भारताचे नागरिक म्हणून आता पुरावे द्यावे लागणार

 


सत्य-असत्याशी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमता।।       संत तुकाराम महाराज म्हणतात ते आजही तितकेच खरे आहे.काय खरे आणि काय खोटे?हा प्रश्न अजूनही अलाहिदा आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात केंद्र सरकारच्या वतीने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविले जाणार आहे. या मागचा सरकारचा उद्देश देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचा या निमित्ताने प्रयत्न केला जात आहे . प्रथमतः भाजपची मातृसंस्था असलेल्या आरएसएसने देश स्वातंत्र्य होऊनही राष्ट्रध्वज काही काळ फडकविलेला नव्हता. हे देशातील सुजाण नागरिकांना माहिती असेलच आणि सध्या केंद्रामध्ये भाजपचे सरकार असल्याने देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हे अभियान सरकारतर्फे राबविल्या जात आहे. त्यामुळे ज्या तिरंगी झेंड्याविषयी आरएसएसच्या सदस्यांना किती भक्ती होती आणि तीच भक्ती देशातील नागरिकांच्या मनात ठसविण्याच काम सुरू आहे. तिरंग्यावर भक्ती करण्यापेक्षा देशावर प्रेम असले पाहिजे भक्ती म्हणजे केवळ गवगवा , ओवाळणे आणि दिखाऊ पण असतो परंतु त्यातून राष्ट्रप्रेम जागृतच होईल अशी भोळी भाबडी समजूत सरकार स्वतः करून घेत आहे. 

तसेच हर घर तिरंगा या अभियानामुळे स्वतःची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने साधण्याची पुरेपूर संधी चालून आल्यागत सध्या केंद्र सरकार वागत आहे. राष्ट्रभक्ती पेक्षा राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी आणि स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली म्हणून देशातील तमाम नागरिकांना महागाईच्या जाळ्यात अडकवून त्यांना राष्ट्रभक्तीच्या नावाखाली देशातील बेरोजगारी महागाई कोलमलेल्या आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस गरीब आणि श्रीमंत यातील वाढणारी दरी ही लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे.        देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अभियानाचा कोट्यावधीचा खर्च देशातील नागरिकाकडूनच सरकारला व तिरंगा बनवणाऱ्या कंपन्यांना मिळणार आहे. एक तर कोरोना विषाणूंमुळे देशातील नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना हा खर्च आला नाही का? हा प्रश्न सरकारने स्वतःला विचारायला हवा?

   ध्वज बनवणाऱ्या कंपन्या सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारला कर्जावर ध्वज पुरविणार आहेत आणि देशातील सर्व नागरिकांना स्वतःच्या पैशाने ध्वज विकत घ्यावा लागेल. जे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी ध्वजारोहण करणार आहेत.१ ऑगस्टपासून पोस्ट ऑफिसमध्ये ध्वज उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारच २० कोटी घरांवर ध्वज फडकविण्याच उद्दिष्ट आहे, जर राष्ट्रध्वजाची किमान किंमत देखील १० रुपये असेल. त्यामुळे या मोहिमेसाठी एकूण २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हे २०० कोटी त्याच लोकांच्या खिशातून येणार आहेत.निव्वळ व्यवसायीकरण सुरू आहे.मुळत: राष्ट्रप्रेमाची सक्ती कशासाठी केली जात आहे, कळायला मार्ग नाही.आपण भारताचे नागरिक म्हणून आता पुरावे द्यावे लागणार ही सक्ती का केली जात आहे.ही केंद्र सरकारची राष्ट्रभक्ती देशातील नागरिकांना लक्षात येईल का?

  केवळ घरावर झेंडा लावल्याने राष्ट्रभक्ती दिसेल परंतु राष्ट्रप्रेमासाठी मनामनामध्ये तिरंग्याबद्दल आदर आणि सन्मान असेल तर राष्ट्रप्रेम दाखवण्याची मुळीच गरज नाही .भक्त हे भक्ती करतात.सध्या देशात राष्ट्रप्रेमापेक्षा राष्ट्रभक्तीला अधिक महत्त्व निर्माण झाले आहे. परंतु हे चुकीचे आहे कारण राष्ट्रप्रेम उजागर करण्याची मूळतः गरजच  काय?भारत प्रत्येक भारतीयांच्या हृदयात स्थान करून आहे.डिपी आणि घराघरात झेंडे लावण्याने भक्त होण्यापेक्षा राष्ट्रप्रेमी असावं.म्हणतात ना ' दुनिया झुकती है,उसे झुकानेवाला चाहिए ' अगदी तेच सुरू आहे.कोरोना काळात टाळ्या वाजवून एक प्रकारे अंधश्रद्धा जोपासा असाच संदेश दिला गेला.

  देशातील ऐतिहासिक स्मारकाच्या स्थळांची उठाठेव केली आहे. दिल्लीतील अमर जवान ज्योती आणि इतरही महत्त्वाच्या स्थळांची उठाठेव सरकारने केली आहे. तसेच सनातनवादी विचारांच्या महापुरुषांना पुढे केले जात आहे. लोकशाही सर्वोच्च मानायची आणि देशात कोणी विरोधक राहू नये यासाठी सत्तेचा वापर करायचा आणि देशातील नागरिकांना मूळ समस्येपासून दूर करून, राष्ट्रप्रेमी करण्यापेक्षा राष्ट्रभक्त करण्याचा प्रकार आहे.

- पदमाकर उखळीकर ,
  मो. ९९७५१८८९१२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA