Top Post Ad

नेत्याला केंद्रात मंत्रीपद मिळावं म्हणून आत्मदहनाचा इशारा देणाऱा पॅन्थऱ काळाच्या पडद्याआड

 


आंबेडकरी चळवळीला वाहून घेणाऱ्या पॅथर तानाजी गायकवाड यांना विनम्र अभिवादन, 

कोण होते तानाजी गायकवाड? असा सवाल मला काही नवख्या तरूणांनी विचारला आणि मन एकदम सुन्न झाले. नव्या पिढीला आपला इतिहास आणि इतिहास घडविणारे पॅथर माहिती करून देण्यात आम्ही कुठे कमी पडलो का? असा प्रश्न माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या पञकार या नात्याने मला हेलावून गेला. १९७२ मध्ये दलित पॅथरचे वाढत्या अन्याय, अत्याचाराने कळस गाठल्याने आक्रमक लढे उभारले होते. त्यावेळी पॅथर नामदेव ढसाळ, पॅथर राजा ढाले, पॅथर ज. वि.पवार यांच्यासह हजारो तरूणांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून आंबेडकरी चळवळीला ताकद देण्यासाठी रस्त्यावर लढले. कधी रिडल्सचे आंदोलन असो किंवा मागासवर्गीय यांचा सरकारी नोकरीतील बॅकलॉग असो, अथवा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलन ही आंदोलने यशस्वी करण्यासाठी जे पॅथर्स लढले. त्यामध्ये पॅथर तानाजी गायकवाड यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. 

गेल्या २० वर्षापासून माझी पॅथर तानाजी गायकवाड यांच्याशी मैञी होती.त्यांनंतर आम्ही एकाच ठिकाणी रहात असल्याने पॅथरचे अनेक लढे कसे जिंकलो, कशी रणनिती बनवली. याची  माहिती ते नेहमी देत असत, एक आक्रमक रिपब्लिकन नेते म्हणून त्यांची ओळख होती. माञ नुकतेच त्यांचे निधन झाले आणि आंबेडकरी चळवळीचे अतोनात नुकसान झाले. पॅथर तानाजी गायकवाड यांनी चळवळीला वाहून घेतले होते. प्रत्येक आंदोलनात तानाजी गायकवाड म्हणजे पोलिसांचे लक्ष ठरत असत. चेंबूरमध्ये काही कार्यकर्ते यांनी नामांतर आंदोलना दरम्यान ट्रेनमध्ये आग लावली. तेव्हा  तानाजी गायकवाड यांचेच नाव पुढे आले होते. वरळीच्या दंगलीत त्यांना तीन महिने तुरूंगवास झाला होता. अलिकडेच भीमाकोरेगाव येथे भीमसैनिकांवर दगडफेक झाली तेव्हा चेंबूरच्या अमर महाल येथे शेकडो तरूणांना घेऊन रास्ता रोको आणि पोलिसांचा लाठीमार खाण्यात तानाजी गायकवाड पुढे होते. 

    मला आठवते आहे, मी दैनिक नवाकाळमध्ये संपादकीय विभागात कार्यरत होतो. दुपारी त्यांचा मला फोन आला. संतापलेले होते, मला म्हणाले भाजपने रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांना केंद्रात मंञीपद दिले नाही तर शिवाजी पार्कवर आत्मदहन करणार आहे, अशी बातमी त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी ती नवाकाळमध्ये छापून आणली. ६ डिसेंबर रोजी ते आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार होते, त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आताचे रेल्वे राज्यमंञी रावसाहेब दानवे यांनी आठवले साहेब यांना केंद्रात मंञीपद देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले. त्यानंतर पॅथर तानाजी गायकवाड हे खूष झाले. लोखंडे मार्गावर प्रचंड विरोधी वातावरण असताना तानाजी गायकवाड यांनी आठवले साहेब यांची सभा घेवून दाखवली. शेवटपर्यंत आठवले साहेब यांच्याशी एकनिष्ठ असलेला पॅथर तानाजी गायकवाड नाराज दिसत होते. नोकरीतून निवृत्त झाले होते. समाजाला वेळ देत होते. पनवेलमध्ये गेल्यानंतर त्यांची क्वचित भेट होत असे. मात्र त्यांनी घेतलेल्या बँकेच्या कर्जामुळे ञस्त होते. संपत्ती जप्तीची नोटीस आल्याने लढणारा पॅथर तानाजी गायकवाड समाजातील बदनामीने हादरून गेले होते, त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच आंबेडकरी चळवळीत एकच खळबळ माजली होती, त्यांना आंबेडकरी चळवळीच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.....

  •     मा. महादू पवार
  • जेष्ठ पञकार ,मुंबई
  • -----------------------------------------------------------

 रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तानाजी गायकवाड यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा झुंजार पँथर आक्रमक नेतृत्व हरपले आहे. तानाजी गायकवाड यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत तानाजी गायकवाड यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दिवंगत तानाजी गायकवाड अनेक वर्षे चेंबूर येथे वास्तव्यास होते.  नुकतेच ते नवीन पनवेल येथे राहावयास आले होते   वयाच्या 65 व्या वर्षी दि. 24 ऑगस्ट रोजी तानाजी गायकवाड यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी;तीन मुली आणि 2 मुले असा परिवार आहे. पनवेल खांदा कॉलनी येथे दिवंगत तानाजी गायकवाड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com