अशा कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा


कपटी मित्र पेक्षा दिलदार शत्रू बरा,अशी एक म्हण प्रसिद्ध आहे.कॉंग्रेस राष्ट्रवादी चे राजकीय वर्चस्व संपविण्यासाठी प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे एकत्र आले होते. त्यावेळी शिवसेना हा प्रादेशिक पक्ष म्हणून काही मतदार संघात दोन तीन नंबर वर होता.तसाच भाजप तीन चार नंबर वर होता.यांनी युती केली तर आपण एक किंवा दोन नंबर वर येऊ शकतो यांचे गणिते त्यांनी मांडली त्यात ते काही प्रमाणात यशस्वी सुद्धा झाले.त्याचा फायदा शिवसेने पेक्षा भाजपला राष्ट्रीय पातळीवर जास्त झाला.तेव्हा पासून आज पर्यंत भाजपाने प्रादेशिक पक्षाचे कंबरर्डे मोडून काढले.

महाराष्ट्र राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शेंडी जानव्याचे हिंदुत्व नको ही भूमिका घेतल्या पासून भाजपाच्या वैचारिक मालकाच्या बुडाला आग लागली.त्यामुळे त्यांनी शेवटी त्यांच्या वैचारिक परंमपरे नुसार धर्माच्या लढाईत अधर्माने म्हणजेच ई डी,इन्कमटॅक्सचा वापर करून शिवसेनेचे रिक्षा चालक,टपरीवाले, गल्लीबोळातील टपोरीगिरी करणारे पोरे शिवसैनिक झालेले.शिवसैनिकांचे नगरसेवक, आमदार,खासदार झालेले.त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा करणे हेच आर एस एस प्रणित शासन प्रशासनातील अधिकाऱ्यांना हेरले आणि त्यांनीच फडणवीस, सोमय्या मार्फत ई.डी इन्कमटॅक्स केंद्रीय यंत्रणा कामाला लावली हे आता काही लपून राहिले नाही.कारण भाजपा  हा शिवसेनेचा कपटी मित्र होता.आता तो कट्टर शत्रू झाला.

गात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला होता. तेव्हा जगात ज्या ज्या देशात कोरोना होता.त्या त्या देशातील सत्ताधारी पक्ष,विरोधी पक्ष,नागरिक,डॉक्टर,परिचारिका,पोलिस यंत्रणा,मिडिया,इतर सेवेकरी हे एकत्र येऊन कोरोनाशी लढा देत होते.पण आमच्या राज्यात कोरोना विरूद्ध लढा फक्त सत्ताधारी पक्ष, नागरिक, डॉक्टर, परिचारिका, इतर सेवेकरी , पोलिस यंत्रणा,मिडिया इतर सेवेकरी हे एकत्र येऊन कोरोना लढा देत होते. त्यावेळी भाजपा प्रणित राज्यात सत्ताधारी नागरिकांना सेवा देतांना उघड उघड पक्षभेद जातीभेदाच्या  नांवावर भेदभाव दाखवीत होती. आणि महाराष्ट्र राज्यात विरोधी पक्ष फक्त आणि फक्त  असहकार आणि सरकार विरोधात आंदोलन करत होता. देश,राज्य जेव्हा संकटात असतो तेव्हा सारे मतभेद विसरून आलेल्या संकटाला एकत्रीत येऊन लढा द्यायचा असतो. 

कपटी मित्र पेक्षा दिलदार शत्रू बरा.सामाजिक बांधिलकी नसलेल्या सुजाण विरोधी पक्षनेत्यानां तेव्हा कळत नव्हते.त्यांना फक्त शिवसेना आणि पक्ष प्रमुख शत्रू म्हणून दिसत होता. हे महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव होते.त्या काळात कोणता ही अनुभव नसलेले उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री म्हणून खूप काळजीपूर्वक परिस्थिती हाताळत होते.त्याची इतिहास नोंद झाली आहे.कोरोना गरिब,श्रीमंत,उद्योगपती,सत्ताधारी पक्षाचे नेते,विरोधी पक्षनेते वगैरे असा भेदभाव करत नव्हता,कोरोनाची लागण कोणालाही व कधींही होऊ शकत होता.तेव्हा विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याचे स्वप्ने पाहत होता.नाना प्रकारचे कटकारस्थान करून पाहिले पण यशस्वी होत नव्हते.भाजपा कपटी मित्र पेक्षा दिलदार शत्रू बरा अशी परिस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा इतिहास मराठा,ओबीसी,मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाने एकत्र जिद्धीने लढून घडविला आहे.शिवसेनेच्या सोबत महाराष्ट्रातील मराठा,ओबीसी,मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या खांद्यावर उभा राहून भाजपा मोठा झाला.भाजपानी फडणवीस मोठा केला. आज त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अभिमान राहिला नाही.त्याचं बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील मराठा,ओबीसी,मागासवर्गीय,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाला ही राहिला नाही.असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.म्हणून फडणवीस शिवसेनेच्या ४० आमदारांना ई डी,इन्कमटॅक्सचा धाक दाखवून रातोरात गुजरातच्या सुरत,आसामच्या गुवाहाटी,गोव्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन फिरले.त्या आमदारांच्या डोळ्यासमोर दोनच चित्र दिसत होते.सर्व संपती जप्त करून जेल कि शिवसेनेशी बंडखोरी करून भाजपा सोबत सेल.आणि शासन प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे सहकार्य असल्या शिवाय हे अशक्य होते. त्यामुळेच हा प्रश्न निर्माण होतो.कि देवेंद्र फडणवीस त्यांचा पक्ष महाराष्ट्राचा कपटी मित्र पेक्षा दिलदार शत्रू बरा

 सागर रामभाऊ तायडे,.........९९२०४०३८५९,    भांडूप,मुंबई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA