तीस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामीन न्यायालयाने मंजूर केला. मात्र यावेळी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात पोलिसांना चांगलेच फटकारले. गुरुवारी तीस्ता सेटलवाड यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. तेव्हा जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी सहा आठवडे पुढे का ढकलली? सामान्य स्वरूपाचा गुन्हा असलेल्या अशा प्रकरणांत एका महिला आरोपी विरोधात सुनावणीला एवढा विलंब का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. तसेच, तीस्ता सेटलवाड यांच्याविरोधात पोटा अथवा यूएपीएच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला नाही. मग दोन महिन्यांपासून त्यांना कोठडीत का ठेवले, असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला विचारला.
आपले आजोबा एम.सी. सेटलवाड हे देशाचे पहिले ॲटर्नी जनरल असणारी.. ती हीच, तिस्ता सेटलवाड!
जालियनवाला बाग हत्याकांडांत ४०० भारतीयांना गोळ्या घालणाऱ्या जनरल डायरच्या विरोधात, ब्रिटनच्या न्यायालयात खटला लढवून क्रूरकर्मा डायरवर कोर्ट-मार्शल कारवाई करण्यास आणि त्याची पदावनती करण्यास भाग पाडणारे, चिमणलाल हरीलाल सेटलवाड हे या तिस्ताचेच पणजोबा! डॉ. भीमराव आंबेडकरांच्या 'बहिष्कृत हितकारिणी सभे'चेही ते संस्थापकीय अध्यक्ष होते.
ही तीच तिस्ता सेटलवाड आहे; जी दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या शेकडो हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी, फक्त न्यायालयीन लढाईच लढत नाहीय; तर डझनावारी पीडितांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व उदरनिर्वाहासाठीही झटत आहे. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 'हिंदूंची' लढाई देखील, तिस्तानेच लढवली आणि सरकारकडून मृतांच्या वारसदारांना मदत मिळवून दिली. याच तिस्ता सेटलवाडला, हे सावरकरवादी गुंड, हिंदू मानत नाहीत; कारण, बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेले दुर्दैवी जीव, हे फेरीवाले-टपरीवाले आणि सर्वसामान्य नागरिक होते...
सेटलवाड परिवाराची प्रत्येक पिढी ही सर्वसामान्य लोकांची लढाई लढत आलेली आहे. तिस्ताचे वडील सुप्रसिद्ध बॅरिस्टर होते आणि 'जनहिताच्या मुद्द्यांवर संघर्ष करणारे व्यक्तिमत्व' अशी त्यांची ओळख होती. या परिवाराने कधीही देशभक्तीचे ढोंग केले नाही. त्यांच्या तिन्ही पिढ्या सर्वसामान्यांसाठी, गोऱ्या इंग्रजांविरोधात लढल्या आणि स्वातंत्र्यानंतर, काळ्या इंग्रजांविरोधात आज लढत आहेत.
दुर्दैवाने, सद्यस्थितीत गद्दार आणि इंग्रजांचे 'माफीवीर' अशी ओळख असणाऱ्या सावरकरांच्या भक्तांचे शासन देशावर आहे.
"प्रत्येकजण पैशासाठीच काम करतोय आणि सत्तासंपत्तीच्या जोरावर, आम्ही कुणावरही दहशत माजवू शकतो"असं, इंग्रजांच्या पेन्शनवर जगणाऱ्यांच्या मानसपुत्रांनो, भीक मागून, मंदिरांच्या नावावर वर्गण्या गोळा करुन, त्यावर जगणाऱ्यांना जरुर वाटत असेल! पण, एक शूर स्त्री, सार्वजनिक क्षेत्रात बहादूरपणे वावरतेय... हाच, तिस्ता सेटलवाडच्या अस्तित्वाचा एकमात्र अर्थ आहे आणि त्यामुळेच, धर्मांध शक्तीं आणि त्यांचे सर्वेसर्वा घाबरलेले आहेत. तिस्ताला उध्वस्त करण्यासाठी, त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावलंय, हीच खरी तिची मोठी ताकद आहे.
देशाची अर्ध्याहून लोकसंख्या, ज्या व्यक्तीला परमेश्वर मानते, तोच त्यांचा तथाकथित परमेश्वर मात्र, एकट्या 'तिस्ता सेटलवाड'ला थरथर कापताना जाणवावा, अशी ही या तिस्ताची 'नैतिक-दहशत' आहे... भले मग, 'त्याच्या' खिशात आयबी, सीबीआय, सीआरपीएफ असो किंवा तो, 'डेल्टा' सुरक्षेसारख्या कितीही उच्चदर्जाच्या सुरक्षाव्यवस्थेत वावरत असो!
(देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या, आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या, प्रत्येक व्यक्ती, परिवार आणि विचारधारेचा, आरएसएस (RSS) कमालीचा द्वेष करीत आलेला आहे आणि म्हणूनच, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची एकही संधी 'संघीय' कधी सोडत नाहीत. १९२५ पासून, १९४७ पर्यंत, 'आरएसएस'ने स्वातंत्र्यलढ्याच्या एखाद्या नायकावर कधी काही चांगला लेख लिहिलाय असा एकही 'स्वातंत्रसेनानी' किंवा स्वातंत्र्यलढ्यासाठी कुठलं आंदोलन त्यांनी उभारलंय, हे आपल्याला आढळून येणार नाही. त्याकाळी, हेच 'संघीय' एकतर, मोहम्मद अली जिनांशी सहमती राखून होते किंवा तत्कालीन इंग्रज शासनाने पुरवलेल्या आर्थिक रसदेतून स्वातंत्र्यसैनिकांबाबत गुप्त माहिती इंग्रजांना पुरवत होते)
©मूळ हिंदी लेखक : सत्येंद्र पी.एस्.
मराठी अनुवाद : संजय दळवी
0 टिप्पण्या