बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य सध्यस्थितीत सातत्याने केले जात आहे. अनेक संस्था संघटना, अंतरराष्ट्रीय संघटना आपआपल्या परीने हे कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्राचीन काळात सम्राट अशोकाने जगभरात ८४ हजार बौद्ध स्तूप बांधले होते. त्याचे अनुकरण करीत आता परदेशी बौद्ध अनुयायी ८४ हजार बुद्धप्रतिमा भारतीय लोकांना देत आहेत. जेणेकरून ते बुद्धाप्रति आदरभाव निर्माण करू शकतील. धम्मज्ञान मार्गाचे अनुकरण करू शकतील. याबाबतीत गगन मलिक फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. या संस्थेच्या माध्यमातून भारतात बुद्धप्रतिमाचे वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या अभियानांतर्गत भारतात बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. त्यासाठी थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, तैवान, सिंगापूर, व्हिएतनाम या बुद्धाला मानणाऱ्या देशांचाही पाठिंबा त्याला मिळत आहे.
0 टिप्पण्या