Top Post Ad

तुम्ही शिवसेनेचा घात केला - उद्धव ठाकरे


नोटाबंदीनंतर पंतप्रधान मोदी हे घासलेलं, संपलेलं नाणं आहे. आपल्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं खणखणीत नाणं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. 'मी भाजपशी लढलो, कुटुंबातील लोकांशी लढलो. ही लढाई लढून मी आपल्या पक्षाचे 63 आमदार निवडून आणले.आता ही शेवटची निवडणूक आहे. आता आपण जिंकलो तर आपलं सगळं मिळवलं. हा निखाऱ्यांवरचा प्रवास आहे. या प्रवासात तुम्ही माझ्या सोबत आहात, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना केलं.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून तीन चिन्ह आणि तीन नावं निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं.
 या बैठकीला विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, सुभाष देसाई उपस्थित होते. .या बैठकीनंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. शिवसेनेकडून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं ठरवण्यात आली आहे. तसंच शिवसेना बाळासाहेब ठाकरे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे अशी नावं देण्यात आली आहे, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली.

शिवसेना पक्ष नसून कुटुंब आहे. हे दसरा मेळाव्याला सर्वांनी पाहिलं. राजकीय वल्गना करून आपल्या आईला विकलं. आम्हाला या उंबरठ्यावर आणलं त्यांच्याबद्दल चीड जनतेच्या मनात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राला आशा पद्धतीने घेरलं. चड्डा नड्डा असे वाचाळवीर येऊन बोलत होते, शिवसेना संपवणार. नड्डा बोलले पण बाळासाहेबांची चिंगारी  उद्धव ठाकरे यांना मात्र तुम्ही संपवू शकत नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी ठणकावून सांगितलं.

बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले,  निवडणूक आयोगाने सुचविल्याप्रमाणे तीन निवडणुक चिन्हांचा पर्याय आम्ही निवडणूक आयोगाला दिला आहे. ज्यामध्ये धगधगती मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशुल यांचा समावेश आहे. तसेच पक्षासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी पर्यायी नावे दिली असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.  मात्र सुप्रिम कोर्टामध्ये सर्वात आधी दाखल केलेला त्या फुटीर आमदारांच्या अपात्रतेचा दाव्यावर अद्यापही निर्णय बाकी असताना निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने कसा दिला याबद्दलही आश्चर्य वाटत असल्याचे ठाकरे म्हणाले, ज्या धनुष्यबाणाची पुजा आजही बाळासाहेबांच्या तसबीरीसोबत केली जाते त्या धनुष्यबाणाला चाळीस तोंडाच्या रावणाने संपवल्याचा आरोपही ठाकरे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केला.

चाळीस डोक्याच्या रावणाने रामाचे धनुष्यबाण गोठवला. त्यानंतर वरुन हेच म्हणतात की, बघा आम्ही करून दाखवले. काय मिळवले त्यांनी शिवसेना फोडून? ज्या शिवसेनेने मराठी अस्मिता जपली ती फोडायला तुम्ही निघाला. धनुष्यबाणच नव्हे तर शिवसेनाप्रमुखांची हिंंमत तुम्ही गोठवली. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिले. वडीलांनी ती वाढवली आता या नावाशी तुमचा संबंध काय? तुम्ही या नावाचा आणि शिवसेनेचा घात केला असा घणाघात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला. जेव्हा मी कोरोनाच्या संकटकाळात फेसबुक लाईव्हद्वारेच मी सूचना करीत होतो. आपण कोरोनावर मात केली. अनेक जण त्यावेळी मला अनेकदा सांगत होते की, तुम्ही आम्हाला कुटुंबातील वाटतात. म्हणूनच मी कुटुंबाजवळ मन मोकळे करीत आहोत.

शिवसेनेच्या मुलाला मुख्यमंत्रीपदी नको, पद मलाच हवे असे सांगून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले. तत्पूर्वी मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला. ज्यांना मुख्यमंत्रीपद हवे होते त्यांना ते मिळाले. जे नाराज होते ते गेले. पण आपण सहन केले. आता मात्र, अती होत आहे. शिवसेनेच्या लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. इंदीरा गांधींच्या सरकारमध्येही शिवसेनेला एवढा त्रास झाला नाही. जे काँग्रेसने केले नाही ते तुम्ही करीत आहात मग पापी कोण तुम्हीच ना. ज्या शिवसेनेने मोठे केले त्या शिवसेनेला छळण्याचे काम करीत आहात.

मी डगमगलो नाही. शिवसैनिकांनी घरादाराची पर्वा न करता अंगावर केसेस घेतल्या त्या शिवसैनिकांना छळत आहात. त्यांना शिंदे गटात या म्हणून केसेस करण्याची धमकी दिली जात आहे. पण आमच्यात ठासून आत्मविश्वास आहे. शिवसैनिक जीवाला जीव देणारे आहेत.  उलट्या काळजाच्या माणसाने शिवसेनेचे पक्ष नाव आणि चिन्ह गोठवले. बुद्धी गोठलेली नसेल तर बाळासाहेबांचे नाव घेऊ नका.  बाळासाहेब ठाकरे हवे आहेत पण त्यांचा मुलगा नको. शिवसेना आणि ठाकरे वगळून जे राहील ते तुम्हाला गो-शाळेत बांधायचे आहे.

काही काळासाठी आमचे चिन्ह गोठवले हा आपल्यावरील अन्याय आहे. सोळा जणाच्या अपात्रतेचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल लागायला नको होता. पण हा गोंधळ झाला तो निस्तारणार कसा हा कायद्याचा विषय आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. नक्की आम्हाला न्याय मिळेल.  निवडणूक आयोगाने आदेश देताच मी तीन चिन्हे ठरवली आहे. एक त्रिशुळ, दुसरा उगवता सूर्य आणि तिसरा आहे धगधगती मशाल नावेही निवडणुूक आयोगाला दिली आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे ही नावे दिले आहेत.

टी. एन. शेषन हे माजी निवडणूक आयुक्त होते पण त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांचीही मस्ती त्यांनी चालू दिली नाही. त्यांनी निपक्षःपाती काम केले. तुम्ही लोकशाहीचे रक्षणकर्ते आहात. अंधेरीची पोटनिवडणूक लागली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला चिन्ह आणि पक्ष द्या. जनता जनार्धन सर्वोच्च आहेत. त्यांच्या दरबारात आम्हाला जायचे आहे. आज कोजागिरी पौर्णिमा आहे. त्याचे महत्व हेच की, दिवस आणि रात्र वैऱ्यांची आहे. जागे राहा. अजिबात झोपू नका. आपल्याला लढाई जिंकायची आहे. आजपर्यंत जनतेचे आशिर्वाद आणि प्रेमाच्या बळावरच आम्ही सामोरे गेलो आहे. हेच प्रेम जनतेने द्यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com