Top Post Ad

हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे महत्त्व कमी करण्याचा डाव


उस्मानाबादमध्ये स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं महत्त्व कमी करण्याचा हा डाव असल्याचा आरोप करीत रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने ही  मागणी करणाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन केले. तसेच ही मागणी करणाऱ्या सिनेट मेंबरला काळं फासलं. सिनेट मेंबर संजय निंबाळकर  यांनी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी केली होती. नामांतराच्या लढ्यासाठी बलिदान देणाऱ्या नेत्यांचा हा अपमान असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाविरोधात हा कट असल्याचा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आला.  

आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर निंबाळकर हे इतर सदस्यासोबत बाहेर येत असताना कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला. व त्यांच्यावर शाईफेक केली. या वेळी निकम आणि निंबाळकर यांच्या मध्ये झटापट देखील झाले. या वेळी गुणरत्न सोनवणे, पवन पवार, मनीष नरवडे, सचिन गायकवाड, राहुल वडमारे आदी कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केले.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतर शहिदांच्या बलिदानाचा हा एक प्रकारे अवमान करूम राज्यात दंगली पेटविण्याचे जातीयवादी षडयंत्र हणून पाडण्यासाठी मोठा लढा उभारू प्रसंगी बलिदान देण्याची आंबेडकरी कार्यकर्त्यांची तयारी आहे संजय निंबाळकरसारख्या प्रवृत्तींना धडा शिकवून विभाजन हणून पाडू, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांनी दिली.

आक्रमक झालेल्या आंदोलकांना वेळीच शांत करण्यात आले. यामुळे विद्यापीठ परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. नामांतरासाठी 17 वर्ष संघर्ष करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव विद्यापीठाला मिळालं असून काही जातीयवादी लोकांकडून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. हा नामांतर शहीदांचा अवमान आहे. तो आम्ही सहन करणार नाहीत. जी जी माणसं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने दिला आहे.

या प्रकाराबाबत निंबाळकर म्हणाले, मी परिषदेच्या बैठकीत असताना फोन आल्याने बाहेर आलो. त्यावेळी बेसावध असताना माझ्यावर शाई फेकली. या प्रकाराला मी घाबरत नाही. उस्मानाबाद आणि औरंगाबाद असा वाद नसून ती जून 2014 मधील मागणी आहे, तसा ठराव आहे. माझ्याशी भांडण्यापेक्षा शासनाला भांडावे. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांना या प्रकरणी कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com