Top Post Ad

केजरीवाल.... तंत्र मंत्र जाहिरातींचा प्रभाव

 


2014 च्या निडणुकीपूर्वी अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी प्रचंड मोठे आंदोलन उभे केले या आंदोलनाने अनेक नवीन चेहरे उदयास आले. काहींनी पुढे भाजपच्या आशिर्वादाने मोठ मोठी पदे भूषवली आणि गडगंज संपत्तीचे मालकही झालेत.  हे आंदोलन कशासाठी होते हे आता जगजाहीर झाले आहे. या आंदोलनापुर्वी अरविंद केजरीवाल कुणाला माहीत होते? हे अण्णा हजारेंचे कार्पोरेट आंदोलन म्हणजे सत्तांतराची नांदी होती. या सत्तांतराकरिताच या आंदोलनाचा संपूर्ण खर्च आरएसएसने उचलला होता.सकाळी दहा ते सायंकाळी 6 आंदोलनाची वेळ एकदम कार्पोरेट टाइप.13 दीवस हजार-दोन हजार लोक एकाच मैदानावर केवळ खाण पिण फुकट म्हणून जमा झाली होती त्याना दिवसरात्र पब्लिसिटी. यातूनच केजरीवाल प्रसिद्धीस पावले. 

एकीकडे भाजपचा सत्ता संपादनाचा मार्ग मोकळा होत असतानाच त्याला पुन्हा पर्यायी व्यवस्था असावी म्हणून केजरीवालच्या माध्यमातूनही नवीन पक्ष उदयास आणला. आरएसएसची ही खेळी काही नवीन नाही. सत्तेचे प्यादे आपल्याच हातात असायला हवे या नियमाप्रमाणे पुढे जाऊन कुणी डोईजड झाला तर पर्याय उभा असला पाहिजे. यासाठीच समांतरपणे केंजरीवालचा आप पक्ष उभा राहिला. ज्या बहुजनांच्या पक्षाला कित्येक वर्षे राजकारण करून एखाद्या राज्याची सत्ता घेता येत नाही त्याचवेळेस दिल्लीसारखे राज्य केजरीवालचा पक्ष हातात घेतो तोही एकदा नव्हे दोन वेळा. यातच आरएसएसच्या राजकारणाचा हा खेळखंडोबा लक्षात येतो. मग आता त्यानी नोटेवर लक्ष्मी-गणपती आणायला सांगणे म्हणजे उघडपणे आरएसएसचा अजेंडा राबवणे. यासाठी नेटकऱ्यांनी किंवा आमच्या तथाकथित विचारवंतांनी एवढे तांडव करण्याची काही गरजच नाही. 

आरएसएसप्रणित भाजपच्या मोदी सरकारवर मागील दोन वर्षात विशेष करून कोरोना महामारीच्या काळापासून सातत्याने टिकेचा भाडीमार होत आहे. आरएसएसचा ८० टक्के अजेंडा या सरकारने राबवला. संविधानाच्या पुस्तकाची पुजा करून त्यातले सर्व कायदे पायदळी तुडवण्याचे काम अगदी चोखपणे बजावले आहे. असं एकही क्षेत्र सोडलेलं नाही जिथे घुसखोरी करून त्या क्षेत्राला नामशेष करण्याचा प्रयत्न केलेला नाही. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रात  व्यवस्थितपणे मनुवादी अजेंडा राबविण्यात आरएसएसप्रणित भाजपचे मोदी सरकार यशस्वी झाले आहे. अशा वेळेस आता चारही बाजूने टिकेची झोड उठत आहे. अशावेळेस येणाऱ्या काळात पुन्हा एकदा नवीन बहुजनवादी संविधानवादी पक्ष उभा राहू नये. म्हणून या क्लुप्त्या सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे नोटावरील छायाचित्र बदलण्याची भाषा. 

खरे तर जुन्या नोटांवरील अशोकस्तंभ आता नवीन नोटांवर दिसेनासा झालाय. त्यातच आता आहे तोही काढून त्यावर गणपती-लक्ष्मीचे चित्र टाका असं म्हणणं म्हणजे पुन्हा हिन्दुत्ववाद गोंजारणे एवढेच. कारण एकीकडे भारताची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. आमच्या अर्थमंत्रीच म्हणतात, रुपया गिर नही रहा है, डॉलर उपर जा रहा है यावरून आमच्या देशाचं तर्कशास्त्र किती दृढ आहे हे दिसून येते. अशा देशाची अर्थव्यवस्था आणखी किती काळ तग धरणार हे येणारा काळच सांगेल. मात्र निवडणुक जिंकण्यासाठी पुन्हा एकदा धर्मच कामाला येणार हे इथल्या राजकारण्यांना चांगले ठाऊक आहे. बेरोजगारी, भूखमरी, भ्रष्टाचार हे विषय सर्वसामान्यांच्या अंगवळणी पडले आहेत. आता त्यांना त्यातच जगण्याची सवयही लागली आहे. कारण त्यांना धर्म नावाच्या अफूची गोळी हे राजकारणी लोक सातत्याने देत आहेत. मग ते माध्यम कोणतेही असो. निवडणूक आली धर्माचा राग आवळायचा सर्वसामान्य माणूसही मागील सर्व गोष्टी विसरून धर्मासाठी ताठ उभा राहतो, भले त्याच्या पायात शक्ती नसेल तरी तो काठीचा आधार घेईल आणि उभा राहील. मग आमचे राजकारणीही लगेच म्हणतात ही काठी म्हणजे देवाने तुला दिलेला आधार आहे. मग त्याला आणखी स्फूरण चढते तो लगेच या राजकारण्याच्या झोळीत आपले लाखमोलाचे मत टाकून मोकळा होतो. 

या देशात हिंदुत्वावर मते मिळायला लागल्यानंतर अनेक धर्मनिरपेक्ष नेते हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे मात्र हेच नेते अल्पसंख्याकांच्या मेळाव्यात वेगळी भाषा बोलताना दिसतात. निवडणुका आल्या की हे नेते देवळा देवळांमध्ये जाऊन दर्शने घ्यायला लागतात.  दिवाळीच्या मुहूर्तावर नव्हे तर गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो लावण्याची मागणी केली आहे. दिवाळीच्या रात्री पूजा करताना हा विचार त्यांच्या मनात आल्याचे त्यांनी सांगितले. आपले अनेकांशी बोलणे झाले असून यावर कोणाचाही आक्षेप नसावा असेही ते म्हणाले. अनेकांशी म्हणजे आता फक्त आरएसएसच्या लोकांशीच हे काही नव्याने सांगायला नको, त्यातच पुढे ते म्हणतात, देवी-देवतांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतो तेव्हा प्रयत्नांना यश मिळते. भारत हा एक श्रीमंत देश व्हावा आणि प्रत्येक भारतीयाने श्रीमंत कुटुंब व्हावे, अशी आपली सर्वांची इच्छा आहे. यासाठी बरीच पावले उचलावी लागतील.  पण प्रयत्नांना यश तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्याला देवी-देवतांचा आशीर्वाद असेल. अनेकवेळा आपण पाहतो की, प्रयत्नांचे फळ येत नाही, मग असे वाटते की, देवी-देवतांचा आशीर्वाद असेल तर त्याचे फळ नक्कीच मिळू शकते.

 केजरीवाल यांचे वक्तव्यावरून असे वाटते की पुर्वी टिव्हीवर धनसंपत्ती के लाभ के लिये ये खरीदो आपके घर मे धनकी कमी नही होगी अशा काही जाहीराती प्रसारित व्हायच्या त्यांना कायद्याने बंदी आणली. मात्र त्या जाहीरातींचा प्रभाव केजरीवाल यांच्या मनावर खोलपर्यंत झाला आहे. त्याच मानसिकतेतून त्यांनी नोटांवर लक्ष्मी-गणपतीचा फोटो आणण्याचे वक्तव्य केले आहे.  एक सरकारी अधिकारी दर्जाची व्यक्ती जेव्हा असं वक्तव्य करते तेव्हा सर्वसाधारण माणसंही लगेच त्याचीच री ओढतात. म्हणूनच अशी वक्तव्य नेहमी लोकांची दिशाभूल करण्यासाठी मोठ्या पदावरील व्यक्तीच करतात. नव्हे ती त्यांच्याकडून वदवून घेतली जातात. ही इथली व्यवस्थाच आहे. हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत तर  गुजरातमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री लागलीच केदारनाथला रवाना झाले आणि मनसोक्त देवदर्शनाचे फोटो मिडियाला दिले. प्रसारमाध्यमांना आठवड्याभराची शिदोरी मिळाली. अशा वेळेस आता आपणही हिन्दुत्वाच्या आघाडीवर मागे रहायला नको म्हणूनच की काय केजरीवाल यांनी सरळ लक्ष्मी-गणपतीला नोटांवरच स्थान देण्याची भाषा केली. 

खरे तर त्याआधीच विजयादशमीला दिल्लीत झालेल्या धर्मांतरावेळी बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा मोठा गाजावाजा झाला. ज्यामध्ये केजरीवाल यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री गौतम पाल यांचाही समावेश होता. ही गोष्ट केजरीवाल यांना खटकली त्यांनी पाल यांच्यावर दबाव आणून त्यांचा राजीनामा घेतला. कारण भाजपच्या लोकांनी याचा खूप मोठा गाजावाजा केला. प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत नेले. मात्र २२ प्रतिज्ञा म्हणजे धर्मांतर प्रतिज्ञा आहेत. यात कुणाच्याही भावना दुखवण्याचा प्रश्न येतच नाही. असा सूर सर्वत्र उमटू लागल्याने आरएसएसला शांत बसण्याशिवाय पर्याय उरला नाही. परंतु हे दुखणे केजरीवाल यांच्या जिव्हारी लागले आणि आपली प्रतिमा आता कट्टर हिन्दुत्ववादी म्हणून कशी उजळेल यासाठीच त्यांनी नेमके हे विधान केले. कारण २२ प्रतिज्ञांमधील एक प्रतिज्ञा अशी आहे की, मी गौरी-गणपती यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पुजा करणार नाही इतकेच नव्हे तर आणखी एक प्रतिज्ञा अशी आहे की, मी हिन्दु धर्मातल्या कोणत्याच देवी-देवतांना मानणार नाही. अशा प्रतिज्ञांचा जयघोष दिल्लीत झाल्याने केजरीवाल यांच्या आप वर गंडांतर येणे स्वाभाविक होते. मग त्यावर आच्छादन टाकण्यासाठी हा सारा खटाटोप केजरीवाल यांनी करणे स्वाभाविकच आहे. नव्हे तो तर आरएसएसचा अजेंडाच आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. For functions of readability, that 98% payout signifies that you may win 98¢ for 코인카지노 each greenback you spend. That is, when you were to spend the greater part of of} this decade there.Machines in Vegas are purported to payout more. Machines have the same number of combinations each time you are taking a turn.

    उत्तर द्याहटवा

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com