शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांचं शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचं भाषण झालं. जेंव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा ठाकरेंकडे शिवतीर्थ नव्हतं. आज मुख्यमंत्रीपद नाही मात्र ठाकरेंकडे शिवतीर्थ आहे. मुख्यमंत्री म्हणून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचं भाग्य उद्धव ठाकरेंना लाभलं नाही. दरम्यान आज उद्धव ठाकरे तमाम शिवसैनिकांना काय संबोधन करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. नुकत्याच झालेल्या ऐतिहासीकी बंडाळीला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदेंसोबतचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाला काय सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.
विजयादशमीच्या शुभेच्छा देत असताना गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि दसरा मेळावे माझ्या लक्षात, पण असा मेळावा क्वचित.. आजचा दसरा मेळावा अभूतपूर्व आहे.. मी भारावून गेलो आहे. भाषणासाठी खूप मुद्दे आहेत.. तुमचं प्रेम पाहून मुद्दे असतील पण शब्द सुचणार नाहीत. आज जमलेली गर्दी नाही, माझ्या शिवसैनिकांची गर्दी तुमच्या प्रेमाच्या जोरावर अडीच वर्ष कारभार केला. शिवसेनेत गद्दारी केली.. ते गद्दारच आहेत... तुमची मंत्रीपदे काही काळ टिकतील, पण कपाळावरील गद्दाराचा शिक्का पुसता येणार नाही. इथे एक सुद्धा माणूस भाड्यानी आणलेला किंवा तासाची बोली लावून आणलेला नाही, इथे आलेल्या माता भगिनी, बुजुर्ग आणि दिव्यांगांना विचारा माझ्या समोर बसलेले एकनिष्ठ आहेत, हीच ठाकरे कुटुंबीयांची कमाई आहे.
माझी बोटं हालत नव्हती. शरीर निश्चल पडलं होतं. ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कटाप्पा. कट करणारे अप्पा म्हणजे कटाप्पा. हे कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. आपल्यासमोर येऊच शकणार नाही. हा उद्धव ठाकरे नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे हे त्यांना माहीत नाही. आई जगंदंबेने मला जी शक्ती दिली .त्याच्याशी तुम्ही पंगा घेतला. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही. एक तेजाचा शाप असतो. हा सर्व तेजाचा शाप आहे. विचित्र गोष्ट अशी की ज्यांना आपण सर्व काही दिलं. मंत्रीपद, आमदार खासदारकी दिली. ज्यांना दिलं ते नाराज होऊन गेले. ज्यांना दिलं नाही. ते माझ्यासोबत आहेत. हे माझं नशीब आहे. बाळासाहेब नेहमी बोलायचे, तेच आज बोलतो.. ही शिवसेना एकट्याची नाही एकजरी निष्ठावंत शिवसैनिक म्हणाला, 'गेट आउट' तर मी निघून जाईन. बाप मंत्री, मुलगा खासदार.. नातू नगरसेवक.. त्याला शाळेत तर जाऊ दे
मी का मुख्यमंत्री झालो? का केली महाविकास आघाडी केली ? अतिशय स्पष्टपणे सांगतो, का केली महाविकास आघाडी.. त्यांनी पाठीत खंजीर खुपसला , अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. ज्यावेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ, तेंव्हा त्यांचाही मान राखला होता . अमित शहा बोलले आमचं काही ठरलेलं नव्हतं, मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवरायांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो. आज तुम्ही जे केलं, तेंव्हा ते तुम्ही का नाही केलं? सन्मानाने का नाही केलं? पण शिवसेना संपवायची होती इतरांना बाजूला सारून सर्व केलं..
स्वतःच्या वडिलांच्या नावानी मतं मागची हिम्मत नाही... वीस वर्षांनी आज आनंद दिघे का आठवले? आज ते बोलू शकत नाही म्हणून त्यांचं नाव आलं बोलायची पंचाईत का होते कारण उपमुख्यमंत्री फडणवीस यांना कायदा चांगला कळतो.. देवेंद्र फडणवीस सभ्य माणूस आहे.. मी टोमणा मारला नाही जाताना बोलून गेलेले, मी पुन्हा येईन.. दीड दिवस आलेत आणि गेलेत कायद्याच्या चौकटीत राहून बोला असं ते म्हणाले, देवेन्द्रजी कायदा तुम्हालाच कळतो असं नाही.. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची हे नाही चालणार.
कोण काय भाषा करतंय? चुन चुन के मारेंगे... ही काय कायद्याची भाषा... आमच्या अनेक कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय.. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी फोन करून सांगितलं जातंय, गप गुमाने त्या गटात जा नाहीतर केसेस बाहेर काढू. आज यांना शांत राहायला सांगितलं, म्हणून हे शांत आहेत.. शिवसैनिकांना त्रास झाला तर तुमचा कायदा तुमच्या मांडीवर ठेवा. एकतर्फी कायदा चालू देणार नाही
हिंदुत्व तुम्ही शिकवू नका.. भाजपवाल्यांकडून हिंदुत्त्व शिकायची गरज नाही '' भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही. अरे पाकिस्तानात जाऊन जिन्नाच्या थडग्यावर जाऊन डोकं ठेवून आलेला तुमचा नेता, काश्मीरमध्ये मुफ्तीसोबत बसणारे तुम्ही आम्हाला हिंदुत्तव शिकवणार? तुम्ही हिंदुत्व करत गाईवर बोलतात, महागाईवर बोला, पण हे दिसू नये म्हणून हिंदुत्वावर बोलतात हृदयात राम पण हाताला काम पाहिजे RSS चे हुसबाळे यांचं सर्वांच्या साक्षीने अभिनंदन करतो.. कारण तुम्ही संघाला आरसा दाखवायचं काम केलं महागाई बेकारीवर बोला, देश पुढे चाललाय असं तुम्हाला वाटतं, पण यावेळी हुसबळे यांनी आरसा दाखवला
कोंबडी चोर यांच्याबाबत या मेळाव्यात जास्त बोलायचं नाही, बाप चोरांवर यावेळी बोलायचं नाही.. हे व्यासपीठ एक विचारांचं व्यासपीठ आहे.. विचारांची परंपरा पुढे न्यायची आहे, मी परंपरा पुढे नेतोय मोदींचं जेंव्हा सरकार आले तेंव्हा रुपयाचा भाव काय होता? आता काय स्थिती आहे? तेंव्हा स्वराज म्हणाल्या जेंव्हा रुपया घसरतो तेंव्हा देशाची पत घसरते.देशाचे मुख्यमंत्री पक्षाचे घरगुती मंत्री आहेत का?
माझी तयारी आहे, सर्व हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपीठावर यावं, त्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं, मी माझं हिंदुत्व सांगतो विचार सोडले... विचार सोडले.. हे बोलणार्यांनो हे ऐका शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेलं "जो देशावर प्रेम करतो तो आपला.. मुसलमान जरी असेल तरी तो आपला" जर कुणी धर्माची मस्ती रस्त्यात दाखवली तर त्यांना आम्ही उत्तर देऊ. तुमचं हिंदुत्व कोणतं? भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा म्हणाले शिवसेना संपणारा पक्ष आहे.. देशात कोणता पक्ष राहणार नाही असं म्हणाले. सर्व पक्ष संपणार आणि एकच पक्ष उरणार... म्हणजे देश हुकूमशाहीकडे जातोय.. देशात गुलामगिरी येऊ शकते
मोहन भागवत यांचा मला आदर आहे.. मोहन भागवत मध्यंतरी मशिदीत जाऊन आले. म्हणजे त्यांनी हिंदुत्व सोडलं का? ते मुसलमानांसोबत बोलतात तेंव्हा राष्ट्रकार्य, आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं? मोहनजी मला विचारायचंय तुम्ही भाषणात महिला शक्ती बाबत बोललात.. उत्तराखंडमध्ये अंकिता नावाच्या कोवळ्या पोरीचा खून झाला...ज्या रिसॉर्टमध्ये तिचा खून झाला ते भाजप नेत्याचं होतं.. त्या हॉटेल मालकाला तिथे जे चालवायचं होतं ते तिला करायचं नव्हता म्हणून हे झालं
दुसरी बातमी वाचली बिल्किश बानो तिच्यावर बलात्कार झाला, तिच्या मुलीचा आपटून खून झाला आरोप सिद्ध झाले.. नंतर गुजरात सरकारने आरोपींना सोडून दिलं आणि त्याचा सत्कार केला अशात महिलाशक्तीबाबत काय बोलायचं माझा एकदा विचार होता की या सभेला येण्याआधी नव्या हिंदुत्त्वाचे विचार ऐकायला जावं आमच्याकडे हिंदुत्व जागृत करून मिळेल असं कार्टून आलेलं तुमचं बेकार हिंदुत्व आम्हाला पटणारं नाही आज आम्ही विचार घेऊन चाललोय, त्यासाठी विचार ऐकवून सांगायला पुस्तकं आणलं
जर मी लक्ष घातलं असतं तर यांना हे मैदान मिळालं नसतं असं ते म्हणाले.. काय बापाची पेंड आहे का? एका व्यासपीठावर एक सभा लावू.. तुम्ही भाजपची स्क्रिप्ट सोडून भाषण करून दाखवायचं माझ्या बाजूला अजित पवार बसायचे, पण त्यांनी कधी माझा माईक खेचला नाही , माझ्या कानात उत्तर सांगितलं नाही आम्ही सोबत असताना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत घेऊन संभाजीनगर आणि धाराशिव केलं, त्यांना घेऊन आम्ही हिंदुराव वाढवत होतो
मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा पुत्र आहे.. मी शिवसेनेवरील संकटे बघत आलो आहे, आज माझ्या हातात काही नाही.. माझ्यासोबत चालायचं असेल तर निखाऱ्यावर चालायची जबाबदारी असेल, माझ्यासोबत चाललात तर रस्त्यात काटे असतील.. पाय रक्तबंबाळ होतील... येत्या काळात शिवसेनेचा वणवा पेटणार .. तुम्ही साथ आणि सोबत द्या.. मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन एका अर्थी बरं झालं .. बांडगुळ छाटली गेली... बांडगुळाची मुळे वृक्षाच्या फांद्यांमध्ये असतात, पण वृक्षाची मातीत असतात ती बांडगुळ सेना आहे, आपल्याला महाराष्ट्राच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन त्यांना शिंगावर घ्यावं लागेल मला विश्वास आहे ज्या आदिशक्तीने महिषासुर मारला तीच महिषासुरमर्दिनी खोकासूर मारेल आतापर्यंत दहा तोंडाचा रावण होता, आता ५० खोक्यांचा खोकासूर आहे असंही शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले.
0 टिप्पण्या