मुंबई - दलित पँथर सुवर्णमहोत्सव राष्ट्रीय समिती आयोजित दलित पँथर सुवर्णमहोत्सव उद्घाटन सोहळा ९ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजता यशवंराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होणार आहे. या उदघाटन सोहळ्याचे अध्यक्ष दलित पँथर सुवर्णमहोत्सव राष्ट्रीय समितीचे निमंत्रक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले असणार आहेत तर सोहळ्याचे उदघाटन एलनग्नाचं तेलंगणाच्या संशोधक, व विचारवंत डॉ. मल्लेपल्ली लक्षमय्या यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेमधील संशोधक, अभ्यासक, ब्लॅक पँथर चळवळीचे जाकोबी विल्यम्स, डॉ. सिडनी पैगे पॅटरसन आणि डॉ. केविन ब्राऊन तसेच जेष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी दलित पँथर चळवळीशी निगडित पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने दोन परिसंवादही होणार आहे.- परिसंवाद - १ मधील विषय - "दलित पँथर : काल आज आणि उद्या" हा असू साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर वक्ते म्हणून अँड जयदेव गायकवाड, प्रा. विठ्ठल शिंदे, सुरेश सावंत, गौतम सोनावणे, दिवाकर शेजवळ, सुरेश केदारे सहभागी होणार आहेत.
परिसंवाद २ चा विषय - "दलित पँथर चळवळीचे सामाजिक योगदान " हा असून माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या अध्यक्षतेखाली तो पार पडणार आहे. या परिसंवादात वक्ते म्हणून दिलीप जगताप, चंद्रकांत हंडोरे, राही भिडे, बबन कांबळे, लक्ष्मण गायकवाड, डॉ. विजय खरे हे सहभागी होणार आहे.
दलित पँथर चळवळीतील दिवंगत नेते / कार्यकर्ते यांच्या कुटुंबीयांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून "भिमस्पंदन" हा तरुणांचा शाहिरी एल्गार शिरीष पवार, प्रवीण ढोणे व सहकारी सादर करणार आहेत. अशाच प्रकारे वर्षभर कार्यक्रम राबवून पँथरचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. समारोह औरंगाबाद मध्ये ९ जुलै २०२३ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
0 टिप्पण्या