क्रांतिभूमि महाड येथील परिसरात अनेक प्राचीन बुद्ध लेण्यांचे निर्माण कार्य सातवाहन काळामध्ये २००० वर्षा पूर्वी झाले असून तो काळ बुद्ध धम्माचा सुवर्ण काळ होता. महाडचा सत्याग्रह परिषदे दरम्यान डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी येथील गंधारपाले बुद्ध लेणीला भेट दिली होती. आपला सुवर्ण इतिहास समजून घेण्यासाठी ऐतिहासिक क्रांतिभूमी महाड येथे मोफत एकदिवसीय बुद्धलेणी अभ्यास दौरा ५ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. ज्या मध्ये प्रवास खर्चा सोबत जेवणाचा खर्च देखील उचलण्यात येणार आहे. सुरवातीचे जे ६५ नामांकित लोकांची निवड आयोजकांच्या माध्यमातून केली जाणार आहे. या अभ्यास दौर्यात १. कोल बुद्ध लेणी २. महाड चवदार तळे ३. गांधारपाले बुद्ध लेणी या स्थळांना भेटी व कार्यशाळा घेण्यात येणार आहे. हा अभ्यास दौरा भिमसृष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक,पिंपरी, पुणे या ठिकाणाहून दिनांक ५ जून रोजी पहाटे ३:३० च्या दरम्यान निघणार आहे. यामध्ये सागर कांबळे (बोधिसत्त्व चॅनल संचालक) यांची विशेष उपस्थिती असणार आहे. अभ्यास दौर्यात सहभागी होण्यासाठी https://surveyheart.com/form/6289128f41ccd870c6ec5883 या सांकेतिक स्थळावर जाणून रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घ्यावा. निवड प्रक्रिया ही आयोजकांच्या माध्यमातून केली जाणार आहे. निवड झालेल्या सदस्यांना या अभ्यास दौर्याच्या ग्रुप मध्ये सहभागी करून घेण्यात येईल. अधिक माहिती साठी संतोष शिंदे :- 9604683459, रवी कांबळे :- 8888291639, चंद्रकांत बोचकुरे - 9822145807 यांच्याकडे संपर्क साधावा.
0 टिप्पण्या