Top Post Ad

ओबीसीनो लोकशाही समजली काय?.

 

  देशात ओबीसी समाजाची लोकसंख्या ५२ टक्के आहे.हे आकडे वारी खूप जुनी आहे.ओबीसी म्हणजे कोण हेच किती तरी ओबीसी मधील जातीच्या उच्चशिक्षित लोकांना माहिती नाही.हे त्याच्या घरात गेल्यावर शंभर टक्के समजते.अन्यता ज्यांच्या हजार पिढीचा कोणता ही संबध नसलेल्या श्रद्धा,अंधश्रध अज्ञान घरात दिसले नसते.त्या जागी भारतीय संविधान असते.इतर मागास वर्ग किंवा ओबीसी (इंग्रजी: Other Backward Class /OBC) हा सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग (समाज) आहे. भारतात बहुसंख्य समाज हा मागासलेला (Backward class) असून पुढारलेला समाज (Forward class) म्हणजे ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य हा अल्पसंख्य आहे. या बहुसंख्य मागास समाजापैकी जो जास्त मागास आहे तो ‘मुख्य मागास’ समजला जातो. त्याला अनुसूचित जाती जमाती (एस सी,एस टी) म्हटले जाते. या मुख्य मागासांपेक्षा कमी मागासलेल्या समाजघटकांना ‘इतर मागास’ ठरविण्यात आलेले आहे. 

भारतातील ४१% ते ५२% लोकसंख्या ओबीसीची आहे.मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या ३६०, तर देशात ओबीसी जातींची संख्या ३,७४४ इतकी नोंद केलेली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या राष्ट्रीय आयोगाने २,१७१ प्रमुख ओबीसींची यादी जाहीर केलेली आहे. ह्यांतील उपजाती जमेस धरल्यास ही संख्या आणखीही वाढू शकते.कुणबी,साली, माळी,कोष्टी,तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक,  पारीट,गुरव,गवळी,जंगम,पांचाळ,फुलली,रंगारी,सुतार,कासार,धनगर,भंडारी, तांडेल, तांबट, मोमीन, घडसी, विणकर,आगरी,कुंभार,सोनार,कोळी,लोहार,बंजारा अशा अनेक लक्षवेधी जाती ओबीसी मध्ये मोडतात.या प्रवर्गास केंद्रात २७ टक्के तर महाराष्ट्र राज्यात १९ टक्के आरक्षण भारतीय संविधांनाने म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले होते.पण ओबीसी "गर्वसे कहो हम हिंदू है!." म्हणायला लागला आणि त्याचे आजच्या घडीला अनेक ठिकाणचे आरक्षण पद्धतशीर पणे काढण्यास गेले तरी तो जागा होत नाही.म्हणूनच मी सुतार ओबीसी जाहीरपणे विचारतो.ओबीसीनो लोकशाही समजली काय?.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला आपले संविधान निर्माण करून संवैधानिक अधिकार बहाल केले आहेत आणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळाला आहे.भारतीय संविधान सर्वोच्च संविधान सर्वं सामान्य माणसाच्या भावना व्यक्त करणे, मत व्यक्त करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज न दाबणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न न करणे, सर्व सामान्य माणसाच्या मनातील भावना मनातील विचार समाजहित दर्शक विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणे,प्रोत्साहन देणे जनहितार्थ,समाजहितीर्थ, विकासात्मक बाबींचा विचार करता प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पाठबळ देणे,प्रोत्साहन देणे.जिथं जनहित जिथं समाजहित असेल,त्या त्या वेळी सहकार्य करणे,जनहितार्थ,समाजहितीर्थ प्रत्येक गोष्ट,प्रत्येक विषय, प्रत्येक प्रश्नांची उकल करणे, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणे,प्रोत्साहन देणे.हे ओबीसी ना भारतीय संविधानाने दिले,पण ते समजून घेण्यासाठी ते संविधान वाचवे लागेल.पण आम्हाला सांगितले कि ते आंबेडकरांनी त्यांच्या जातीसाठी लिहले.म्हणूनच आमच्या बहुसंख्य ओबीसीनी ते वाचले नाही.मी खोटे लिहत असेल तर प्रत्येक ओबीसीनी आपल्या छातीवर हात ठेऊन प्रामाणिकपणे सांगावे.हो मी संविधान वाचले आणि मला लोकशाही समजली.

भारतीय संस्कृतीत जनता महत्वाची नाही आहे,वर्ण महत्वाचा आहे.ओबीसी कुठल्या वर्णात येतात?. भारताच्या इतिहासात,भारतीय संविधान हेच सर्वोच्च आहे.म्हणूनच विचारतो ओबीसीनो लोकशाही समजली काय?.संविधान ज्याला समजले त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार समजला. ज्याला संविधान समजले ती व्यक्ती तत्व मुद्दे मुळ विषय या मुख्य बाबींचा विचार करतो. कधीही विषयाला बगल देणार नाही.ज्याला संविधान समजले ती व्यक्ती कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करणार नाही.ज्यांना संविधान समजले ती व्यक्ती प्रत्येक मताचा सन्मान करणार यात शंकाच नाही.आवाज दाबण्याचा प्रयत्न आणि कोणाचीही मुस्कटदाबी करणार नाही गळचेपी करणार नाही.हे जर सत्य आहे तर राम मंदिराच्या आंदोलनात सर्वात जास्त ओबीसी होते.आणि बळी सुद्धा ओबीसीचाच गेला.पण त्याला ट्रस्टी मध्ये प्रतिनिधित्व का नाही मिळाले.तिथे लोकशाही का नाही लागू झाली.यावर किती ओबीसी विचारवंतानी,साहित्यिकांनी,पत्रकारांनी,संपादकांनी प्राध्यापक शिक्षकांना लिहले.का नाही लिहले?.म्हणजेच ओबीसीनो लोकशाही समजली काय?.मी एक सामन्य ओबीसी सुतार समाजाचा भंगारचा धंदा करतो.मला अनेकांचे लेख,पुस्तके वाचून हे प्रश्न पडतात.त्यावेळी मी आपल्या मोडक्या तोडक्या शब्दात लिहून हे विचारण्याचे धाडस करतो.मग उच्चशिक्षण घेतलेलं ओबीसी प्राध्यापक शिक्षक का नाही लिहू शकत.हा माझा जाहीर प्रश्न सर्वच उच्चशिक्षण घेणाऱ्या सुशिक्षित ओबीसी आहे. म्हणजेच ओबीसीनो लोकशाही समजली काय?.

ओबीसी समाजात एक मोठा वर्ग शिक्षकाचा आहे.आणि शिक्षक म्हणजे ज्ञानाचे भांडार.शिक्षकांचे समाजासाठी देशासाठी महत्व व योगदान खूप मोठे असते.तेच देशासाठी सुजान नागरिक घडवितात.जसे ते शाळांमध्ये विध्यार्थी घडवितात तसेच काम ते शाळेबाहेर समाजात करू शकतात. ओबीसी समाजाचे शिक्षक कोणत्या विचारधारेच्या संघटना मध्ये सभासद बनून मतदार बनतात.कोणत्या विचारधारेच्या संस्था संघटना मोठ्या करतात?. भारतीय संविधान मानणाऱ्या की मनुवादी विचारांच्या सरस्वतीला विद्येची देवी मानणाऱ्या संघटनांना प्राधान्य देतात.म्हणूनच ओबीसी शिक्षकानो लोकशाही समजली काय?.असे जाहीरपणे विचारतो.
देशातील ओबीसी शिक्षक,प्राध्यापक विविध क्षेत्रातील कर्तबगारी बजावण्यात यशस्वी होण्यासाठी ज्या हजारो विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात. ते शिक्षकच देशासाठी राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात,उद्दोग क्षेत्रात,वैद्यकीय,शैक्षणिक,विज्ञान,सुरक्षा यंत्रणा, तंत्रज्ञान विकसित करणे अशा विविध प्रकारची पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करतात ते शिक्षकच सामाजिक,वैचारिक,नैतिकता,प्रामाणिकता सत्याची कास धरून वाटचाल करणारे नसतील तर ?. ओबीसी बहुसंख्य असून ही वैचारिक मानसिक गुलामच निर्माण होती.अशांना देशाचे राष्ट्रपती बनविले तरी ते मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची हिंमत दाखवणार नाहीत.पायरीवर बसून दगडाच्या पायाच पडतील.कारण मनुवादी समाज व्यवस्थेत वर्ण व्यवस्थेनुसार त्यांना तो अधिकार नाही.भारतीय संविधानाने तो त्यांना फुकट दिला म्हणून त्याची त्याला किंमत नाही.एक राष्ट्रपती गुलाम बनून राहिला आता त्याजागी दुसरा आदीवासी विशेष महिलेची निवड झाली तिने ही वर्णव्यवस्थे नुसार मंदिरात झाडून मारून आपली लायकी दाखवून दिली. इत्यादी अनेक गोष्टी लक्षात घेता त्याचे धडे देणारे हे शिक्षकच आहेत.ते कोणते शिक्षण देतात हे महत्वाचे आहे.शिक्षक म्हणजे शिक्षकच ते विज्ञान शिकवतात कि अंधश्रद्धा वाढवणारे अज्ञान हे परिस्थिती नुसार अवलंबून असत.विद्यामंदिरात विविध प्रकारचे विकासात्मक पैलु असणारे शिक्षकच देशाच्या,समाजाच्या उन्नतीसाठी विध्यार्थी घडवतात.ते विध्यार्थी पुढे सुजान नागरिक,मतदार आणि जाती जातीचे पदाधिकारी,लोक प्रतिनिधी बनतात.तेव्हा संख्येची गणिते समोर येतात.अल्पसंख्याक कि बहुसंख्याक ओबीसी मगच जाहीरपणे  विचारावे लागते ओबीसीनो लोकशाही समजली काय?.

प्रमोद सुर्यवंशी8605569521,
चिखली,मातृतीर्थ बुलडाणा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com