Top Post Ad

वरळीत दलित पँथरचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम... ज्येष्ठ पँथर कार्यकर्त्यांचा सत्कार


१९७० चे दशकात महाराष्ट्र राज्य आणि देशाच्या राजकारण समाजकारणात आपल्या क्रांतिकारी विचारांनी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव हस्तक्षेप करून आंबेडकरोत्तर कालखंडात नव चैतन्य निर्माण करणाऱ्या दलित पँथर या संघटनेचे यंदा २०२२ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. दलित चळवळीत मूलभूत प्रश्न हाताळणारी व येथील शोषित कष्टकरी चळवळी सोबत भातृभावाचे कृतिशील नाते असायला हवे अशी व्यापक भूमिका आपल्या जाहीरनाम्यातून पॅथरने मांडली होती. आणि डॉ. आंबेडकरांचा ब्राम्हण शाही व भांडवलशाही विरोधातील विचारांवर चालण्याचा प्रयत्न केला होता. 

अशा या संघटनेचा दिनांक ९ जुलै हा स्थापना दिवस आहे. त्या निमित्ताने ज्या वरळी विभागातून दलित पँथर संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली त्या मुंबईतील वरळी बी. डी. डी. चाळ, ललित कला भवन, जांबोरी मैदान येथील सभागृहात ९ जुलै २०२२ रोजी दुपारी तीन ते रात्री ९ वाजे पर्यंत जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

सदर मेळावाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पँथर नेते शाम गायकवाड असतील. प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीतील पुरोगामी प्राध्यापक लक्ष्मण यादव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभ्यासक डॉ. भारत पाटणकर, ज्येष्ठ पँथर सयाजी वाघमारे, प्रसिद्ध कवी कलावंत किशोर कदम, ज्येष्ठ कार्यकर्त्या अभ्यासक शमा दलवाई आणि तरुण कार्यकर्ते एड. नितीन माने हे उपस्थित राहणार आहेत.

सदर दलित पँथर मेळाव्यात ज्येष्ठ पँथर कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे मनोगत होणार आहे. या प्रसंगी, दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती तर्फे या वर्षात पँथर चळवळीशी संबंधित ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी दत्तक योजना जाहीर करण्यात येणार आहे. तसेच या मेळाव्यात समितीच्या 'पँॅथर विद्रोही शाहिरी जलसा' चा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. असे सुबोध मोरे, सुमेध जाधव, सुनील कदम आणि एड.नितीन माने यांनी समितितर्फे कळवले आहे.

दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती
(सुबोध मोरे- 9819996029 )
(एड. नितीन माने-  8550953358)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com