Top Post Ad

राष्ट्रध्वज तयार करणाऱा खादी ग्राम उद्योग मात्र आर्थिक अडचणीतच...


राष्ट्रध्वजसंहितानुसार हाताने काढलेले किंवा विणलेल्या लोकर, सूत, शिल्क  खादी कपड्यापासून राष्ट्रध्वज बनवलेला असावा अशी तरतूद आहे. परंतु भाजपप्रणित मोदी सरकारने यात बदल करून पॉलिस्टर कापडाचा समावेश केला. परिणामी महाराष्ट्रासह देशातील खादी उद्योगाला प्रचंड मोठा फटका बसला आहे.  हर हर तिरंगा हे अभियान काही महिन्यापूर्वी राबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात  राष्ट्रध्वज तयार करणे शक्य नसल्याने खादी ग्रामोद्योगला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.  वर्षभराआधी ही मोहीम जाहीर केली  असती तर याचा फायदा नक्कीच खादी ग्राम उद्योगाला झाला असता. मात्र आता या योजनेमागे भाजप सरकारचा कोणता हेतू होता हे लवकरच स्पष्ट होईल. 

 यति नरसिंहानंद सरस्वती यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये नरसिंहानंद सरस्वती सांगत आहेत की  हरघर तिरंगा नावाने मोठी मोहीम सुरू आहे. सत्ताधारी पक्ष ही मोहीम राबवत आहे. मात्र  तिरंग्यासाठी सर्वात मोठी ऑर्डर बंगालमधील एका कंपनीला देण्यात आली आहे. असा दावा त्यांनी केला आहे. ती कंपनी सलाउद्दीन यांच्या मालकीची आहे. ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठे हे ढोंगी अभियान आहे. या मोहिमेवर  बहिष्कार टाकला पाहिजे. घरामध्ये तिरंगा लावायचा असेल तर जुना तिरंगा लावा, असे ते म्हणाले. पण सलाहुद्दीनला एक पैसाही देऊ नका आणि नेत्यांना धडा शिकवा, असे ते म्हणाले. इतकेच नव्हे तर सुरतमधूनच झेंड्याचा पुरवठा सर्वाधिक होत असल्याच्या बातम्याही आता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा मुळ हेतू देशभक्ती की अजून काही हे येणारा काळच सांगेल.

राष्ट्रध्वजाची निर्मिती करणाऱ्या देशभरातील निवडक केंद्रांमध्ये समावेश असलेली नांदेड  येथील ऐतिहासिक संस्था म्हणजे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती आहे. स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ, पद्मभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी 1967 मध्ये स्थापन केलेल्या व त्यानंतर डॉ. शंकरराव चव्हाण यांनी संगोपन केलेल्या या संस्थेचा कायापालट करण्याच्या निर्णय तत्कालीन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने घेतला. ज्यात तत्कालीन  उद्धव ठाकरे यांच्या महाआघाडी सरकारमार्फत या वास्तूच्या कायापालट करण्यासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली होती. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती हे केंद्र केवळ खादी उत्पादनांचे निर्मिती केंद्र नसून पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे स्थळ म्हणून ओळखले जाते.

नांदेड येथील खादी ग्रामोद्योग या समितीद्वारे निर्मिती करण्यात येणारा  तिरंगा देशभरात  पुरवठा केला जातो.  नांदेड शहरात मराठवाडा खादी ग्रामउद्योग समितीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते.ज्यात विविध दहा आकाराचे राष्ट्रध्वज येथे तयार केले जातात. सदरील राष्ट्रध्वजासाठी वापरण्यात येणारे कापड हे लातूर जिल्ह्यातील उदगीर  येथून मागविले जाते.  राष्ट्रध्वज निर्मिती करताना राष्ट्रध्वजाचा कपडा, शिलाई, स्वच्छता, आकार, सौंदर्य, रंग  या सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. कापड, दोरी, लाकूड, शिवणकाम आदी बाबत बारकावे तपासूनच ध्वज पुढे पाठविला जातो. देशातील महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तेलंगणा, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब, दिल्ली, राजस्थान, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, चंदिगढ, पॉंडेचरी यासह देशाच्या विविध कानाकोपऱ्यात नांदेड येथे निर्मिती केलेला राष्ट्रध्वज पाठविला जातो. मुंबईच्या मंत्रालयासह देशाच्या राजधानीत लाल किल्ल्यावरील फडकणाऱ्या राष्ट्रध्वजासह अखंड देशभरात नांदेडहून राष्ट्रध्वज पाठवला जातो. देशात कर्नाटकमधील हुबळी जि. धारवाड व नांदेड या दोनच ठिकाणाहूनच देशभर तिरंगा राष्ट्रध्वज पुरवठा होतो. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com