स्वातंत्र्य संग्रामावर आधारित 20 माहितीपटांचे प्रसारण


 देशाच्या 75 वा स्वातंत्र्य दिन  सोहळ्यात  फिल्म्स डिव्हिजन तीन दिवसीय आजादी का अमृत महोत्सव फिल्म महोत्सवासह आपला सहभाग नोंदवणार आहे.  स्वातंत्र्य संग्राम आणि स्वातंत्र्य सैनिक यांच्यावर आधारित 20 माहितीपटांचे प्रसारण या चित्रपट महोत्सवांतर्गत होईल. फिल्म्स डिव्हिजनच्या संकेतस्थळावरून तसेच युट्युब वाहिनीवरून 15 ते 17 ऑगस्ट 2019 या कालावधीत हे माहितीपट प्रदर्शित केले जातील. केंद्र सरकारच्या 'आजादी का अमृत महोत्सव'  या अद्वितीय उपक्रमाचा भाग म्हणून हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. '

आजादी का अमृतमहोत्सव' हा भारताची 75 वर्षांमधील प्रगती आणि आपण भारतीय, आपली संस्कृती आणि यश यांची दैदीप्यमान ऐतिहासिक परंपरा यांचे स्मरण करण्याच्या उद्देशाने साजरा होणारा उपक्रम आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला कलाटणी देणाऱ्या क्षणांवर आधारित निवडक माहितीपट यात समाविष्ट आहेत. यामध्ये 1857 मधील भारताचा पहिला स्वातंत्र्यसंग्राम ते गांधी युगाची पहाट, संपूर्ण स्वराज्याचे आवाहन, दांडी यात्रा, काळे पाणी आणि  स्वातंत्र्यानंतरचे संस्थानांचे विलिनीकरण अशा घटनांवरील माहितीपट या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित केले जातील. करोडो ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या  योगदानामुळे भारताला स्वातंत्र्याच्या पहाटेचे सुवर्णक्षण अनुभवता आले. 'आजादी का अमृतमहोत्सव चित्रपट महोत्सव' चित्रपटांद्वारे अशा काही स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहणार आहे. 

सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, बिरसा मुंडा , रामप्रसाद बिस्मिल , अश्फाक उल्ला खान, बाबा शाहमल , डॉक्टर गोपीनाथ बोर्डोलोई, बाघा जतीन, मातंगिनी हजारा, बंकिमचंद्र यांच्यावरील चरित्रपट प्रदर्शित होतील.  काही अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांवर आधारित चित्रपटही दाखवण्यात येतील. हनवंत सहाय, पंडित जयनंदन झा, शिवा गुरुनाथन, शांताराम वकील, मरिमुथ्थू चेट्टीयार कशा अनेक अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांवरील काही चित्रपटांचाही यात समावेश आहे. 'गांधी रिडिस्कव्हर्ड' हा  सध्याच्या  पार्श्वभूमीवर गांधीवाद आणि स्वदेशी ही समाज बदलाची साधने कशी ठरू शकतात यावर प्रकाश टाकणारा चित्रपट, या चित्रपट महोत्सवाचे मुख्य आकर्षण असेल. हा चित्रपट महोत्सव 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2021 कालावधीत https://filmsdivision.org/ या संकेतस्थळावरून ‘Documentary of the Week’ या विभागाअंतर्गत प्रदर्शित होईल . याशिवाय  https://www.youtube.com/user/FilmsDivision  या युट्युब वाहिनीवरून  दाखवण्यात येईल.

-----------------------------------


राष्ट्रध्वज संहितेत मोठा बदल-  केंद्र सरकारने देशाच्या ध्वज संहितेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता घरोघरी रात्रंदिवस तिरंगा फडकताना दिसणार आहे. संहितेतील या बदलानुसार, पॉलिस्टरपासून तयार करण्यात आलेल्या तसेच मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाला देखील वंदन करता येणार आहे.   यंदा देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत केंद्राने १३ ते १५ ऑगस्टदरम्यान, हर घर तिरंगा अशी मोहीम राबविण्याची घोषणा केली. त्यामुळे प्रत्येक घरात ध्वजारोहण उपक्रम राबवण्यात येणार आहे.
 केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. या पत्रात असे म्हटले की, भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवणे आणि त्याचा वापर करणे हे भारतीय ध्वज संहिता २००२ आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा १९७१ द्वारे नियंत्रित आहे. भारतीय ध्वज संहिता, २००२ मध्ये २० जुलै २०२२ च्या आदेशाद्वारे आणखी सुधारणा करण्यात आली आहे आणि भारतीय ध्वज संहिता २००२ च्या भाग-II च्या परिच्छेद २.२ च्या खंड (xi) नुसार आता ओळखले जाणार आहे. ध्वज आता रात्रंदिवस फडकवता येणार आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1