Top Post Ad

ज्या राजकीय पक्षांसोबत मैत्री केली त्या पक्षांना त्यांनी संपवले

राज्यातील राजकीय नाट्य समाप्त झाले असे वाटत असले तरी ते संपणार नाही.कारण आता खर्‍या अर्थाने शह-काटशह सुरू होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच तडक दुसर्‍या दिवशी शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले.या सरकारला भाजपाचा पाठिंबा राहिल असे स्पष्ट करण्यात आले. आपण तत्वनिष्ठ राजकारणी आहोत आणि हिंदुत्वासाठी काम करणारी लोकं आहोत अशी मखलाशी देवेंद्र फडणवीस यांनी केली. एका बाजूला आपण तत्वनिष्ठ राजकारणी आहोत असे सांगत आहात तर शिवसेना फोडताना तुमची तत्वे कुठे गेली होती? आणि तत्वाच्या बाता ब्राम्हणांनी सांगाव्यात म्हणजे भाकड गायीकडून दुधाची अपेक्षा करणे होय. आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय हा खरं तर भाजपाच्या मनाविरोधात विरोधात आहे. तरीही शिंदे यांना मुख्यमंत्रीपद का देण्यात आले याचा उहापोह होण्याची गरज आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १२२ आमदार निवडून आले होते. १२२ आमदारांपैकी ६ आमदार अल्पसंख्य ब्राम्हण सोडले तर बाकीचे सारे आमदार बहुजन होते. मग मुख्यमंत्री बहुजनांमधीलच व्हायला पाहिजे होता, तो करण्यात आला नाही, आणि महाराष्ट्रासारख्या फुले,शाहू,आंबेडकर,प्रबोधनकारांच्या पुरोगामी राज्यात फडणवीससारखा ब्राम्हण मुख्यमंत्री देण्यात आला, तेव्हाच राज्यात असंतोष होता. त्यावेळी बहुजनांमधील मुख्यमंत्री करायला पाहिजे होता अशी टीप्पणी एकनाथ खडसे यांनी केली होती,केवळ त्यांनी मुख्यमंत्रीपद बहुजनांकडे पाहिजे होते एवढीच इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ब्राम्हणी व्यवस्थेने त्यांचा कसा काटा काढला हे सार्‍या राज्याला माहित आहे. 

आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्याने त्यांच्या जागेवर देवेंद्र फडणवीस येणारच असेच लोकांना वाटत होते. कारण ‘मी पुन्हा येईन’ अशा त्यांनी धोशा लावला होता. म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदेंना हाताशी धरून शिवसेना फोडली. ‘मी पुन्हा येईन’ अशी ज्यावेळी आरोळी फडणवीस यांनी ठोकली होती, तेव्हा या माणसाला मुख्यमंत्रीपदाची किती लालसा आहे हे लक्षात आले होते. मग अचानक आता शिंदे यांना मुख्यमंत्री का करण्यात आले? हे पहावे लागणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार २०१९ मध्ये भाजपाने शब्द पाळला असता तर आज एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. त्यांच्या मनात तेच मुख्यमंत्री होते. परंतु भाजपाने शब्द न पाळल्याने ठाकरे यांना दुसरा निर्णय घ्यावा लागला व महाविकास आघाडी सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपद स्विकारावे लागले. शिंदे यांना शिवसेनेत बंडखोरी करायला लावल्यानंतर ठाकरे सरकार कोसळले. फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री असा कयास बांधला जात असतानाच शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्याला कारणे काय आहेत, तर भाजपाला शिवसेना संपवायची आहे. भाजपाचा इतिहास पाहिला तर त्यांनी ज्या राजकीय पक्षांची मैत्री केली आहे त्या पक्षांना त्यांनी संपवले आहे. गेली २५ वर्षे शिवसेेनेबरोबर त्यांची मैत्री होती. 

आता शिंदे हे शिवसेनेच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खांद्याचा वापर करून ट्रिगर मात्र फडणवीसांच्या हातात राहणार आहेत. तेच शिवसेनेवर चाप ओढणार असून खांदा शिवसेनेचा वापरण्यात येणार आहे. त्यासाठी शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. म्हणजे ब्राम्हणांनी काय केले आहे तर केवळ डावपेच बदलला आहे, उद्देशात बदल केलेला नाही. उद्देश काय आहे तर शिवसेना संपवणे डावपेच काय आहे शिंदेना मुख्यमंत्री पद देणे. म्हणजे ‘डाव’ आणि ‘पेच’ दोन्ही ब्राम्हणांनी टाकलेला आहे, त्यात अलगद शिंदेना अडकवण्यात आले आहे. कारण शिंदेंना मुख्यमंत्री पद देताना उपमुख्यमंत्री पद फडणवीसांकडे ठेवण्यात आले आहे. याचा अर्थच शिंदे हे नामधारी मुख्यमंत्री असतील सारी कमान फडणवीस यांच्या हातात आहे. तेच निर्णय घेणार आहेत. 

म्हणजे खर्‍या अर्थाने पॉवर ही फडणवीसांच्या हातात असणार आहे. जसे डॉ.मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना पाठीमागे सारे निर्णय प्रणव मुखर्जी हे ब्राम्हण घेत होते. तसेच शिंदेंचे होणार आहे. शिंदेंच्या माध्यमातून शिवसेनेला जेवढे डॅमेज करता येईल तेवढे ते करणार एवढे मात्र निश्‍चित आहे. शिवसेेनेला डॅमेज केले की २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता भाजपाच्या हातात आणण्यासाठी त्यांचा हा डावपेच आहे. त्यांनी तसा शत-प्रतिशत भाजपा असा नारा दिलेलाच आहे. परंतु भाजपाची एकहाती सत्ता आणण्यात शिवसेनाच अडथळा आहेे हे त्यांना माहित आहे. म्हणून त्यांनी शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून ट्रिगर मात्र भाजपाच्याच हातात ठेवण्यात आला आहे. 

महाराष्ट्राचा पिंड हा पुरोगामी विचारांचा आहे. तेथे ब्राम्हण मुख्यमंत्री पुन्हा दिला तर राज्यात असंतोष उफाळून येईल याची खात्रीही भाजपाच्या नेतृत्वाला झाली असावी. गेल्या दहा दिवसात राज्याच्या राजकीय नाट्यावर सोशल मीडियावर ज्या प्रतिक्रिया लोेकांच्या येत होत्या, त्यातील बहुतांशी प्रतिक्रिया या शिवसेनेच्या बंडखोरीमागे भाजपाच आहे हे कळून चुकले होते. एवढेच नव्हे तर हे सारे नाट्य ब्राम्हणांनीच घडवून आणले अशाही प्रतिक्रिया येत होत्या. म्हणजे ब्राम्हण व ब्राम्हणवादाविरोधात उभा महाराष्ट्र पेटलेला दिसून येत होता. लोकांच्या विद्रोहाला शमवण्यासाठीही शिंदे यांना मुख्यमंत्री केले असावे अशीही एक राजकीय किनार आहे. लोकांमध्ये आता जागृती वाढत चालली आहे. त्यांना दुश्मन कोण आणि मित्र कोण याची ओळख झालेली आहे. 

लोकांमध्ये जागृती वाढवण्याचे काम बामसेफ, संभाजी ब्रिगेड या संघटनांनी केलेले आहे. त्यामुळे आत बहुजन लोकं खुलेआमपणे ब्राम्हणवादाला विरोध करत आहेत. तर ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियात ज्याप्रकारे त्यांना सहानुभूती मिळाली त्याच्या धास्तीनेही शिंदे यांना मुख्यमंत्री केले गेले असावे. मात्र खरे कारण शिवसेना संपवणे हाच आहे. परंतु कुठलाही पक्ष संपत नाही, जोपर्यंत त्या पक्षाचे तळागाळात कार्यकर्ते आहेत तोपर्यंत. आताच बघा ना, काही आमदार गेले, परंतु शिवसेनेचे कार्यकर्ते व त्यांच्या संघटनेतील लोकं हे ठाकरे यांच्यासोबतच आहेत. आता आपण एवढेच म्हणू शकतो की, मुख्यमंत्री पद देऊन शिवसेना संपवण्याचा खांदा शिंदेंचा, ट्रिगर फडणवीसांचा...! म्हणजेच ब्राम्हणांचा....! त्यामुळे ही कपटी चाल व लबाडी समजून घेणे गरजेचे आहे. दिलीप बाईत ........९२७०९६२६९८,
मंडणगड,जिल्हा रत्नागिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com