विनायक मेटे अपघाताचे गूढ...दोन वेळा झाला पाठलाग...फोन रेकॉर्ड कॉल व्हायरल


  शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे  यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीडमध्ये एक कॉल रेकॉर्डिंग  व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंगमधील संभाषणानुसार 3 ऑगस्टला मुंबईकडे जात असताना शिक्रापूरपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन गाड्यांनी पाठलाग करत होत्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. विनायक मेटे यांचं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाती निधन झालं. मेटे यांच्या गाडीच्या ज्या प्रकार अपघात झाला, त्यावरून काही प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पण, विनायक मेटे यांच्या सहकाऱ्याचा फोन रेकॉर्ड कॉल व्हायरल झाला आहे. अण्णासाहेब मायकर असं त्यांचं नाव आहे. अण्णासाहेब मायकर हे 3 ऑगस्टला मेटे यांच्यासोबतच प्रवास करत होते.

या फोन कॉल रेकॉर्डमधील संवादानुसार, तीन ऑगस्टला विनायक मेटे यांच्यासोबत आम्ही मुंबईकडे जात होतो. त्यावेळी शिक्रापूरपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन गाड्या पाठलाग करत होत्या. यामध्ये  आयशर ट्रक देखिल होता. शिक्रापूरपासून ही गाडी पाठलाग करत होती, ती गाडी कधी पाठीमागे राहत होती तर कधी ओव्हरटेक करून पुढे जात होती, त्यामुळे आम्हाला काही पुढे जाता येत नव्हते, अशी माहिती मेटेंचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी दिली. शिक्रापूरजवळ एक गाव होतं. तिथे अडीच किलोमिटरपर्यंत आमचा पाठलाग करण्यात आला होता. ती गाडी मागे येत होती, पुढे जात होती. रात्री हा प्रकार घडला होता. या गाडीतील माणसं आम्हाला हात दाखवत होती. आम्ही गाडी थांबवून चौकशी करणार होतो, त्यावेळी मेटे साहेबांनी गाडीचा नंबर घेऊन ठेव, असं सांगितलं.

बीडमधून मुंबईला निघालो होतो,  रात्री 11.30 वाजता शिक्रापूरजवळ पोहोचलो होतो. एक गाडी आमचा पाठलाग करत होती. समोर आयशर ट्रक होता. त्या गाडीतली माणसं आम्हाला हात करून गाडी थांबवण्यासाठी इशारा करत होते. पण, मेटे साहेबांनी गाडी थांबवण्यास नकार दिला, गाडी आयशर ट्रकच्या मागेच ठेवण्यास सांगितले होते. पुढे एक छोटे गाव आलं, तिथे या गाडीने आमच्या गाडीला जोरात कट मारला आणि निघून गेले. मग आम्ही आयशर ट्रकला मागे टाकून पुढे निघून गेलो, अशी माहिती मायकर यांनी दिली. जी गाडी आमचा पाठलाग करत होती, त्यामध्ये पाठीमागे एक जण बसलेला होता. तर पुढच्या सीटवर एक जण बसलेला होता. ड्रायव्हर मिळून अशी तीन माणसं त्या गाडीमध्ये होती, असंही मायकर यांनी सांगितलं. या घटनेनंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मेटे यांच्या भाच्याला सांगितलं होतं. त्यांचा दुसरा ड्रायव्हर मोरे यांना सांगितलं होतं.  या संपूर्ण प्रकारामध्ये ड्रायव्हर समाधान मोरे आणि त्यांचा अंगरक्षक सुद्धा साक्षीदार होता, असंही मायकर यांनी सांगितलं.

अशातच विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी माध्यमांसोबत बोलताना कार चालक एकनाथ कदम याच्याविषयी केलेल्या दाव्यामुळे संशयाचं धुकं आणखीनच गडद झालं आहे. 'अपघात झाल्यानंतर माझं कारचालक एकनाथ कदम याला सातत्याने एकच म्हणणं होतं की, साहेबांशी बोलणं करून दे. साहेबांच्या दोन्ही नंबरवर मी फोन केले, पण ते फोन उचलत नव्हते. माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही तर मला वाटत होतं किमान सुरक्षारक्षकाशी तरी बोलणं व्हावं, कारण तोपर्यंत मला माहीत नव्हतं की सुरक्षारक्षकही जखमी आहे. मात्र एकनाथ हा कोणाशीच बोलणं करून देत नव्हता. तो एकमेव व्यक्ती होता ज्याला हे सगळं कसं झालं हे माहीत आहे. मग साहेबांचा मृत्यू झाला आहे हे त्याला माहीत होतं का? किंवा नसेल झाला तर त्याने वैद्यकीय मदत मागितली का? असे सगळे मुद्दे अनुत्तरित आहेत,' असं ज्योती मेटे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं म्हटलं आहे. त्यामुळे ही चौकशी पारदर्शकपणे व्हावी, अशी आमची मागणी असणार आहे, असंही ज्योती मेटे यांनी म्हटलं आहे.

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ भातण बोगद्याच्या साधारण १५० मीटर अगोदर विनायक मेटे यांची मोटार त्यांच्या गाडीच्या पुढे असलेल्या ट्रकसदृश अवजड वाहनावर जोरदार धडकली. हा आघात इतका मोठा होता की, चक्काचूर झालेल्या मोटारीच्या डाव्या भागातून त्यांच्या अंगरक्षकास दरवाजा कापूनच बाहेर काढावे लागले. मोटारचालक एकनाथ कदम यांच्या शेजारी मेटे यांचे अंगरक्षक बसले होते. तर मागच्या आसनावर मेटे बसले होते. अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, विनायक मेटे यांच्या गाडीला धडक देऊन पळ काढणाऱ्या ट्रक चालकाचा शोध घेऊन चालकाला ट्रकसह पालघर जिल्ह्यातील कासा पोलिसांनी दमण येथून ताब्यात घेतलं आहे. सध्या याप्रकरणी ट्रकचालक आणि मेटे यांचा कारचालक एकनाथ कदम याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूच्या निमित्ताने एक्स्प्रेस वे वरील वाहतुकीच्या त्रूटी लक्षात येत आहेत. उदयनराजे आणि संभाजीराजेंनी या चुकांवर बोट ठेवले आहे.  विनायक मेटेंचा ड्रायव्हर जेव्हा मेटेंसोबत हॉस्पटलमध्ये आला तेव्हा तो आपले स्टेटमेंट सारखे बदलत होता. यामुळे अपघात कसा झाला याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण होत होती. तो असे का बोलत होता, त्याला काय आठवत होते, काय आठवत नव्हते? त्याला डुलकी लागली होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1