Top Post Ad

भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज


लढाऊ आरमारी गलबतातील छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र प्रत्येक आगरी कोळी भंडारी गाबीत या मच्छिमार बांधवांनी ,आपल्या घरात लावावे. देव्हाऱ्यात आणि हृदयात जपावे असे आहे. आमच्या समुद्रावरील अधिकारांचे ते पहिले "संविधान" आहे. राजेशाही , हुकूमशाही, घराणेशाही, पुरोहितशाही नाकारून भारतात लोकशाही आणणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व देशातून लाखो संस्थानिक सरदार राजे यातून आपला "आदर्श राजा" निवडले..... त्याचे कारण यात दडले आहे.  छत्रपती शिवरायांचे आगरी कोळी भंडारी गाबीत कराडी यांचे सागरी आरमार,आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार हे आहे .    आजच्या ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया यांच्या बाबतीत राज्यकर्ता म्हणून असलेले समतेचे विचार,दोन हजार वर्षा पूर्वीचा, भारतिय बौद्ध सम्राट अशोक यांच्याबरोबर थेट जुळतात. अर्थात भारतीय संविधानातील लोकशाहीचा विचार आणि रयतेचा स्वराज्याचा विचार यातील साम्य सविधांनकारानी जाणले असावे? चित्र किंवा फोटो हा छाया भेद यातून बनतो.त्याच प्रमाणे भारतीय संविधान हे मनुस्मृतीच्या चुकीच्या शोषक रूढी परंपरा तोडून,नवी मानवी मूल्ये लिहून बनविले गेलेय...... 

मनुस्मृती समर्थक ...हिंदू धर्माच्या लिखित मौखिक घटनेने "समुद्र उल्लंघन" पाप मानले आहे...अर्थात त्यामुळे आम्ही आगरी कोळी भंडारी सागरपुत्र ओबीसी पापी ठरलो होतो. ... चारशे वर्षांपूर्वी याच मनुस्मृती विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी वैचारिक ,राजकीय ,धार्मिक बंड करून आमच्या सागरावरील अधिकारांना राजमान्यता दिली होती....    ब्राह्मण क्षत्रिय (मराठा)वैश्य या पंधरा टक्के उच्चवर्णीय मनुस्मृती समर्थक लोकांच्या विरोधातील शिवाजी महाराजांचे विचार आम्ही सागरपुत्र आजही समजू शकलो नाही.??    जमीनदार सरंजामी उच्चवर्गाच्या विरोधातील आणि आजच्या मागासवर्गीयांच्या (रयतेच्या) बाजूने अर्थात सामाजिक न्यायाचे, समतेचे पुरस्कर्ते शिवराय आजही महाराष्ट्राला अपरिचित राहिलेत........ही चूक लेखन वाचन आणि भाषण यापासून दूर राहणाऱ्या आमच्या ओबीसी सगरपुत्राचीच आहे.  वर्तमान काळाचा आणि इतिहासातील थेट समंध आजच्या 28ऑक्टोबर 2021 माहुल कोळीवाडा मुबई, येथील मच्छीमारांच्या जाहीर सभेशी येत आहे. ... 

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधान यांनी दिलेल्या आमच्या सागरी हक्कांच्या विरोधातील राज्य आणि केंद्र सरकार मधल्या मनुवादी प्रशासक आणि राजकीय नेत्यांच्या विरोधातील सागरपुत्राच्या "आरमाराचे" हे आक्रोश आंदोलन आहे...  ज्येष्ठ मच्छिमार नेते भाई राजन माहुलकर,विजय वरळीकर,सुरेश कोठेकर, भुवनेश्वर धनु,जयेश आकरे,दीपक पाटील आणि रॉल्फ या जागतिक संघटनेचे प्रवर्तक दशरथ भगत हे नेतृत्व करीत आहेत.... ."भारताचा नवा भु संपादन कायदा 2013"  या केंद्रीय कायद्यांने आगरी कोळी सागर पुत्रांचे सागरी मालकी हक्क मान्य केले आहेत.. .मागच्या सत्तर वर्षात महाराष्ट सरकार ,अर्थात सत्तेतील ब्राह्मण सीकेपी मराठा मुख्यमंत्र्यांनी ते नाकारले..... म्हणूनच मुबंई च्या खाड्या समुद्र यांना गटारांची स्थिती येऊन बंदरे गाळाने भरली आहेत............

छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या शिवसेनेने छत्रपती शिवरायांच्या आरमारी विचाराशी "द्रोह" केला आहे.....जे जे मनुवादी हिंदुत्व आहे त्या विचारांचे समर्थक हे सागरी हालचाली विरोधातच आहेत......इंग्रज पोतुरगीज फ्रेंच मोगल यांचा समुद्रात पराभव करणारे लढाऊ जहाजांचे मानकरी आगरी कोळी भंडारी गाबीत कराडी प्लास्टिक पिशव्यांच्या प्रदूषणाची,मुबई महानगर पालिकेच्या गटारांची घाण आपल्या जाळ्यात पकडून मासे कुठे आहेत? याचा शोध घेत आहेत.सागरी पर्यावरण वादी नोटा खाऊन कुंभकर्णी झोपेत आहेत.त्यांचे डोळे आणि कान फुटले आहेत.....शरद पवार  नितीन गडकरी मा पंतप्रधान मोदी या देशातील  सर्वच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या महान नेत्यांना सागरातील लहान मासा आणि प्रदूषणाने मरणारा सूक्ष्म सागरी जीव आणि मच्छिमार कळला नाही.......या नेत्यांची  संवेदनशिलता संपली आहे. देशाच्या पाकिस्तान,बांगलादेश,चीन या सतत वादग्रस्त युद्धजन्य सीमा प्रसार माध्यमात चर्चेत असतात. अर्थात देशाच्या सागरी सीमांचे खरे तटरक्षक हे आगरी कोळी आणि तमाम मच्छिमार जातींचे सागरपुत्र आहेत हे निवृत्त ऍडमिरल अर्थात नौदल प्रमुखही मान्य करतात.  

आज न्हावा शिवडी कोस्टल रोड प्रकल्पात,वरळी बांद्रा सागरी सेतू,वाशी खाडी प्रकल्प, नवी मुबई विमानतळ प्रकल्पात सागरी सुरक्षा असलेले किनारे मच्छीमाराना घेऊन उध्वस्त होत आहेत.....वरळी सी लिंक प्रकल्पात मच्छिमार बाधित होत नाहीत असे नितीन गडकरी या मनुवादी ब्राह्मण नियोजनकार, विकासक ,भाजपा राष्ट्रीय नेतृत्वाने म्हनणे हे त्यांच्या अल्पबुद्धीचे आणि मच्छिमार सागरी वाहतुकीच्या विरोधातील म्हणणे आहे.....मी त्याचा जाहीर निषेध करतो....त्यांनी समुद्रात येऊन मच्छिमार बांधवांची जाहीर माफी मागावी.....सागरी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि देशाचा विकास हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत....जेएनपीटी बंदर,नवी मु विमानतळ आणि मुबंई त होत असलेल्या साऱ्या प्रकल्पांची, ....नव्या 2013 च्या सागरी हक्क कायद्यांने मिळणारी एकूण नुकसान भरपाई शंभर हजार कोटी रुपये आहे. ...अर्थात आमची बंदरे आणि बोटी मासळी बाजार,कोळीवाडे गावठाणे यांचे पुनर्वसन लाख कोटी रुपयांचे आहे... 

देशाच्या सागरी सुरक्षे समधातील राज्य आणि केंद्र सरकारच काम आहे...जसा कसाब सागरी मार्गाने आला तसेच इंग्रज पोतुरगीज फ्रेंच डच मोगल सागरी सीमेवरून आले.त्यांना समुद्रात आडविण्याची ताकद आमच्या मच्छिमार बांधवा मध्येच आहे.        नव्या विकास प्रकल्पात आमचे सागरी हक्क सपविण्यात येत असताना काही नालायक पर्यावरण वादी ,न्यायालयात मच्छिमार प्रकपग्रस्तना न्याय नाकारण्याची हमी घेऊन निर्लज्ज पणे केस हारणारे वकील,दोन पाच लाख घेऊन मच्छिमार सोसायट्यांच्या लेटर हेड वर ना हरकत दाखले देणाऱ्या मच्छिमार सोसायट्या, एनजीओ यांनी आजच्या सभेत येऊन आपली घोडचूक विनम्रपणे मान्य करावी . दर्यादिल आगरी कोळी कराडी भंडारी सागरपुत्र त्या अज्ञानी भाऊ बहिणींना उदार मनाने माफ ही करील....परंतु मा उद्धव ठाकरे मा राज ठाकरे या सख्ख्या भावांनी, बर्याचश्या मंत्रालयातील मंत्री, आयएएस अधिकारी प्रशासक यांनी आमचे मीठ मासे खाल्ले आहेत.,,,लोकनेते दि बा पाटील यांच्या घरातील जिताडा माश्याची चव देशातील सर्वात वयोवृद्ध नेते शरद पवार यांनी चाखली आहे....आमचे ऐरोली दिवा येथील  अत्यन्त मायाळू मछिमार नेते चंदू दादा पाटील यांची मासळी, भाकरी खाणाऱ्या नेत्यांमध्ये कोणताच पक्ष नेता उपेक्षित राहिला नाही अशी त्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे.  

साऱ्या जगात लग्नात हुंडा न घेणाऱ्या महिलांना सारी अर्थव्यवस्था ताब्यात देणारा इथला सागरपुत्र मातृसत्ताक विचारामुळे आणि आपल्या तटरक्षक आरमारी इतिहासात,साहित्यात आजही उपेक्षित असला तरीही संघटित होत आहे.    एकविरा पुत्र भगवान बुद्ध यांनी सांगितलंय ...."सूर्य चन्द्र आणि सत्य यांना फार काळ झाकता येत नाही"  .....ते समोर येणारच. 2013 चा मच्छिमार पुनर्वसन कायदा झाकून मच्छिमार बंधू भगिनींना या सोशल मीडियाच्या काळातही  अज्ञानात ठेवणाऱ्या राजकारणी,आयएएस अधिकारी,प्रशासक पत्रकार पोलीस यांना नम्र विनंती आमच्याशी वैर म्हणजे सागरात राहणाऱ्या माश्याशी वैर......मुसळधार पाऊस वादळ वारे यात बुडणाऱ्या मुबंईत तुम्हास आणि मंत्रालयालाही आगरी कोळी भंडारी सागरपुत्र वाचवतील ,,ज्यांच्या आरमाराने छत्रपती शिवराय,महाराष्ट्र आणि देशालाही सागरी शत्रू पासून वाचविले होते....आम्हास सागरी न्याय हवाय... त्यासाठी  हा महाराष्ट्र .,भारत ,आणि हे जगही गाजवू...उद्याच्या मुबई महानगर पालिकेसह महाराष्ट्र आणि देशात आमची रयतेची सत्ताही आणू.. आम्ही 85 टक्के ओबीसी एससी एसटी आणि आमच्या आया बहिणी.. स्त्रिया..  आम्ही आगरी कोळी भंडारी पुत्र सागराचे!             मातृसत्ताक एकविरा आईचे!                   

 मी राजाराम पाटील.   एक सागरी आरमारी सैनिक शिवरायांच्या महा पराक्रमी आरमाराचा,   8286031463

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com