्थ एकतर भक्त मंडळींचा आपल्याच सरकारवर भरवसा उरलेला नसावा किंवा राहुलसमोर सरकारचं पण काही चालत नाही यावर पक्का भरवसा असावा!! बरं, सरकारमध्ये यांनी बसवलेले लोक पण कसले मजेशीर आहेत बघा... यांचं सरकार येऊन झाली आठ वर्षं... सावरकरांना भारतरत्न दिला का? खासदार संजय राऊत ही मागणी सातत्याने मांडत असतात. आजही त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे. मग सावरकरांना भारतरत्न देण्यात नक्की अडचण काय असावी बरं? भारतरत्नचं सोडा, यांच्या सरकारने सर्वात उंच पुतळा कोणाचा बांधला? सावरकरांचा पणबांधू शकले असते! पण पुतळा बांधला काँग्रेसच्या पटेलांचा, ज्यांनी संघावर बंदी घातलेली!! आता हा सावरकरांवर अन्याय नव्हे काय? म्हणजे कोलू ओढायच्या दर्दभऱ्या कहाण्या सांगून फुटेज खायला सावरकरांना वापरायचं पण सत्तेत आल्यावर पुतळे कोणाचे बांधायचे? काँग्रेसच्या नेत्यांचे!! बरं, पुतळा राहू द्या... मोदीजी इतक्या वेळा परदेशी, संयुक्त राष्ट्र वगैरे ठिकाणी भाषणं द्यायला गेले... एकदा तरी मी सावरकरांच्या देशातून असं म्हटलं का? गांधींच्या देशातून आलोय असं म्हणताना बऱ्याचदा ऐकलं आहे. परदेशी जाऊन बोलायचं एकवेळ सोडा, भारतात आलेल्या परदेशी नेत्यांना तरी सावरकरांचं स्मारक, अंदमान वगैरे काही दाखवलं का? तो जिनपिंग आलेला, त्याला घेऊन मोदीजी गेले कुठे? साबरमती आश्रमात!! अरे इकडे चरख्याच्या नांवाने चर-खा सारखे क्रिन्ज विनोद करून सावरकरवाद्यांनी दातांच्या कण्या केल्या, पण यांचा लाडका नेता जिनपिंगला घेऊन चरख्याच्या चालवत बसलेला! का बरं? सावरकर आठवत नाहीत का तेव्हा? दरवेळी काँग्रेसकडून सावरकरांवर अन्याय झाला, पुरोगाम्यांनी यांव केलं, डाव्यांनी त्यांव केलं म्हणत रडत बसायचं एवढंच सावरकरवाद्यांच्या नशिबी लिहिलेलं असावं! कारण यांचं स्वतःच सरकार सावरकरांना ना भारतरत्न देतं, ना जगात ओळख सांगायला त्यांचं नांव घेतं... आणि मानसन्मान करायला नेते निवडतं ते सगळे काँग्रेसचे!! म्हणजे सावरकर फक्त अंदमानात टूर नेऊन, ठरलेली दर्दभरी गाणी गाऊन लोकांना टिपं गाळायला सोय म्हणून राखीव ठेवलेत काय? आपल्याच विचारांच्या सरकारकडून आपली चालवलेली ही अवहेलना बघून स्वर्गात तात्यारावांचा प्राण किती तळमळत असेल याचंच राहून राहून दुःख वाटतं!!! - मकरंद देसाई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com