Top Post Ad

ठामपा कळवा प्रभाग समितीची धडक कारवाई


ठाणे: ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज कळवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.        या कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समिती येथील शंकर मंदिर शेजारी,  येथे स्लॅब कापून तोडण्यात आला. कळवा नाका, जुम्मा मस्जिद येथे स्लॅब, शास्त्रीनगर, येथील बांधकामाचे स्लॅब व कॉलम तोडण्यात आले. तसेच टाकोळी मोहल्ला, येथील बांधकामाचे स्लॅब व अंतर्गत बांधकाम ३० लेबर, २ ब्रेकर व १ गॅस कटरच्या साहाय्याने तोडण्यात आले. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com