Top Post Ad

ठा म पा. उप आयुक्त जी जी गोदेपुरे यांना पुरस्कार जाहिर

 ठाणे महानगर पालिका उपायुक्त जी जी गोदेपुरे यांची उत्कृष्ठ शासकीय सेवाधारी अधिकारी म्हणून निवड  करण्यात आली आहे. जी जी गोदेपुर सध्या प्रशासकीय सेवेतील उपायुक्त ( वर्ग- 1 )  या पदावर कार्यरत असून 2008 मधे अखिल भारतीय स्थानिक  स्वराज्य संस्थेच्या एलजीएस  परीक्षेत देशामधे प्रथम क्रमांक आला तसेच 2008 मधेच ठाणे महानगर पालिकेचे उत्कृष्ट अधिकारी या पुरस्काराने गौरविण्यात आले, समाजाच्या प्रत्येक घटकाच्या सर्वांगीन विकासाकरिता शासकिय अधिकारी म्हणून ते प्रयत्नशील असतात, त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यात उत्कृष्ट शासकीय अधिकारी या नावाने  शिवा संघटनेच्या वतीने पुरस्कार दिला जातो, यंदाचा हा पुरस्कार जी जी गोदेपुरे यांना दिला जाणार असल्याची माहिती संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष शिवा बिराजदार यानी दिले

जी जी गोदेपुरे यांचे मुळ गाव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे असून या लहान शहरात बारावीपर्यंतचे शिक्षण झाले असून बारावीमध्ये एक्क्यानव टक्के मार्क मिळाले व पुढे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथून *स्थापत्य अभियांत्रिकी* या विषयामधून प्रथम श्रेणी विशेष प्रावीन्यासह पदवीधर(बी ई सिव्हिल) आहेत. त्याचप्रमाणे विधी शाखेची पदवी (एलएलबी) व मॅनेजमेंट शाखेची (एमबीए) पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. सन २००८ मध्ये अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एलजीएस परीक्षेत त्यांचा देशात *प्रथम क्रमांक* आला आहे.

सन २००८ मध्ये ठाणे महानगरपालिकेचा *'उत्कृष्ट अधिकारी'* या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या विभागाकरिता त्यांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेल्या सॉफ्टवेअरकरिता राष्ट्रीय पातळीचे *तीन पुरस्कार* ठाणे महानगरपालिकेस प्राप्त झाले आहे. सध्या ते ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय सेवेतील उप आयुक्त (वर्ग-१) या पदावर कार्यरत असून त्यांचेकडे महत्वाचे विभाग त्यांचेकडे आहेत. ठाणे महानगरपालिकेमध्ये *ज्योतीसुर्य महात्मा बसवेश्वर महाराज* यांची जयंती सुरु करण्यास त्यांनी पुढाकार घेतला असून दरवर्षी जयंतीचे नियोजन केले जाते.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विरशैव समाजासाठी स्वतंत्र *रुद्रभुमी* असावी यासाठी ते पाठपुरावा करित असून ती अंतिम टप्प्यात आहे. ते सदैव गोरगरीब नागरिक यांना सहकार्य करण्याची,मदत करण्याची भूमिका असते. दैनंदिन कार्यालयीन कामकाजात सामान्य नागरिकांना सोयीसुविधा सहजपणे मिळतील, यास ते प्राधान्य देतात. ते जनतेचा सेवक म्हणून सदैव कार्यरत राहणार असून  कुटुंबाची, विरशैव समाजाची प्रतिमा उंचावेल, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

सोमवार दि, 7 नोव्हेम्बर रोजी दुपारी 4 वा श्रीक्षेत्र कपिलधार जिल्हा बिड येथे संत शिरोमणि मन्मथ स्वामी यांची शासकीय महापूजा,  बिडचे जिल्हाडिकारी, पालकमंत्री ,अनेक मान्यवरांसह शिवल संघटनेचे रास्ट्रीय अध्यक्ष, मा प्रा मनोहर धोंडे  यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तसेच शिवा संघटनेचा 27 वा राज्यव्यापी मेळावा संपन्न होणार आहे,  यावेळी विरशैव लिंगायत समाजातील वेगवेगळ्या स्तरात कार्य कारणाऱ्यांना पुरस्कारा देऊन गौरव करण्यात येतो, 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com