Top Post Ad

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी समस्त हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेची मागणी


जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणी  शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची  सबळ पुराव्याअभावी गुन्ह्यातून मुक्तता करण्यात आली. मात्र जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून समाजाची दिशाभूल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रक्षोभक भाषण आणि वक्तव्य करून राज्यभर जातीय तेढ निर्माण केली. त्यामुळे त्यांनी समस्त हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केली आहे.  शहरी नक्षलवादाविरोधात राज्यभर मोर्चे काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कारवाईच्या मागणीसाठी राज्यभर मोर्चे काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सतीश खांबे, आनंदराव चव्हाण, भूषण गुरव, प्रकाश निकम, अजिंक्य बोलाज, युवराज जाधव उपस्थित होतेराजकीय शक्तीचा अभावामुळे हिंसाचार - शरद पवार
दरम्यान  कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यावेळी 'भीमा कोरोगाव हिंसाचाराला भाजप सरकार जबाबदार होतं. राजकीय शक्तीचा अभावामुळे हिंसाचार झाला.   हिंसा नियंत्रण करता आले असते पण तसे केले गेले नाही' असा गंभीर आरोप शरद पवार यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्यावर केल आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब चौकशी समितीने नोंदवला आहे
जर कोणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असेल आणि कोणी असामाजिक घटक येऊन तिथे तणाव निर्माण करत असतील तर त्याची जबाबदारी कोणाची आहे? असा प्रश्न आयोगाने विचारताच शरद पवार म्हणाले,  “कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. असामाजिक घटकांनी राज्याची शांतता भंग करू नये, यासाठी पोलिसांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे.”

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर यांना चौकशी आयोगाने बोलावायला हवं का? यावर पवार म्हणाले की, “आयोग स्वतःहून तपास करण्यास स्वतंत्र आहे. भविष्यात अशी दंगलसदृश परिस्थिती टाळण्यासाठी लोकांकडून सूचना मिळू शकतात, असे आयोगाला वाटत असेल, तर ते कोणालाही बोलावू शकतात.”
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आणखी एका घटनेच्या संदर्भात, आयोगाने त्यांना विचारले की ३ जानेवारी २०१८ रोजी प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्यानंतर दंगलीत सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले. त्यासाठी कोणाला जबाबदार धरायचे? त्यावर पवार म्हणाले, “न्यायप्रविष्ट असलेल्या कोणत्याही प्रकरणावर मी माझे मत नोंदवू शकत नाही.”

शरद पवारांनी केलेल्या दंगली दरम्यान केलेल्या वक्तव्यानंतर सागर शिंदे नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने शरद पवारांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावावं, अशी मागणी करणारा अर्ज केला होता. त्यानंतर आयोगाने शरद पवारांकडून जबाब मागवला होता, मात्र त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितली होती. पवारांनी आतापर्यंत दोन प्रतिज्ञापत्रे सादर केली असून आज ते स्वतः चौकशी आयोगासमोर हजर राहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1