महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीचे हजारो गट असतील पण अशिक्षित असो की सुशिक्षित खेड्यात राहणारा असो कि शहराच्या झोपडपट्टीत भाषण करण्यास उभा राहिला आणि हातात माईक आला तर देशातील तमाम संत,महापुरुषांच्या महा माता राष्ट्रमाता च्या प्रतिमेला विचारांना त्रिवार वंदन केल्या शिवाय पुढे जात नाही.ही वैचारिक महान परंपरा क्रांतिकारी विचार मानणाऱ्या कार्यकर्त्याची आहे. सुषमाताई अंधारे ह्या राज्यातील नव्हे तर देशातील उत्तम प्रबोधनकार व्याख्यात्या म्हणून प्रसिद्ध आहेत. सध्या त्या शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून महाप्रबोधन यात्रा गाजवीत आहेत. ते सर्वांसाठी प्रेरणादायी इतिहास सांगणाऱ्या ठरत आहेत.
अरे दादा,हो,......... सगळ्यांना आदाराने नाव घेऊन,मग तो विरोधक असो अथवा स्वपक्षीय असो,...आपले मत मांडताना सैविधानिक चौखटीत राहून,आदर करून फैलावर घेणारी क्रांतिकारी आंबेडकरी विचारांचे प्रबोधन करणारी भिमाची लेक आता शिवसैनिकांच्या मनावर,माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर वैचारिक धुमाकुळ घालत आहे. शिवसेनेने अर्थात उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सुवर्ण संधीचे सोने करून महाराष्ट्रातील जनतेला नव्हे,भारतातील जनतेला सकस क्रांतिकारी आंबेडकरी विचारांचे बाळकडू सहज पणे शिवसैनिकांना देण्याचे महत्वाचे कार्य सुषमाताई अंधारे करीत आहेत. त्याच बरोबर आज विरोधकांच्या छाताडावर घायाळ करणारे शब्दांचे बाण मारत आहेत.हीच क्रांतिकारी आंबेडकरी विचारांच्या लेकीला सुवर्ण संधी आहे.
महाराष्ट्र राज्यात एक काळ असा होता शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसैनिक मनसे सैनिक कायदा कानून मान्यच करीत नव्हते.कायदा मोडणारे,संविधानाला न मानणारे जेव्हा सत्ताधारी झाले तेव्हा पासून त्यांना संविधानाची ताकद माहिती पडली,ते शिवसैनिक संविधान प्रेमी झाल्यामुळे मनुवादी पेशव्यांची मोठी गोची झाली होती. त्यांनी संविधानाच्या चौकटीतील इनकॉमटॅक्स ईडीचा वापर करून अभेद शिवसेना किल्ला फितुरीने फोडला.त्या कटकारस्थानी लोकांना आज महाप्रबोधन यात्रा मध्ये सुषमाताई अंधारे सळो की पळो करून बहुजन समाजाचा बुलंद आवाज झाली आहे.
तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे,आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या क्रांतिकारी विचारांची वैचारिक वारसदारी हिंदुत्ववादी टिक्कोजी रावांना जमीन दाखवत आपल्या क्रांतिकारी प्रबोधन शैलीने समाचार घेत आहे. शिवसेना आणी आंबेडकरी अनुयायी यांचा दुरान्वये संबंध नसतो.हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसैनिकांना आंबेडकरी विचारांचे शत्रू बनविण्याचे काम मनुवादी लोकांनी केले होते.राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा पासून त्यांनी प्रथम स्वतात प्रचंड वैचारिक बदल घडवून घेतला.आणि प्रबोधनकार ठाकरेचा वैचारिक वारसा स्वीकारला
त्यावेळेपासून मनुवादी पेशव्याच्या बुडाला आग लागली.कोरोना काळात अतिशय शांत डोक्याने विचार करून महाराष्ट राज्याचा कारभार हाताळला. केंद्रातील आदरणीय नरेंद्र मोदी सरकारच्या सारखी बुद्धीला न पटणारी कृती उद्धवजी ठाकरेंनी केली नाही.एक कलमी एक समानता आखून सन्मानीय उद्धव ठाकरे यांनी भेदभाव न करता चारीबाजूने राजकीय पक्ष कोंडी करण्याचा अहोरात्र प्रयत्न करत असतांना महाराष्ट्रातील जनतेसाठी शांतपणे जे काम केले ते निश्चितच कौतुकास्पद होते. त्यामुळेच राज्यातील सर्व समाजाच्या मनात आणी हृदयात उद्धवजी ठाकरे यांनी घर केले.हेच मनुवादी पेशव्यांच्या वारसदारांना सहन झाले नाही.त्यासाठी त्यांनी काय काय केले हे विधानसभेच्या सभागृहात निललज्जपणे सांगितले.हा इतिहास लिहला गेला आहे.असो.
क्रांतिकारी विचारांची मुलुखमैदांनी तोफ सुषमा अंधारे यांना शिवसेनेत उद्धवजी ठाकरे यांनी उपनेते पद देऊन गौरव केला.कोणतेही साधन सामुग्री नसतांना संविधान रक्षणासाठी अहोरात्र धडपड करणारी भीमाची लेक हिला ही सुवर्ण संधी मिळाली,क्रांतिकारी विचारांची मशाल हाती घेऊन अंधार नष्ट करणारी ही भिमाची लेक हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व सांगणाऱ्या भारयीय जनता पक्ष आणी शिंदे गटाचा पुरेपूर समाचार घेत आपली वैचारिक महा प्रबोधन यात्रेची यशस्वी घोडदौड सुरु झाली.शिवाजी पार्क मुंबई पासून सुरु झालेली महाप्रबोधन यात्रा ठाणे वाशी पुढे जात असतांनाचा शिवसैनिकात भिमसैनिकात एक वैचारिक नाते तयार होत असतांना.शिवसैनिकांच्या डोक्यातील हिंदुत्व बाहेर निघण्यास मोठे वैचारिक प्रबोधन होत असतांना प्रबोधनकार ठाकरे यांनी ज्या विचारावर शिवसेना स्थापना केली होती.तो वारसा पुढे येत असल्यामुळे देवळाचा धर्म आणि धर्माचे देवळे हे प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहलेले पुस्तक शिवसैनिकांच्या घरा घरात पोचवा पेशव्यांच्या पाया खालील जमीन भुसभुशीत होण्यास सुरवात होईल आणि त्यांची रोजगार हमी बंद झाल्याशिवाय राहणार नाही.
वैचारिक लढाई लढण्याची परंपरा नसलेली पेशवाई कट कारस्थान करून सुरुंग लावण्यात पारंगत आहे.सुषमा ताई अंधारे इन्कमटॅक्स ईडी च्या रडार येणे शक्य नसल्यामुळे आता या सर्व घडामोडीनंतर साहजिकच विरोधकांकडे सुषमा अंधारे यांना उत्तर देण्यासाठी कोणी सावज नसल्याने त्यांनी पोलीसा मार्फत खोट्या केसेस करून भीतीचे वातावरण निर्माण करने सुरु केले आहे.परंतु गेली कित्येक वर्ष जी सुषमाताई अंधारे सर्वच सामाजिक राजकीय नेत्यांवर वैचारिक हल्ले करीत होती.ती आता सर्वच राजकीय विरोधकांच्या कानपिचक्या घेत आहे. ती आता शिवसेनेच्या उपनेत्या असल्यामुळे त्याला आता एक आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे. महत्वाचे म्हणजे ती क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची लढाऊ व्याख्याती, प्रबोधन करणारी महिला,अन्याय अत्याचाराच्या विरोधात भिडणारी वकील,निडर नेती,आणि त्यात आता शिवसेनेची उप नेता ती आधी कधीच घाबरत नव्हती आता काय घाबरेल हे विरोधकानी विसरावे.
सुषमाताई अंधारे फक्त शिवसेनेच्या नेत्या नव्हे,समस्त पुरोगामी विचारांच्या संस्था,संघटना आणि आंबेडकरी चळवळीच्या लढाऊ नेत्या होत्या आणि आहेत.वेळो प्रसंगी सर्व मतभेद मनभेद विसरून संघर्ष करण्याची तयारी सर्व ओबीसी मागासवर्गीय भटक्या विमुक्त्या एस सी,एस टी,आदिवाशी अल्पसंख्याक समाज संविधान वाचविण्यासाठी मनुवादी पेशव्यांना गाडण्यासाठी सुषमाताई अंधारे सोबत शिवसेनेच्या सैविधानिक चौखटीतल्या लढयाला साथ देण्यासाठी उभी राहील.
राजकारणात सर्वांनाच संधी मिळत नाही.धनदांडगे जात दांडगे प्रत्येक मतदार संघात घराणेशाही मजबूत करून मतदारांना मजबूर करण्यात पटाईत आहेत.शिवसेनेने आता पर्यंत नगरसेवक,आमदार, खासदार निवडून आणले त्यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता.ते जनांदोलनातून तयार झालेले शिवसैनिक,गट प्रमुख शाखा प्रमुख आणि नगरसेवक झाले होते.गद्दारी करणाऱ्या आमदार खासदारांचा इतिहास भूगोल तपासून पहा.कोण होते काय झाले आणि कशामुळे झाले.म्हणूनच या सर्वांना सुरुंग लावण्याचे अफाट ज्ञान,आणी बौद्धिक पातळीच्या बळावर अनेकांना तोंड बंद करायला लावणारी सुषमाताई अंधारे यांनी आपला लढा चालु ठेवावा.संविधानाच्या रक्षणासाठी त्याग आणी संघर्ष करणाऱ्या क्रांतिकारी आंबेडकरी विचारांच्या लेकीला राजकीय स्पर्धेत शिवसेनेत ही सुवर्ण संधी आहे.
सागर रामभाऊ तायडे,
९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
0 टिप्पण्या