Top Post Ad

आमदारांची खरेदी-विक्री करत असल्याची टीका करीत तृणमूल काँग्रेसची निदर्शने

महाराष्ट्रातील आमदारांना ठेवलेल्या हॉटेल परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप


गुवाहाटी: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्याचा आजचा तिसरा दिवस आहे. गुजरातमधून थेट गुवाहाटी येथे गेलेल्या या बंडखोर गटाच्या विरोधात तृणमूल काँग्रेसने गुवाहाटीतील रॅडिसन ब्लूसमोर गुरुवारी निदर्शने केली. त्यानंतर लगेच एनएसयूआयने देखील निदर्शने केले. एनएसयूआयचे राज्य उपाध्यक्ष रक्तीम दत्ता यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी सरकारच्या विरोधात आणि विविध सरकारविरोधी घोषणाबाजी केली. एनएसयूआयच्या आंदोलकांनी हातात बॅनर घेऊन हाॅटेलवर मोर्चा काढला. परंतु पोलिसांनी त्यांना बॅरिकेट लावुन रोखले. आंदोलकांना पोलिसांनी अटक करून बसमधून नेले. दत्ता यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप आमदारांची खरेदी-विक्री करत असल्याची टीका त्यांनी केली.

आसाममधे आसाममध्ये पूरस्थिती बिकट बनली आहे. शेकडो हेक्टर शेतजमीन आणि घरे नदीत वाहून गेली आहेत.मात्र मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या कामात गुंतले आहेत अशी टीएमसी आणि एनएसयुआयने टीका केली आहे.  गुवाहाटी कार्यकर्त्यांचा राडा पहायला मिळाला आहे. आसाम मध्ये पूरपरिस्थिती असताना स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी राजकारणी आणि पोलिस महाराष्ट्राच्या आमदारांना सुरक्षा पुरवण्यात व्यग्र आहेत त्याचा रोष तृणमुलने व्यक्त केला आहे. या कार्यकर्त्यांना हटवण्याचं काम सध्या पोलिस करत आहेत.

महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षासह अपक्ष आमदार गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू येथे तळ ठोकून आहे. तृणमूल काँग्रेस आणि एनएसयूआयच्या निषेधानंतर सीआरपीएफ आणि पोलिसांनी रेडिसन ब्लूच्या आसपास कडक सुरक्षा तैनात केली आहे. महाराष्ट्रातील राजकीय भुकंपाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशाचे लक्ष गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन ब्लू वर केंद्रित आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य सध्या टांगणीला लागले आहे. या हॉटेलमध्ये जमलेले महाराष्ट्रातील असंतुष्ट आमदारांचा एक गट बुधवारी सकाळी सुरतहून गुवाहाटी येथे दाखल झाला. मात्र यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आज रात्री ते असंतुष्ट आमदारांची भेट घेणार असल्याचे निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले आहे. हाॅटेल बाहेर निदर्शने मोर्चे येत आहेत. पोलीस बळाचा वापर करुन त्यांना अडवण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com