Top Post Ad

मग आम्ही त्यांच्या विचारांशी गद्दारी का करतो ?

 

भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14ऑक्टॉबर 1956 ला हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौध्द धम्माचा स्विकार केला आणि आपल्या लाखो अनुयायांना बौध्द धम्माची दिक्षा देऊन सोबत बावीस प्रतीज्ञा दिल्या, यासाठी त्यांना किती तरी वर्ष अभ्यास करावा लागला परंतु अलीकडच्या काळात मात्र गद्दारांनी बौध्द धम्माला हिंदूधर्मा सोबत जोडून दोन्ही थड्यावर हात ठेवून बाबासाहेबांच्या विचारांना मुठमाती  देण्याचा कळसच गाठला.

राष्ट्रमाता रमाई यांचे 1935 ला निधन झाले त्या भयानक दुःखातून हळू हळू बाहेर पडून त्यांनी सभा संमेलने सुरु केले, 28 ऑगस्ट 1937ला अस्पृशांची सभा होती या सभे मध्ये तर  त्यांनी हिंदुचे कोणतेच सण साजरे करायचे नाही असा ठरावच मंजूर करून घेतला आणि त्या वेळी त्याची अंमलबजावणी सुद्धा केली, आपण मात्र बुद्ध वंदना, त्रिशरन,पंचशील, बावीस  प्रतीज्ञा बुद्ध विहारात व अन्य ठिकाणी हात जोडून ताला सुरात बेंबीच्या देठा पासून म्हणतो पण त्याचे पालन करीत नाही, मात्र आपल्यातील काहीजण शिर्डीचे साईबाबा, जणांवराचे मुंडके असलेले गणपती, आदी देवा धर्मात गुंतले आहेत आम्हाला समाजात रहावे लागते, त्यांच्या कडून कामे घ्यावी लागतात म्हणून आप आपल्या कार्यालयात, घरी, दुकानात, कंपनीत  उघड्या,नागड्या, दाढीवाले, बिडीवाले, चिलीमवाले, गांजावाले,शिलभ्रष्ट भोंदू बाबाचे फोटो लावतात आणि कुटुंबासहित पूजा अर्चा करतात आणि मग तेच संस्कार आपल्या मुलांवर पडतात तिच मुलं तो अंधश्रद्धेचा गाडा पुढे नेतात आणि पुढे त्यांचे गुलाम होतात, आणि मग बाबासाहेबांनी अथक असे परिश्रम घेऊन कुठेही रक्ताचा थेंब न सांडता सम्यक संबुद्ध व सम्राट अशोका नंतर मोठी धम्मक्रांती करून विज्ञानवादी बौध्द धम्म देऊन महान कार्य केले, मग याकडे अशा लोकांचे दुर्लक्ष होते आणि मग ते त्रिशूळ वाली उघड्या,नागड्या, नंदी, गळ्यात साप असलेल्यांच्या गुलामीत  येऊन त्यांची चाकरी करतात आणि मग त्यांच्या अंधश्रद्धेला बळी पडतात.

आता दिवाळी सण म्हणजे भारतातील सर्व हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे पण हे बौध्द बांधवांचा नाही, कारण वामनाने बळी राजाचा खून केला, बुद्धांचे समकालीन अरिहंत विद्वान भन्ते यांची सुद्धा हत्या केली. म्हणून  बाबासाहेबांनी 28ऑगस्ट 1937 मुंबई च्या जाहीर सभेत ठासून सांगितले, व कधीही त्यांनी दिवाळी किंवा हिंदूंचे सण साजरे केल्याचे पुरावे एकाही वृत्तपत्र किंवा धम्मग्रंथात नोंद नाही, कारण आपल्या मध्ये मूर्तीपूजा नाही,

 दिवाळीच्या निमित्ताने लाखो रुपयाचे फटाके फोडणे, याच फटाक्यांनी अनेकांचे प्राण गेले आहेत, अनेकजन आंधळे,लंगडे, बहिरे, झाले आहेत, आणि हकनाक कष्टांनी कमविलेले लाखो रुपये बरबाद होतात यामुळे मात्र शेटजी आणि भटजीचे सोनं होते, कारण मोठमोठी किराणा दुकान , मॉल, कपड्यांची दुकाने, तेलाची दुकाने, फटाक्यांच्या एजन्सी भटजी आणि शेटजीची आहेत, याच फटाक्यांनी निसर्गाचे संतुलन बिघडते वातावरण दूषित होते, हवा दूषित होते अनेकांना टीबी, कँसर, दमा, आदींचा आजार होतो, याच वातावरणामुळे कोरोनाच्या काळात शुद्ध हवा,ऑक्सिजन अनेक भावा बहिणींना मिळाले नाही म्हणून त्यांना आपला जीव गमवावा लागला हे त्रिवार सत्य असतानाही आम्ही इतके कसे हिंदू धर्माचे गुलाम झालो आहोत,हे उघड उघड बाबासाहेबांच्या विचारांशी गद्दारी आहे, 

आमचे हजारो वर्षाचे विझलेले दिवे एकाही हिंदूंच्या देवांना दिसले नाहीआणि त्यांनी कधी पेटविलेही नाही  मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक व्यक्तींना स्वातंत्र्य,समता, बंधुत्व, देऊन स्वाभिमानाने ताठ मान करून जगण्याचा अधिकार देऊन हजारो पिढ्यांचे दिवे लावून भारत देश प्रकाशमय केला आहे. म्हणून एका दिवसाच्या दिव्यांनी आपल्या जीवनातील अंधार जाणार नाही त्यासाठी बाबासाहेबांनी सांगीतल्या प्रमाणे शिक्षण घ्यावे लागेल आणि याच शिक्षणांनी मोक्याच्या आणि महत्वाच्या जागा पटकविता येतात आणि मग याचीच कास धरून पुढची पिढी हे पाऊल टाकतात यामुळे आपणाला दिवे लावून भारत प्रकाशमान करता येईल. याकरीता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी गद्दारी करू नये त्यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचे तंतोतंत पालन करून एक आदर्श भारताचा आदर्श नागरिक व बौध्द धम्माचा उपासक, अनुयायी बनावे, फटाक्याचे लाखो रुपये वाचवून अनेक रुग्णांना मदत व अनेक गरजू गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविता येते हेच देशाचे दिवे होऊ शकतात, म्हणून तर महान कवी म्हणतात "अंधाऱ्या वस्तीत माझ्या भीमानं लावलाय दिवा" करिता अंध श्रद्धा रूढी परंपरा कर्मकांड, व्यसनमुक्त यातून मुक्त व्हावे यातच आपले भले आहे...आणि तेच खरे बौध्द आहेत...

Adv. नामदेव सावंत..... 9420401633.
 मुंबई उच्च न्यायालय  खंडपीठ औरंगाबाद,

------------------------------------------------


प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या २२ प्रतिज्ञा अभियानामार्फत दरवर्षी नित्यनियमाने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वानदिनी (दि.५ व ६ डिसेंबर) रोजी 'चैत्यभूमी,मुंबई येथे धम्मजागृतीचे कार्य केले जाते. त्या अंतर्गत चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या देश-विदेशातील सर्व धम्मबांधवाना २२ प्रतिज्ञा व त्याचे धम्माच्या दृष्टीने असलेले महत्व पटवून देणे, तथागत भगवान बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मानवी कल्याणाच्या उत्कर्षासाठी व विकासासाठी आवश्यक असलेल्या विज्ञानदृष्टीने धम्माकडे पाहणे व त्याच पद्धतीचे आचरण जीवनात प्रत्येकाने करावे यासाठी २२ प्रतिज्ञा अभियान शुद्ध व्हा ! बुद्ध व्हा! हा भीमसंदेश सदोदित लोकांपर्यंत पोहचवीत असते. 'चैत्यभूमी,मुंबई येथे महापरीनिर्वाणदिनी २२ प्रतिज्ञा अभियानात धम्मप्रचारक म्हणून आपले योगदान देण्याचे आवाहन या द्वारे करण्यात येत आहे.

धम्माच्या विसंगत ज्या ज्या गोष्टी असतील त्याविषयी जनमाणसात प्रबोधन करणे. दारू,तंबाखू,गुटखा यासारख्या मादक पदार्थाचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सांगून ते सोडण्यासाठी आव्हान करणे. अंधश्रद्धेतून पुरुष-महिलांनी हातात व गळ्यात बांधलेले धागे,दोरे,गंडे, यांची निरर्थकता त्यांना पटवून देणे व ते त्यांना त्यांच्या हाताने काढावयास प्रवृत्त करणे. महिलांमध्ये मोठ्याप्रमाणात असलेल्या नवसाच्या, उपवास करण्याच्या पद्धतीला विरोध करून त्यांना धम्माचे महत्व समजावून सांगणे. चैत्यभूमीवर जे जे समाज बांधव येतात त्यांच्यामध्ये जर खरच अश्या प्रकारच्या धम्मविसंगत बाबी आढळल्या तर त्यांना त्या सोडण्यासाठी जाहीर आव्हान करण्यात येते. हे कार्य म्हणजेच बाबासाहेबांचे धम्मक्रांतीचे अभियान समजले जाते, कारण २२ प्रतिज्ञा या मानवाच्या दुख: मुक्तीचा राजमार्ग आहे. जो व्यक्ती २२ प्रतिज्ञा संपूर्णपणे आपल्या जीवनात पाळेल तोच खऱ्या अर्थाने पूर्ण शुध्द बुद्ध समजला जाईल
यासाठीच तर आम्ही सारेजण मिळून हे कार्य अखंडपणे करीत आहोत आणि करत राहणार प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी. या तुम्ही पण सहभागी व्हा २२ प्रतिज्ञा अभियान आपल्या सर्वांचे आहे त्यामुळे आपण सारे मिळून ५ व ६ डिसेंबर या दिवशी पुन्हा एकदा चैत्यभूमीवर हे कार्य करण्यसाठी सज्ज होऊया. धम्मप्रचार, प्रसारची आवड असलेल्या व सामाजिकतेचे भान असलेल्या प्रत्येकाने या अभियानात सामील व्हा.
सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क अथवा नोंदणी करावी.
विनोद पवार - 9819080945
बावीस प्रतिज्ञा अभियान मुख्य प्रचारक
प्रदीप जाधव - 7208777050
अमर जाधव - 9702418621

टीप - या कार्यासाठी आपणास जमेल तेवढे आर्थिक सहकार्य करावे हि विनंती 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com